babu rajendra prasad information in marathiस्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान बाबू राजेंद्रप्रसाद यांना मिळाला. १९५० - १९६२ या कालखंडात ते राष्ट्रपतीपदावर होते. त्याग, सौजन्य, विद्वत्ता, निष्ठा, उदारता या साऱ्या गुणांचा त्यांच्यामध्ये संगम झालेला होता.

राजेंद्रप्रसाद यांचा जन्म बिहार मधल्या जीरादेई या गावी ३ डिसेंबर १८८४ रोजी झाला. त्यांचे वडील महादेवप्रसाद हे जमीनदार होते. त्यांची आई कामेश्वरी ही धार्मिक वृत्तीची गृहिणी होती. बाबूजींचे प्राथमिक शिक्षण मौलवीकडे झाले. त्यांची बुद्धी अतिशय तीव्र होती. १९०२ साली ते मॅट्रिकची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी ते कलकत्त्याला प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जाऊ लागले. येथून ते एम्. ए. व एल्. एल्. एम्. झाले. या कॉलेजमधील प्राध्यापक प्रफुल्लचंद्र रे आणि जगदीशचंद्र बोस यांचा बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वावर फारमोठा प्रभाव पडला आहे.

babu-rajendra-prasad-information-in-marathi

 राजेंद्रबाबूंनी काहीकाळ अध्यापनाचे काम केले. पण नंतर त्यांनी १९११ मध्ये कलकत्ता हायकोर्टात वकिली करायला प्रारंभ केला. प्रामाणिकपणा, सचोटी, कायद्याचा सूक्ष्म अभ्यास आणि विस्तृत व्यासंग यामुळे लौकरच ते उत्तम वकील म्हणून नावाजले जाऊ लागले. १९१४ ते १६ त्यांनी लॉ कॉलेजमध्येही अध्यापन केले. वकील म्हणून जम बसल्यावर त्यांना मानमरातब व धनसंपदा मिळाली.
परंतु त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागले. १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्यात मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महात्मा गांधींनी लढा दिला.
 
यावेळी बाबूजी गांधींबरोबर होते. येथून पुढे ते पुरते गांधीवादी बनले, स्वदेशीचा पुरस्कार करू लागले, असहकारितेच्या चळवळीत भाग घेऊ लागले. पक्षसंघटना बांधण्याचे काम करू लागले. त्यांनी पाटणा येथे एका राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली. त्याचे कालांतराने ते कुलगुरू व कुलपतीही झाले. १९३४ मध्ये मुंबईला भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. १९३६ व १९४६ मध्येही ते पुनः अध्यक्ष झाले. १९३४ मध्येच बिहारमध्ये फार मोठा भूकंप झाला. या बिकट प्रसंगी बाबूजीनी तेथील जनतेला धीर दिला. सबंध देशातून मदत मिळवली, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान केले.

 बाबूजीना हरिजन उद्धार, राष्ट्रभाषा प्रचार, कुष्ठरोग निवारण, मूलोद्योग अशा त-हेच्या रचनात्मक कार्याची आवड होती. हिंदी भाषेच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी
खूप कार्य केले. त्यांनी अनेक ग्रंथ हिंदी भाषेत लिहिले. 'सर्चलाईट ' या इंग्रजी नियतकालिकासाठी लेखन केले. 'देश' हे हिंदी साप्ताहिक सुरू केले, त्याचे संपादकपद सांभाळले. हिंदी राष्ट्रभाषा व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. हळूहळू त्यांची लोकमान्यता वाढत होती. त्यांना जगातील अनेक विद्यापीठांनी — डॉक्टर ऑफ लॉ', 'डॉक्टर ऑफ लिटरेचर ' अशा पदव्या दिल्या. काशी विद्यापीठाने विद्यावाचस्पती' ही गौरवपूर्ण पदवी दिली.
'चलेजाव' चळवळीत भाग घेतल्यामुळे राजेंद्रप्रसादांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पुढे १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळच्या कामचलाऊ सरकारात बाबूजी अन्न व शेतकी खात्याचे मंत्री झाले. भारताची राज्यघटना बनवण्यासाठी जी समिती स्थापन झाली तिचेही बाबूजी अध्यक्ष होते आणि प्रजासत्ताक भारताचे राजेंद्रप्रसाद हे १९५० ला पहिले राष्ट्रपती झाले. पाटण्यातील सदाकत आश्रमातून बाबूजी राष्ट्रपती भवनात आले. त्यांनी राष्ट्रपती भवनातील खर्चिक डामडौल कमी करुन टाकला. 

त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वानेच राष्ट्रपती भवनास भव्यता प्राप्त झाली. राष्ट्रपती असताना त्यांनी अनेक देशांचे सदिच्छा दौरे केले. १३ मे १९६२ रोजी त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. त्याच वर्षी त्यांनी आपली कारकीर्द स्वेच्छेने संपवली आणि ते आपल्या सदाकत आश्रमात परत आले. गांधीजींच्या पावलांवर पाऊल टाकून राजेंद्रबाबूंनी स्वातंत्र्यलढ्यात केलेली कामगिरी मोलाची होती. जीवनाच्या अखेरीस ते विजनवासात पाटण्याला राहिले. त्यांना मधूनमधून त्रास देणारा दमा त्यांच्या सोबतीला होताच. 

पाटणा येथील सदाकत आश्रमातच २८ फेब्रुवारी १९६३ रोजी या सरलहृदयी, प्रसन्नचित्त अशा अजातशत्रूचे निधन झाले. एक थोर देशभक्त सौजन्यशील विद्वान, गांधीजींचे विश्वासू साथी म्हणून राजेंद्रबाबूंची ख्याती होती. दुसऱ्याच्या भल्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांचे आयुष्य त्याग व सेवावृत्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. राजेंद्रप्रसादांचे आयुष्य म्हणजे वीरोचित जीवनयज्ञच होता.

babu rajendra prasad information in marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत