INFORMATION MARATHI

थोरव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
थोरव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

dr homi bhabha information in marathi



  • ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईला एका सधन, सुशिक्षित पारशी कुटुंबात जन्म.
  • १९३० केंब्रिज विद्यापीठाची बी. ए. पदवी प्राप्त
  • १९३४ याच विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त
  • १९३६ 'मूलकणांचे सिद्धांत व त्यांचा अन्योन्य परिणाम' या प्रबंधाला अँडम पारितोषिक प्राप्त. 
  • १९४० बंगलोरला रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन 
  • १९४१-४२ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत सैद्धांतिक पदार्थविज्ञानाचे (थिअरिटिक फिजिक्स) रीडर. 
  • १९४२ विश्वकिरण संशोधन केंद्राचे प्रमुख 
  • १९४२-४५ विश्वकिरण (कॉस्मिक रे) विभागात प्राध्यापक व मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटलचे डायरेक्टर 
  • १९४८ भारतीय अणुशक्ती मंडळाचे अध्यक्ष
  • १९५१ इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष 
  • १९५४ पद्मभूषण सन्मान व डी. एससी. पदवी प्राप्त 
  • १९५६ 'अप्सरा' अणुभट्टी उभारणी. 
  • १९६४ प्लुटोनियम प्लँटची उभारणी. 
  • १९६६ २४ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू.
जन्म व बालपण डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म २० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईला एका सधन, सुशिक्षित कुटुंबात झाला. अगदी बालपणापासून होमींची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र होती. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या कुटुंबियांना विश्वासपूर्वक वाटत होते की, भविष्यात होमी काही थोर कार्य करेल, आणि घडलेही तसेच. भविष्यात घडलेल्या थोर पुरुषांना असामान्य बुद्धिमत्तेची भेट सुष्टिकर्त्याकडून प्राप्त होत असते. या अनुमानाने डॉ. होमी भाभा हे एकमेव उदाहरण आहे. त्यांना बालपणी झोप अगदी कमी लागायची. अधिक वयाच्या चिंतनशील व्यक्तीप्रमाणे बालपणी ते चिंतनात गुंग राहायचे. कुटुंबियांकरिता ही चिंतेची बाब होती, त्यांनी डॉक्टरांकडून होमीची तपासणी केली. त्यांना कोणताही आजार नव्हता, पण मेंदूच्या अधिक सक्रिय असल्यामुळे ही लक्षणे दिसतात असे डॉक्टरांनी सांगितले.

dr-homi-bhabha-information-in-marathi
dr-homi-bhabha-information-in-marathi

मेंदूच्या अधिक सक्रिय असण्यामुळे होमीमध्ये चिंतनाचे जाळे विणले जायचे. अशाप्रकारे चिंतनातून पुढे विषयांची आवड निर्माण झाली. तल्लख मेंदू फक्त आवडीपर्यंतच राहिला नाही तर, आवडलेल्या विषयात नवीन प्रगतीविषयी त्यांची सक्रिय हालचाल असायची. बालपणी होमीचे रडणे थांबविण्याकरिता घरच्यांनी फोनोग्राफवर संगीत वाजविण्याची युक्ती शोधून काढली. या युक्तीचा समाधानकारक परिणाम झाला, रडणे थांबले. मात्र अधिक सक्रिय मेंदच लक्षण प्रताप घडवन गेले.

 संगीताच्या तालबद्धतेत होमी गंग व्हायचे. एकाग्रतेने ऐकायचे. याप्रमाणे होमींना संगीत आवडले व अधिक सक्रिय मेंदुमुळे एकाग्रतेने पाठपुरावा केला. परिणामतः संगीत व पुढे याप्रमाणेच चित्रकला हे होमींचे आवडते विषय झाले. प्राथमिक शिक्षणाच्यावेळी होमी भाभांना चित्रकलेत आवड निर्माण झाली. आवडलेल्या विषयात कार्बनकॉपी न करता नवनिर्मिती करावी हा पाठपुराव असायचाच. हाच परिणाम, जीवनात होमी भाभांची संशोधक दृष्टी अति तीक्ष्ण झाली व थोर मानवकल्याण कार्य त्यांच्या हातून घडले.
शिक्षण

होमी भाभांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल स्कूलमध्ये तर हायस्कूल शिक्षण जॉन कॉनन हायस्कूलमध्ये झाले. होमी भाभांचे वडील टाटा संस्थानामध्ये नोकरी करायचे. त्यावेळी भारतात उद्योगधंदे निर्माण व्हावे या दृष्टीने टाटांनी पाऊल उचलले होते. टाटांच्या या उपक्रमात पुढे होमीचाही सहभाग असावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना सुरुवातीपासून त्याप्रकारे घडविण्याकरिता प्रयत्न चालविले.

टाटा संस्थानात उद्योग मुख्य असल्यामुळे विज्ञान व यंत्र यावर संस्थानाचे कार्य उभे होते. यामुळे होमीला घडविण्याच्या प्रयत्नात वडील त्यांना या विषयाशी संबंधित पुस्तके वाचायला आणून देत. खेळायला असणारी खेळणीही होमीला बालपणी विज्ञान व यंत्राचा परिचय करून देणारी मिळाली, परिणामतः होमी भाभा संगीत व चित्रकलेच्या आवडीप्रमाणे विज्ञानाच्या आवडीशी जुळले.

विषय कोणताही असो, मात्र होमी भाभांची बुद्धिमत्ता आवडीसोबत नवसंशोधनात अधिक गुंतली. होमी भाभांच्या वेळचा काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता. या अगोदर एकोणविसाव्या शतकात अणुविषयी काही प्रमाणात संशोधन झाले होते. लहानपणापासून विज्ञानाची माहिती वाचनातून गेल्यामुळे व ती आवडल्यामुळे सहजच विज्ञान विषयाकडे होमी भाभा आकर्षिल्या गेले.

होमी भाभांच्या लहानपणी वाचनात आईन्सटाईन यांचे पुस्तक आले. या पुस्तकाने त्यांना अणुविषयी परिचय झाला. आईन्स्टाईन यांनी या पुस्तकात वस्तुमान व उर्जा यांना एकसूत्रात दर्शवून अणुगर्भातून बाहेर पडणारी शक-ती या सूत्राप्रमाणे निर्माण होते व अणुशक्तीचे प्रमाण बरेच असते हे स्पष्ट केले. डॉ. होमी भाभांवर आईनस्टाईनच्या या सिद्धांताचा आकर्षित परिणाम झाला व पुढे त्यांनी यावरच आपले संशोधन केले.

डॉक्टरेट कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अगदी धाव घेतल्याप्रमाणे होमी भाभा बी. ए. पर्यंत पोचले. यावेळी त्यांचे वय अवघे पंधरा वर्षाचे होते. सीनियर केंब्रिज (बी. ए.) ची परीक्षा त्यांनी पास केली. यापुढील अधिक अभ्यासाकरिता त्यांना विदेशी जायची इच्छा होती. पण ती त्यांच्या कमी वयामुळे पूर्ण झाली नाही. परदेशी शिक्षणाला प्रवेश घ्यायला सतरा वर्षे वय लागायचे. अभ्यासक्रम पुढे सुरू राहावा म्हणून प्रथम एल्फिन्सटन कॉलेज व नंतर रॉयल इन्स्टिट्यूअ ऑफ सायन्स या संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला.

 यावेळेपर्यंत होमी भाभांना अणुयुगाचे प्रवर्तक डॉ. आईन्स्टाईन यांचे पुस्तक वाचनात आल्यामुळे अणुबद्दल अस्पष्टसा परिचय झाला, आणि आता पुन्हा एकदा अणुविषयी अधिक परिचय त्यांना झाला. अणुबाँबचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले अमेरिकन शास्त्रज्ञ एम. एच. क्रॉम्टन यांचे वक्तव्य त्यांना ऐकायला मिळाले. अणुबद्दल क्रॉम्टन यांनी या व्याख्यानवेळी बराच विस्तारपूर्वक परिचय दिला. सक्रिय इंजिनाला यामुळे जणू इंधन मिळाले. होमी भाभांना अणुच्या अधिक संशोधनाबद्दल येथूनच अधिक आवड निर्माण झाली.


यापूर्वी चित्रकला व संगीत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. विज्ञान हा फक्त आवडीचा विषय होता, मात्र या दोन प्रसंगानंतर विज्ञान विषय अधिक आवडीचा म्हणजे एवढा अधिक आवडीचा झाला की ते विज्ञानाचे उपासक बनले व विज्ञानात यशस्वी नवसंशोधक करून त्यांनी कीर्तिमान स्थापित केला. एल्फिन्स्टन कॉलेज व रॉय इनिस्टट्यूटमधील अभ्यासक्रम संपेपर्यंत होमी भाभांचे वय सतरा वर्षाचे झाले. यामुळे विदेशी जायची राहिलेली तयारी त्यांनी आता केली.

आतापर्यंत परिचय झालेल्या व अधिक आवडलेल्या विज्ञानातील तात्त्विक विज्ञान या विषयाने होमी भाभांना विशेष आकर्षित केले. पण त्यांच्या वडिलांची त्यांनी इंजिनिअर व्हायची इच्छा होती. यामुळे टाटा संस्थानात होमीला चांगल्या पदावर नोकरी मिळेल.
 होमी भाभांचे नशीब मात्र वेगळे होते ! यामुळेच तर नावीन्य घडले. त्यांची व वडिलांची अशा दोन्ही वेगळ्या इच्छा. पण एकत्र आल्या व नवनिर्मिती झाली.

नवविज्ञानात आईन्स्टाईनच्या सिद्धांतामुळे प्रयोगाएवढेच महत्त्व गणिताला आले होते. यामुळे संशोधनात प्रथम गणिताचे समीकरण पडताळले जाऊ लागले व नं संशोधनाचा टप्पा येऊ लागला. परदेशी केंब्रिज युनिव्हर्सिटीत होमी भाभांनी वडिलांच्या इच्छेने व स्वतःच्या इच्छेचे असे दोहोंशी संबंधित विषय एकाचवेळी घेतले. यात इंजिनिअरींगच्या विषयासोबत त्यांच्या आवडीच्या गणित व भौतिक विषयाचा अभ्यास यात झाला. आवडीचे विषय असल्यामुळे होमी भाभांनी युनिव्हर्सिटीच्या या परीक्षेत विशेष पराक्रम गाजविला.

परीक्षेतील असामान्य यशामुळे त्यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता स्पष्ट झाली. एकाचवेळी पाच विषय घ्यायचे व त्यातील परीक्षेत उत्तम गुण मिळवावे हा एक विक्रमच ! विद्यापीठाकडून होमी भाभांचे कौतुक झाले. कौतुकाप्रीत्यर्थ न्यूटन, राऊसबॉल सारख्या विश्वविख्यात तसेच इतरही कित्येक शिष्यवृत्या यावेळी त्यांना मिळाल्या. यामुळे त्यांच्यामधील उत्साह अधिक वाढला व ते पुढील वाटेवर पादाक्रांत झाले.

परीक्षेतील या असामान्य यशामुळे एक आणखी फायदा होमी भाभांना मिळाला. प्रसिद्ध प्रो. फर्मी व कॅमर यांचे संशोधनाकरिता मार्गदर्शन लाभले.
यानंतर होमी भाभांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्याकरिता अभ्यास चालविला. कुशाग्र बुद्धिमत्तेला कसोटीचे प्रयत्न जुळायचे आणि म्हणून परिणाम समीकरणाप्रमाणेच व्हायचा. यावेळीही तेच पुढे आले. डॉक्टरेट पदवी परीक्षा त्यांनी पास केली. १९३४ हे ते वर्ष होते व यावेळी डॉ. होमी भाभांचे वय होते अवघे पंचेवीस वर्षाचे.
पायरी दर पायरी प्रत्येक परीक्षा पास करत डॉ. होमी भाभांचा यशस्वी प्रवास सुरू होता. 

तरी मात्र आवडीचे चित्रकला व संगीत यांची आवड त्यांच्यात कमी झाली नव्हती. वेळ मिळाला की ते या विषयाकडेही वळायचे व आनंद घ्यायचे. का डॉ. होमी भाभांची विदेशी जायची इच्छा पूर्ण झाली व येथील अभ्यासक्रमात त्यांना समाधानही लाभले. पीएच. डी. प्राप्तीमुळे त्यांना विद्यापीठात शिकविण्याकरिता बोलावणे येऊ लागले, मात्र त्यांची दिशा वेगळी होती.

संशोधनाची निवड. डॉ. होमी भाभांची दिशा अगदी बालपणापासून नवसंशोधक राहिली असल्यामुळे डॉक्टरेट पदवी प्राप्तीनंतर शिकविण्याकडे ते वळले नाही. संशोधन ही त्यांची एकमेव विशेष आवड. यामुळेच त्यांनी शिकविण्यापेक्षा संशोधनात पुढे आपला अभ्यास सुरू ठेवला.


जे अस्तित्वात आहे त्यात अधिक संशोधक करून जगकल्याणाकरिता आपण काही कार्य करावे, ही डॉ. होमी भाभांमध्ये सुरुवातीपासून इच्छा मूळ धरून राहिली आणि यामुळेच अध्यापनापेक्षा संशोधनाची त्यांनी निवड केली. डॉ. होमी भाभांचा हा संशोधनाचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचा होता. मझयुद्धात पडलेले देश विज्ञानाकडे डोळे लावून बसले होते. शत्रू राष्ट्र जर्मनीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे फार मोठ्या प्रमाणात जमविली होती. अणुशक्तीच्या स्पष्टतेमुळे अमेरिका, इंग्लंडचे लक्ष अणुशक्तीवर केंद्रित झाले होते.

 यावेळेपर्यंत अणुशक्तीबद्दल घेतलेली टिपणे पूर्णत्वास गेली नव्हती. त्यात बरेच काही अधिक संशोधन करता येते हे टिपणांवरून डॉ. होमी भाभांच्या दृष्टीला विश्वासपूर्वक पटले आणि म्हणून अणुशक्ती संशोधनाकडे त्यांनी वेध घेतला.
अणुशक्ती म्हणजे काहीतरी महाभयंकर शक्ती असा सारांश आमच्या लक्षात अणुशक्तीबद्दल आला असणार ! आणि म्हणून खरे काय ह्य उलगडा होणेही आवश्यक म्हणून अणुशक्तीचा परिचय देतो आहे.  अणुविषयीचा शोध तसा इसवीसनपूर्व सहाशेच्या सुमाराचा. यावेळी भारतीय ऋषी कणाद यांनी अणुविषयी सिद्धांत मांडला होता. यानंतर एकोणिसाव्या शतकापर्यंत या अणुविषयाला स्पर्श झाला नाही. एकोणिसाव्या शताकत मात्र या विषयाला खरी सुरुवात झाली. यात सर्वप्रथम इंग्रज शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी १८३२ मध्ये आपला अणुविषयीचा सिद्धांत मांडला. त्यांनी आपले अणुविषयी म्हणणे मांडले की, 'रासायनिक क्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थाचा अंतिम कण म्हणजेच अणू होय.'

कोणत्याही घटातील सर्व अणू समान असतात. अणुचे विघटन करता येत नाही किंवा तो नव्याने निर्माण करता येत नाही.' असेही त्यांनी आपले म्हणणे मांडले.

यानंतर अणुविषयी त्याच्या शक्तीची शास्त्रज्ञांना पटवणूक झाली. अणु शक्ती संशोधनाचा प्रवास प्रगतीच्या जोडीला जुळला व वेगात हालचालींना सुरुवात झाली ते येथूनच !
१८९५ मध्ये अणु संशोधनातील प्रयोग रॉटगेन यांनी 'क्ष' किरणाचा शोध लावला. या शोधामुळे अणुशास्त्रावर अधिक प्रकाश पडला.


१८९६ मध्ये एक आणखी यशस्वी पाउल पडले. हेन्री बेक्वेरेल या फ्रेंच शास्त्रज्ञाने युरेनियम मूलद्रव्य किरणोत्सारी असल्याचा शोध लावला. आपल्या या संशोधनात त्यांनी अल्फा, बीटा व गॅमा ही किरणे असण्याचा उल्लेख केला. बेक्वेरेल यांच्या या संशोधनात अधिक प्रगतीचे पाउल क्यूरी दांपत्यांनी टाकले. पेरी क्यूरी व मेरी क्यूरी या दांपत्याने ‘पोलोनियम' व 'रेडियम' ही दोन नवीन मूलद्रव्ये शोधली. तसेच 'किरणोत्सर्ग' हा अणूच्या गाभ्यातून बाहेर पडतो हे सिद्ध केले.


पुढे १८९६ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जे. जे. थॉमसन यांनी 'इलेक्ट्रॉन' चा शोध लावला. इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण विजेचा सर्वात लहान अंश होय.
१८९८ मध्ये क्यूरी दांपत्याने संशोधनाची एक पुन्हा मजल गाठली. त्यांनी 'भारी वजनाच्या मूलद्रव्याचे अणू अस्थिर असतात व भंग पावतात' हे सिद्ध केले. यानंतर विसाव्या शतकाला सुरुवात झाली. या शतकाच्या सुरुवातीला मॅक्स प्लॅक यांनी उर्जा ही कणयुक्त असून कणांच्या स्वरुपातच तिच्या सर्व प्रक्रिया घडतात असा उर्जाविषयक कणसिद्धांत मांडला.


१९०२ मध्ये रूदरफोर्ड व सॉडी यांनी किरणात्सर्जनाचे नियम शोधून काढले व रेडियमप्रमाणे युरेनियम व थोरियम ही द्रव्ये किरणोत्सर्जी आहेत हे दाखविले.
नंतर रूदरफोर्ड यांनी आण्विक क्षेत्राची व्यवस्था केली व अणूचा पहिला कण 'प्रोटॉन' शोधून काढला.
यापूर्वी नियम युरेनियम, रेडियम आदि किरणोत्सर्गी घटातील अणु चे विभाजन होते त्यावेळी प्रत्यक्षात त्यांचा अणुभर्ग भंग पावतो त्यातून अल्फा, बीटा व गॅमा ही प्रारणे बाहेर पडतात हे सिद्ध झाले होते. अल्फा, बीटा व गॅमा या किरणांबद्दल माहिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. 

अल्फा किरण म्हणजे दोन धन विद्युतभार असलेले हेलियम या मूलद्रव्याचे कण होत. तर प्रकाश किरणासारख्या विद्युत चुंबकीय लहीरींना गॅमा किरण म्हणतात. १९०४ मध्ये किरणोत्सर्जनाच्याद्वारे उपयुक्त तहेची उर्जा मिळविण्याचा संभव रुदफोर्ड यांनी स्पष्ट केला. पुढे १९१९ पर्यंत संशोधन प्रवास पुढे-पुढे चालत राहिला. १९१९ मध्ये रुदरफोर्डनी धन विद्युतकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स परिभ्रमण करीत असल्याचे सिद्ध केले.
१९२३ मध्ये नील्स बोहर यांनी या अणुसंशोधनात अधिक भर घातली. अणु हे ताऱ्यांप्रमाणे शक्ती उत्स नाच कार्य करतात हे त्यांनी दाखविले.


पुढे एन्स्किो फर्मानी अणुच्या विघटनाचा शोध लावला. या संशोधनात युरेनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटांच्या अणुगर्भाच्या विघटनामुळे प्रचंड शक्ती बाहेर पडते असे आढळले.
अशा सर्व १८३२ पासून सुरू झालेल्या अणूविषयीच्या संशोधनाला आईन्सटाईन यांनी सूत्रबद्ध केले. यात वस्तुमान व उर्जा यांना त्यांनी सूत्रात मांडले. ते म्हणतात की, अणुगर्भातून बाहेर पडणारी शक्ती या सूत्राप्रमाणे निर्माण होते व अणुशक्तीत उष्णतेचे प्रमाण बरेच असते.


यानंतर जॉन डॉल्टन ते आईन्सटाईनपर्यंत अणुविषयी संशोधनाचा प्रवास क्रमानुसार मांडल्या गेला व यातील जो निष्कर्ष स्पष्ट झाला तो अणुशक्तीच्या स्वरूपात जन्माला आला. अशाप्रकारे अणुशक्तीविषयी अधिकाधिक स्पष्टीकरण प्रयोगाला घेऊन डॉ. होमी भाभांनी यापेक्षाही अधिक संशोधनाला सुरुवात केली.

रॉयल सोसायटीचे सदस्य अणुसंशोधनात आईन्सटाईन यांच्या सिद्धांत संशोधनामुळे बरीच स्पष्टता प्रकाशात आली. १९३४ मध्ये डॉक्टर पदवी प्राप्तीनंतर डॉ. होमी भाभांनी संशोधनाला निवडल्यामुळे, अणुशास्त्र आवडीचे असल्यामुळे यावरील अभ्यास सुरू केला. अगोदर घेतल्या गेलेल्या पडताळ्यांना व टिपणांना त्यांनी प्रथम अभ्यासले. याकरिता त्यांना दोन वर्षाचा अवधी लागला. १९३६ मध्येभाभांनी दोन वर्षाच्या अभ्यासाचा सारांश म्हणून अणुशास्त्रावर अधिक प्रकाश टाकणारा प्रबंध लिहिला. 

मूलकणांचे सिद्धांत व त्यांचा अन्योन्य परिणाम' हा त्यांनी लिहिलेला प्रबंध. या प्रबंधाकडे जग आकर्षिल्या गेले. भाभांमधील प्रतिभा जगाच्या निष्कर्षाला पूर्णपणे अवतरली आणि या महत्त्वपूर्णतेमुळे त्यांचा सन्मान झाला. या प्रबंधाबद्दल ररितोषिक म्हणून भाभांना अॅडम व हाफकिन्स पारितोषिक मिळाले.
प्रयत्न यशस्वी झाले होते. सन्मानही मिळाला आणि टॉनिक मिळाल्याप्रमाणे झाले. स्वाभाविकच भाभांचा उत्साह अधिक वाढला.


पुढील संशोधन टप्प्यामध्ये डॉ. होमी भाभांनी विश्वकिरण संशोधनाला स्पर्श केला. या संशोधन प्रयोगाच्या निष्कर्षात भाभांनी, 'अवकाशातून या किरणाचा वर्षाव होताना घडणाऱ्या प्रक्रिया दाखविल्या.' या संशोधनामुळे हायटलरयांनी त्यांना पूरेपूर सहकार्य केले. यामुळे हे संशोधन ‘हायटलर-भाभा सिद्धांत' असे जगप्रसिद्ध आहे. भाभामधील प्रतिभेच्या या संशोधनामुळे आणखी अधिक परिचय जगाला आला व महत्त्वपूर्ण सन्मानाचे दार त्यांच्या अधिक उजळ प्रतिभेकरिता उघडले गेले.

 प्रतिभावंताकरिता बहुमान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व डॉ. होमी भाभांना दिल्या गेले. हे सदस्यत्व प्राप्त होणारा संशोधक म्हणजे महत्त्वपूर्ण संशोधक म्हणून गणला आणि भाभांना ते मिळाले. भारताच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात झाली.
विश्वकिरण विदेशातील आपला अभ्यास व संशोधन परीक्षण पूर्ण करून १९४० मध्ये डॉ. होमी भाभा भारतात परतले. यावेळेपर्यंत भारतात संशोधनाकरिता फक्त बंगलोरला रामन रिसर्च इन्स्टिट्यूट हीच एकमेव साधनसंपन्न संस्था होती. 

भाभांनी आपल्या पुढील संशोधनाकरिता या संस्थेत प्रवेश घेतला व भारताच्या प्रगतीची दिशा अंकुरायला सुरुवात झाली. रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. होमी भाभांनी विश्वकिरण (कॉस्मिक किरण) याच मुद्याला संशोधनाकरिता घेतले. जॉन डॉल्टन यांनी प्रथमता मांडलेल्या अणूविषयीच्या सिद्धांतावर बरचे संशोधन झालेले आम्ही पाहिले. 'क्ष', अल्फा, बीटा, गॅमा या किरणांचा शोध लागला. नंतर यापेक्षाही अतिशय वेधक किरणाबाबत संशोधन झाले.


यात आईन्स्टाइन यांनी सूत्रबद्धता स्पष्ट केल्यामुळे मोलाची भर पडली. अतिशय वेधर किरणांचा शोध यामुळेच लागला. आईन्स्टाईन यांनी वस्तुमान व उर्जेला एकसूत्रता घेतले व या समीकरणाने कणांची गती प्रकाशकिरणाएवढी होते. तेव्हा त्या पदार्थाचे घनत्व लोप पावते व कणांचे रुपांतर किरणात होते हे दाखविले. हेच ते डॉ. होमी भाभांनी जगासमोर अधिक स्पष्टतेत आणलेले विश्वकिरण (कॉस्मिक किरण) होय.
अगोदर झालेल्या बऱ्याच संशोधनामुळे भाभांना या किरणाविषयी उलगडा झालाच होता. यात त्यांना एका नवीन अज्ञात कणाचे अस्तित्व जाणवत होते. 

हा शोध लवकरच खरा ठरला, मात्र याला शोधण्याचे श्रेय जपान शास्त्रज्ञ हिडेको युकावा यांनी 'मेसॉन' या नवीन अज्ञात कुणाची स्पष्टता केली. भाभांनी नंतर या कणाविषयी अधिक संशोधन केले. यात भाभांना या कणाचे अस्तित्व विश्वकिरणात आढळले व हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. एवढे सगळे अणुविषयी विस्तारपूर्वक परीक्षण झाले पण डॉ. होमी भाभा अशांतच होते. त्यांना विश्वकिरणात मेसॉन व इतर सापडलेल्या कणापेक्षाही वेगळ्या तीव्र भेदक गुणधर्माचा कण सापडण्याची आशा होती.


आतापर्यंत सापडलेले मूलकण ऋण अथवा घन विजेने भारलेले होते किंवा विद्युत्भाररहित होते. भाभांना मात्र यापेक्षाही वेगळा असा कण सापडण्याची शक्यता होती. ज्यात एकाचवेळी एकापेक्षा अधिक विद्युत्भार असतील.
अणूविषयाच्या संशोधनाची संपूर्ण जगात जणू घोडदौड सुरू होती. एकामागून एक शोध याविषयी स्पष्ट होत होते. अणू म्हणजे अमृतच ! अणू म्हणजे भविष्यातील प्रगतीचे अमूल्य भांडार असा विश्वास डॉ. भाभांना होत होता आणि म्हणून एकानंतर दुसऱ्याच्या शोधात त्यांचा मेदू सतत धडपडत होता. आता बळावत जात होती की, 'मेसॉनप्रमाणे एक आणखी पण तीव्र भेदक गुणधर्माचा कण मिळेल.

'अणूबॉम्ब १९१४ ते १९१८ या कालवधीमध्ये पहिले महायुद्ध झाले. यात जर्मनीचा पराभव झाला. ब्रिटन व फ्रान्स ही राष्ट्रे विजयी झाली. या विजयी राष्ट्रांनी महायुद्धांत झालेल्या हानीची भरपाई म्हणून जर्मनीवर अपमानकारक व अन्यायकारक अटी लादल्या. यामुळे जर्मनी राष्ट्र संपूर्णपणे हतबल झाले आणि हेच कारण सूडाची भावना निर्माण व्हायला कारण ठरले व दुसऱ्या महायुद्धाची बीजे अंकुरली.
१९१९ नंतर १९३९ पर्यंत वीस वर्षात हिटलरने जर्मनीला पुन्हा ताठ उभे केले व सूडाच्या भावनेचा स्फोट दुसऱ्या महायुद्धात झाला.


जर्मनीने यावेळी संहारक शस्त्रनिर्मितीचे जणू भांडार एकत्र केले. या प्रकारची तयारी लढणाऱ्या राष्ट्रांचाही होती. मात्र जर्मनीच्या मुस्काटात त्यांना अशी काही हाणायची होती की, भविष्यात कधी स्वप्नातही जर्मनी महायुद्धाच्या विचाराला स्पर्श करणार नाही. अणूविषयी अधिक संशोधनाला हा काळही तसा अनुकूल होता.
यात आगीत पेट्रोल टाकण्याचे एक कृत्य जर्मनीने आणखी केल्यामुळे इंग्लंड अति संहारक अस्त्राच्या निर्मितीच्या जिद्दीलाच पेटले.


१९४० च्या त्या सुमारास जर्मनीने सतत तीन महिने इंग्लंडवर बाँब वर्षाव केला होता. तर डंकर्क येथील ब्रिटिश फौजींना कोंडीत घेऊन असंख्य इंग्रज सैनिकांची कत्तल केली होती.
याआधी जेव्हा डॉ. होमी भाभा इंग्लंडला पदवी अभ्यासक्रमाला होते तेव्हा यशस्वी अणूविषयीच्या संशोधनाबद्दल इंग्लंडला ते परिचयाचे होते. अति संहारक अस्त्र तयार करण्याकरिता जिद्दीला पेटलेल्या इंग्लंडने यामुळे डॉ. होमी भाभाकडे हे कार्य सोपविले. याकरिता भाभांना अमेरिकन विमानदलाचे एक विमान व अन्य आवश्यक सामुग्री दिल्या गेली. या संशोधनाकरिता डॉ. होमी भाभांनी बंगलोर, दिल्ली, पुणे परीक्षणाला पडताळले. त्यांना आपल्या संशोधनात हवे होते ते तीव्र भेदक किरण. हे मिळाले की अती संहारक अस्त्र बनविणे शक्य होते. याकरिता भाभांनी किरणांची तीव्रता पडताळली व त्यांच्यातील शक्ती तपासली.


या दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तरी युद्धात असलेल्या इंग्लंडला मित्रत्वामुळे मदत होती. इंग्लंड, फ्रान्स होता तो अस्तित्वात असलेल्या संहारक शस्त्रापेक्षाही अती संहारक अस्त्र तयार करण्याकडे अणूशक्ती परीक्षण याकरिता एकमेव ठरत असण्याचा पडताळा होत असल्यामुळे अमेरिका त्या दृष्टीने प्रयत्नशील होती. जगातील इतर राष्ट्रही या प्रयत्नात आपले प्रयोग पडताळण्यात गुंग झाले होते, पण सर्वाअगोदर अणूशक्तीपासून अति संहारक अस्त्र तयार करण्यात यश मिळविले अमेरिकेने. अमेरिकेला सर्वप्रथम यश मिळायला त्यांचे जिद्दीचे प्रयत्न उपयोगी पडले, आणि असे घडायला तसे महत्त्वपूर्ण कारणही घडले होते. 


नोव्हेंबर १९४३ नंतर जर्मनीच्या पराभवाला सुरुवात झाली, हे पाहून पूर्वेकडील जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. पॅसिफिक व हिंदी महासागरातील देशांच्या ठाण्यावर जपानने हल्ले केले. ७ डिसेंबर १९४३ ला जपानने पर्लहार्बरवर जोरदार बाँबवर्षाव केला. यामुळे अमेरिकेचा तेथील नाविक तळ संपूर्णपणे निकामी झाला. अमेरिकेला हा मोठा आघात होता आणि यामुळेच अमेरिका अशा पवित्र्यात चवताळली होती की, अति संहारक अस्त्र बनविणारच बनविणार ! आणि अमेरिकेने तसे अल्पचं वेळात करूनही दाखविले. फक्त दीड वर्षाच्या अवधीत अती संहारक अस्त्र तयार करण्यात यश मिळविले.


ओपेनहॅमर या शास्त्रज्ञाने कसोटीच्या प्रयत्नांना हात घालून तेवढ्याच जिद्दीने हा चमत्कार घडविला.
अणुबाँब हे अति संहारक अस्त्र तयार करण्याकरिता ओपेनहॅमर यांनी युरेनियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य वापरले. युरेनियमच्या अणुकेंद्रकात ब्याण्णव प्रोटॉन व एकशे सेहेचाळीस न्यूट्रॉन असतात. यातील दोनशे पस्तीस अणुभाराचे केंद्र ओपनहॅमर यांनी आपल्या परीक्षणात अति सहारक अस्त्राकरिता पडताळ्याला जुळवले.
दोनशे पस्तीस अणुभार केंद्र म्हणजे फारच अस्थिर, फारच चळवळ करणार! यातील कणांची फाटाफूट अती वेगाने व अती विध्वंसक असते. ओपेनहॅमर यांना पाहिजे असलेला मंत्र या पद्धतीने मिळाला व अणुबाँब हे अतिसंहारक अस्त्र तयार झाले.


ओपेनहॅमर यांनी अणुबाँ बकरिताच संपूर्ण परीक्षण पडताळले. अणुबाँबमध्ये युरेनियमचे अणु फोडायला त्यांनी त्यांच्याच अणुकेंद्रकातील न्यूट्रॉन वापरले.
यातील क्रिया ही अशी घडते. 'युरेनियम दोनशे पस्तीसवर रासायनिक क्रिया झाल्यानंतर त्याचा एक भाग फुटतो व न्यूट्रॉन बाहेर पडतात. हे न्यूट्रॉन आणखी इतर अणुवर आदळतात व अशी साखळीची प्रचंड वेगाने क्रिया घडते व स्फोट होतो. क्षणाच्या आत प्रचंड अणुशक्ती अतीसंहारक कार्य घडविते.


अणुशक्तीचे प्रचंड स्वरूप प्रगट व्हायला युरेनियम दोनशे पस्तीसच्या ठराविक वस्तुमानावर म्हणजे ठराविक अणुसंख्येवर क्रिया घडायला हवी. याला 'क्रिटीकल' वस्तुमान म्हणतात. यापेक्षा थोडे अधिक वस्तुमान एकत्र आले की, क्षणात साखळीने स्फोटाची प्रचंड क्रिया घडते व अणुशक्ती प्रचंड स्फोटाच्या स्वरूपात प्रकट होऊन अती संहार त्राही-त्राही करत चोहीकडे पसरतो. वरील क्रियेने अणुबाँब तयार झाल्यानंतर त्याचे न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात परीक्षण घेण्यात आले व तोच महाप्रताप प्रगटला जो अमेरिकेला हवा होता. अती संहारक अस्त्र !


जपान हा लहान देश पण जर्मनीच्या मदतीने त्याने जर्मनी व इतर प्रगत राष्ट्राएवढी प्रगती केली होती. अमेरिका अणुबाँब या अतीसंहारक अस्त्राच्या वापराला जिद्दीने कदाचित चवताळलीही नसती पण जपानने प्रगतीचा शेरा मारून अमेरिकेसारख्या विज्ञान क्षेत्रात प्रगतिपथावर असलेल्या देशाच्या जणू नरडीवरच घाव घातला होता. पूर्वेकडील अमेरिकेची अतिमहत्त्वाची ठाणी जपानने संपूर्णपणे उध्वस्त केली होती. पुन्हा कधी भविष्यात कुण्या राष्ट्राची वक्रदृष्टी अमेरिकेकडे वळू नये अणुबॉब बनविला व जपानला तसेच जगाला कायमचे अतिसंहारक अस्त्र दाखविले. ६ ऑगस्ट १९४५ ला फक्त एक अणुबाँब अमेरिकेत जपानच्या प्रमुख हिरोशिमा शहरावर व नंतर तीन दिवसांनी नागासाकी व हिरोशिमाप्रमाणेच मुख्य शहरांवर टाकला.


फक्त एक-एक अणुबाँब पडला, मात्र एका-एकानेच महाप्रताच घडला. प्रचंड अतिसंहार झाला. लाखो लोक मृत्यूमुखी पडले. दोन्ही शहरे जणूजमिनीच्या आत कधी अस्तित्वात नसल्यासारखी गडप झाली. तर स्फोटातून पसरलेल्या विषारी वायूमुळे शेकडो मैलाचा प्रदेश दूषित झाला व जे या अतिसंहारातून वाचले ते कायमचे अपंग झाले.


टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी १९४३ मध्ये जेव्हा डॉ. होमी भाभा बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये विश्वकिरण (कॉस्मिक रे) विभागात प्राध्यापक होते व तेथेच त्यांचे संशोधन कार्य सुरू होते. त्यांना इंग्लंडने अणुशक्तीच्या सहाय्याने अती संहारक अस्त्र तयार करण्याच्या संशोधनाला लावले. त्यांना हवी ती सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यादृष्टीने डॉ. होमी भाभांनी बंगलोर, दिल्ली व पुणे येथे परीक्षण पडताळले हे आपण पाहिले आहे. 

या परीक्षणवेळी त्यांनी विविध उंचीवरून अणुकिरणाची तीव्रता, तीव्रता मापक उपकरणांनी मोजली व नोंदी घेतल्या होत्या. यात भाभांना किरणातील शक्ती मिळाली. एक नंतर दुसरी पायरी असे त्यांचे मुद्देसूद संशोधन सुरू होते. यात सव्वा वर्षाचा काळ गेला व याअवधीत दोन महत्त्वपूर्ण गोष्टी एकाचवेळी घडल्या ज्यामुळे भाभांकडील इंग्लंडने दिलेली जबाबदारी मध्येच संपली.


७ मे १९४५ रोजी जर्मनीचा पूर्ण पराभव झाला. इंग्लंड विजयी झाले व अमेरिकेने अणुबाँबपर्यंतची यशस्वी मजल गाठली. आता पुढे यामुळे भाभांकडे सोपविलेल्या कामगिरीचा काही अर्थ नाही म्हणून त्यांना संशोधन थांबविण्याला सांगण्यात आले.
या संशोधनामध्ये भाभांना एक गोष्ट अती महत्त्वपूर्ण वाटली की, 'मौलिक संशोधनासाठी एखादी स्वतंत्र संस्था असावी.'


अणुशक्ती संशोधनकार्य इंग्लंडकडून थांबल्यानंतर डॉ. होमी भाभांनी प्रथमता या दृष्टीने टाटांकडे प्रयत्न चालविले. टाटांना अशा संस्थेचे महत्त्व त्यांनी पूर्णपणे पटवून दिले. टाटांना भाभांचा विचार पटला व त्यांनी १९४५ मध्ये 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' ही संस्था अस्तित्वात आणली. त्यावेळी अणुसंशोधनात भारतात डॉ. होमी भाभा एकमेव संशोधन असल्यामुळे टाटांनी त्यांना संस्थेचे संचालकपद दिले. 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' (टाटा मूलभूत संशोधन संस्था) मध्ये संचालक झाल्यानंतर डॉ. होमी भाभांनीविश्वकिरणाच्या पुढील संशोधनाला चालना दिली. भाभांनी यावेळी संशोधनात विश्वकिरणाचे भाग व त्यांचे उपभाग शोधले.


डॉ. होमी भाभांनी विश्वकिरणात दोन भाग दाखविले आहेत. प्राथमिक विश्वकिरण हे अतिशय भेदक व शक्तिशाली असतात. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर हवेतील अणूंशी त्यांची टक्कर होते व त्यातून अणुगर्भीय कणांच्या स्वरूपाचे द्वितीय विश्वकिरण निर्माण होतात.


यातही 'तीव्रभेदक' व 'मृदूभेदक' असे प्रकार असतात. भाभांनी या द्वितीय मृदू विश्वकिरणाच्या निर्मिती प्रक्रियेचा उलगडा केला आहे. या प्रक्रियेची डॉ. होमी भाभांनी रचना मांडली आहे. तिला 'कॅस्केड थिअरी ऑफ २ कॉस्मिक शॉवर' (विश्वकिरणांच्या वर्षावासंबंधीचा प्रतापी सिद्धांत) असे नाव आहे. 'टाटा मूलभूत संशोधन संस्था' या संस्थेच्या नावातील मूलभूत संशोधन हे शब्द डॉ. होमी भाभांनी मूलभूत संशोधनाच्या अर्थानेच घेतले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय याच स्वरूपातील होता. विश्वकिरण व अणुकेंद्रक याबाबतचे मूलभूत संशोधन होते व याकरिताच त्यांनी या संस्थेला स्थापले होते.


भारतात भाभांच्या त्यावेळी अणुशास्त्र हा विषय अगदीच नवीन असल्यामुळे या क्षेत्रात कुशल कार्यकर्ते नव्हते. भाभांनी याकरिता एकमेव पुढाकार घेतला व कुशल कार्यकर्त्यांचा जमाव केला. यामुळे अणुशास्त्र परिचयाला आले व संशोधन कार्य अधिक वेगाने सुरू झाले.


अणुशक्ती संशोधन केंद्र १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला की त्याच्यासमोर देशातील गरजा उभ्या राहतात. आपला सर्वांगीण विकास त्याला करावा लागतो आणि हे सर्व घडते तेव्हाच जेव्हा जगाच्या प्रवाहाला तो जुळतो. स्वातंत्र्य मिळालेल्या वेळचा काळ मुख्यरूपाने विज्ञानावर स्वारी करून होतो. भविष्यात विज्ञानाचे हिमालय टोक स्पष्ट पाहायला मिळत होते. भारत स्वतंत्र झाल्यामुळे भारतीयांकडे जग आदरभावनेने पाहू लागले होते. अणुबाँबमुळे सर्वच जगाचे लक्ष अणुशक्तीवर केंद्रित झाले आणि यात एक वरील पायरी म्हणजे अणुशक्ती संशोधक म्हणून मान भारताकडे होता. भारतरत्न डॉ. होमी भाभांकडे महायुद्धाच्या काळात इंग्लंडने अणुशक्ती संशोधनकामगिरी सोपविली होती हे आम्ही पाहिले आहे. यामुळे भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर अणुशक्तीविषयी जगाचे लक्ष भारताकडे केंद्रित झाले.


परदेशांकडून डॉ. होमी भाभांना त्यांनी चालविलेल्या विश्वकिरण संशोधनाविषयी विस्तारित माहिती द्यायला आमंत्रणे आली. डॉ. होमी भाभांनी सर्व आमंत्रणांचा स्वीकार केला व त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना केलेल्या संशोधनाबद्दल संपूर्ण विस्तारपूर्वक माहिती दिली.


स्वतंत्र भारताचा कार्यभार जवाहरलाल नेहरूंकडे आला. भविष्यातील विज्ञानाचा वेध त्यांनी स्वीकारला व विज्ञानाचे सहर्ष स्वागत केले. भारताला सर्वांगीण विकासाची मोठी गरज होती आणि म्हणून विज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन नेहरूजींनी विज्ञानाला महत्त्वपूर्ण कक्षेत स्थानापन्न केले.


यापूर्वीपासूनची डॉ. होमी भाभांमधील प्रतिभा व त्यांनी टाटांच्या सहकार्याने चालविलेल्या अणुशक्ती संशोधन कार्याला पाहता त्यांना अणुशक्ती मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान दिला.
१९४८ मध्ये नेहरूंनी अणुशक्तीविषयी पावले उचलली. यावर्षी त्यांनी संसदेत अणुशक्तीविषयी कायदा पास केला. या लगोलगच १० ऑगस्ट १९४८ रोजी 'भारतीय अणुशक्ती मंडळाची' स्थापना केल्या गेली. या मंडळाने 'अणुशक्तीचा शांततामय विधायक कार्यासाठी वापर' हे उद्दिष्ट ठरवून अणुशक्तीच्या भव्य इमारतीचा पाया तयार केला आणि येथूनच भारतात अणुशक्तीची सुरुवात झाली.


भारतात त्यावेळी अणुशक्तीचे महापंडित डॉ. होमी भाभा यांच्याशिवाय दुसरे कुणी नव्हतेच ! भारत सरकारने त्यांना सन्मान दिला, अणुशक्ती मंडळाचे त्यांना अध्यक्षपद दिले. अशाप्रकारे अणुविज्ञानाच्या दालनात स्वतंत्र भारताने प्रवेश केला.
इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष इ. स. १६०० अगोदरची भारताची स्थिती पाहिली तर भारतीयांच्या गरजा मर्यादित असलेल्या आपणाला पाहायला मिळतात. यानंतर परदेशी पावले भारतभूमीवर पडली. परदेशी प्रवाशांनी भारतभूमीचा शोध केला व येथील व्यापारासंबंधी अवलोकन केले. येथील पुष्कळशा वस्तू त्यांच्याकरिता अधिक उपयोगाच्या होत्या व यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार होऊ शकत होता. हे लक्षात आल्यानंतर परदेशी व्यापारी भारताकडे धाऊ लागले. व्यापार करताना त्यांनी येथे गोडी-गुलाबीचे मजबूत संबंध तयार केले व हळूहळू हालचाली वाढवून शेवटी सत्ता बळकावली.


 इ. स. १६०० नंतरच्या काळात इंग्रजांचे राष्ट्र प्रगत राष्ट्रात होते. निरनिराळे कितीतरी शोध ते लावत होते. भारतात इंग्रजांनी सत्ता स्थापित केल्यानंतर राज्यकारभार व व्यापार करण्याकरिता इंग्लंडमधील सुधारणा येथे आणल्या. यामुळे येथे नवनवीन उद्योगधंदे सुरू झाले. तर भारतीयांच्या मर्यादित गरजा संपल्या व वाढीव गरजा पुढे आल्या. भारतात इंग्रजांनी जवळजवळ दीडशे वर्षे राज्यकारभार केला. या दीर्घ काळात देशाची प्रगती घडविणाऱ्या बऱ्याच नवीन सुधारणा येथे झाल्या. यामुळे झाले असे की, भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर काळाच्या प्रवाहाबरोबर प्रवाहित राहणे भारतीयांना तेवढेच आवश्यक होते जेवढे भुकेला जेवण ! बराच काळ प्रगतीच्या शेतात राबण्यात गेल्यामुळे व प्रगती काळाची गरज ठरत असल्यामुळे ही प्रगतीच्या पावलांशी. पाऊल मिळवून चालणे भारताला आवश्यक होते.


अप्रगत व कमकुवत देशांवर तर प्रगत देशांचे डोळे अगदी तेल घालून असतात, भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत शैक्षणिक प्रगतीमुळे भारतीयांना व विकासाची व्याख्या संपूर्णपणे दृष्टिपथास आली होती. याबरोबरच विसाव्या शतकात विज्ञान मानव कल्याणाकरिता जणू अमृत ठरू पाहात होते. स्वतंत्र भारताचा कर्णधार काळाची ही पावले ओळखण्यापर्यंत सुशिक्षित असल्यामुळे स्वतंत्र भारताने विज्ञानाचे सहर्ष स्वागत केले.


विज्ञानाच्या मानवउपयोगी अधिक उपयोगाकरिता भारत सरकारने एक मोठी योजना आखली. यात संशोधनाबद्दल अधिकाधिक माहितीकरिता विज्ञान परिषदेचे अधिवेशन भरविल्या गेले. या अधिवेशनामध्ये लक्षपूर्तीसाठी अधिकाधिक माहितीकरिता विदेशी संशोधकांना आमंत्रित केल्या गेले.


पुण्याला हे अधिवेशन भरले. देशोदेशीचे संशोधक अधिवेशनाला आले. हे अधिवेशन खूप फायद्याचे ठरले. बरीच नवीन माहिती यात मिळाली. भारतातर्फे अर्थातच डॉ. होमी भाभांनी भारताने पावले उचललेल्या अणुशक्ती संशोधनाबद्दलची मुद्देसूद माहिती अधिवेशनात दिली. विदेशी संशोधक भारताच्या एवढ्या उंच प्रगतीने आश्चर्यचकित व प्रभावितही झाले आणि या कारणाने लक्षपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण तीच कामगिरी साध्य झाली याकरिता हे अधिवेशन भरविण्यात आले होते. विदेशी सहयोग हे एकमेव कारण अधिवेशनाचे होते आणि प्रभावित झालेल्या विदेशी संशोधकांनी भारताला गळ्यात मिठी मारून आश्वासन दिले.


पुण्याचे अधिवेशन यशस्वी ठरल्यामुळे अधिक यशप्राप्तीच्या दृष्टीने लवकरच १९५१ मध्ये बंगलोरला दुसरे अधिवेशन आयोजित केल्या गेले. या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान अर्थातच डॉ. होमी भाभांकडे आला. अधिवेशनातील व्याख्यानाची प्रभावित शैली व मूलभूत संशोधनातील महत्त्वपूर्ण संशोधन यामुळे त्यांच्याशिवाय कुणी दुसरी लायक व्यक्ती अध्यक्षपदाकरता ठरतच नव्हती ! आणि डॉ. होमी भाभा इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष झाले.


अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन टाटा फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील कार्याच्या जबाबदारीबरोबर आता डॉ. भाभांच्या कार्याशी अणुउर्जा आयोगाच्या कार्याच्या जबाबदारीचाही समावेश झाला. टाटा संस्थेमध्ये डॉ. भाभांनी संशोधनकार्याबरोबर संशोधनाला उपयोगी पडणाऱ्या उपकरणांचे निर्मिती कार्य चालवले होते आणि यामुळे अगोदरच कामाचा अधिक व्याप होता. पण हाडांचे शास्त्रज्ञ अधिक कामाला घाबरतात कोठे ! आव्हाने स्वीकारण्यात आणि त्यात यशस्वी होण्यात तेच तर त्यांचे कार्य असते !!

 डॉ. होमी भाभांनी जुळलेल्या अधिक कार्याचे सहर्ष स्वागत केले व इतर कार्याएवढेच महत्त्व देऊन त्यालाही प्रयोग टेबलवर संशोधनाला घेतले.
अणूविषयीचे संशोधन डॉ. होमी भाभांचे एकमेव संशोधन होते. यावेळी त्यांना याविषयी मोकळेपणाने व साधनसंपन्न स्थितीत संशोधनाची वेळ लाभली. त्यांनी आपली संपूर्ण प्रतिभा यावेळी संशोधनात ओतली व यामुळे यशश्री त्यांच्या वाट्याला आली. अणूच्या कार्याची व रचनेची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी या संशोधनात शोधली. यामुळे एक महत्त्वपूर्ण संशोधन जगासमोर आले व अणुविज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा स्पष्ट झाला. अणू रचनेच्या संशोधनात भाभांनी दाखविले की, 'अणूमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन या घटकासोबतच पॉझिट्रॉन व मेसॉण हे कण विरल स्थितीत असतात.


 अणूच्या कार्याविषयी या रचनेच्या आधारे त्यांनी नोंद घेतली की, 'तीव्र अणु उर्जेच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया अणु बिजात संभवतात त्यात हे विरलकण फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.' हेच ते भाभांनी जन्म दिलेले महत्त्वपूर्ण संशोधन. ज्यामुळे अणुविज्ञान विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्या गेला.
अणू अणुशक्तीचा प्रथम उपयोग संहारक कार्याकरिता केल्या गेला. ज्यावेळेत ही गोष्ट घडली ती वेळ त्याला अनुरूप होती. मात्र त्या भयानक संहाराने जग हादरले. 


सर्व संशोधकांनी एकच ओरडा केला की, अणुशक्तीचा उपयोग शांततामय मानव उपयोगी कार्याकरिता व्हावा आणि जगाने सर्व संमतीने हा ठराव पास केला. यानंतर या दिशेने अणुशक्तीवर संशोधन सुरू झाले. भारतात डॉ. होमी भाभांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी आपल्या संशोधनात अणूची संपूर्ण रचना स्पष्ट केली आहे अणू म्हणजे प्रचंडच ! यातील शक्ती जेवढी कल्याणकारी तेवढीच संहारक. अणुविषयी अधिकाधिक माहिती आपणालाही कळायला हवी, म्हणून अणुविषयी परिचय खालीलप्रमाणे 


अणुसिद्धांत - इ. स. १८३२ मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी अणुविषयी सिद्धांत मांडला. पुढे याच सिद्धांताच्या आधारे प्रयोग झाले व अणुचा अधिकाधिक परिचय जगाला झाला. डॉल्टन यांनी आपल्या सिद्धांतात अणुविषयी जी व्याख्या केली ती अशी, 'रासायनिक क्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थाचा अंतिम कारण म्हणजेच अणू होय.' कोणत्याही घटातील सर्व अणू समान असतात. अणूमध्ये परस्पर आकर्षण असते व यामुळे रासायनिक क्रिया घडतात. अणुला विभाजित करता येत नाही, किंवा तो नव्याने निर्माण करता येत नाही. संयुग तयार होताना निरनिराळ्या मौलांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांशी रासायनिकदृष्ट्या संलग्न होत असतात.
अणुभार - कोणत्याही मौलाचा अणू हायड्रोजनच्या अणूच्या कितीपट जड आहे हे दर्शविणाऱ्या अंकास त्या मौलाचा ‘अणुभार' म्हणतात. मौलाचा अणुभार दर्शविणारा अंक हा त्याच्या अणुगर्भात असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या बेरजेएवढा असतो.


अणुगर्भ - अणुच्या केंद्रभागास ‘अणुगर्भ' म्हणतात. अणूचे वस्तूमान प्रामुख्याने अणुगर्भातच केंद्रित असते. आपल्या आण्विक क्रमांकाएवढा धन विद्युतच्चय अणुगर्भावर असतो. अणुगर्भात प्रोटॉन्सच्या बरोबर न्यूट्रॉन्सही असतात. या न्यूट्रॉन्स व प्रोटॉन्सना एकत्रित बंधक करून ठेवणारी एक शक्ती अणुगर्भात असते. तिला 'युनिव्हर्सल ग्लू' म्हणतात. याप्रमाणेच अणुगर्भात अॅन्टीप्रोटॉन, अॅन्टी न्यूट्रॉन्स व मेसॉन कणही असतात.


अणुभंजन - अणुगर्भाच्या विघटनाची क्रिया म्हणजे 'अणुभंजन' होय. या क्रियेत अणुगर्भाचे दोन किंवा अधिक तुकडे होत असतात. हे तुकडे हलक्या मौलाच्या अणुगर्भाचे असतात अथवा मूलकणांचे असतात. काही मौलांच्या अणुच्या बाबतीत ही क्रिया कृत्रिम पद्धतीने करण्याकरिता अणुगर्भावर वेगवान मूलकण सोडतात.
ही अणुभंजनाची क्रिया घडत असताना प्रारण व उष्णतेच्या स्वरूपात उर्जा बाहेर पडत असते. साधारणतः युरेनियम, प्लूटेनियम यासारख्या जड मौलातचं अणुभंजनाची क्रिया घडत असते. अणुशक्ती ही महत्त्वपूर्ण क्रिया आहे.


अणुशक्ति - युरेनियम हे मूलद्रव्य किरणोत्सर्गी आहे. यातील अणूगर्भाच्या विघटनक्रियेत निर्माण होणारी शक्ती म्हणजेच 'अणुशक्ती' होय. अणुशक्तीमध्ये प्रचंड उष्णता असते. या उष्णतेचा वापर विद्युतशक्ती निर्माण करण्याकरता केल्या जात आहे.


अणुसंयोजन - अण्विकशक्ती मुक्त करण्याचा दुसरा मार्ग हा हायड्रोजनसारख्या हलक्या मूलद्रव्याचे संयोजन करून त्यापासून दुसरे मूलद्रव्य तयार करणे हा होय. प्रचंड उष्णतेने जड होयड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होत असताना मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती होत असते.


किरणोत्सारी द्रव्यांचे गुणधर्म - किरणोत्सारी द्रव्यांमधून अल्फा, बीटा व गॅमा अशी तीन प्रकारची अदृश्य किरणे बाहेर पडतात. यापैकी अल्फा व बीटा हे कणांच्या स्वरूपात तर गॅमा प्रारण स्वरूपात असते. किरणोत्सारी द्रव्याला अर्धायुष्य असते. या अर्धायुष्याच्या काळात मूळ साठ्यातील अर्ध्या साठ्याचे नवीन मूलद्रव्यात रूपांतर होते व बाकीचा अर्धा साठा तसाच शिल्लक असतो. उदा. प्लूटोनियम या कृत्रिम किरणोत्सारी द्रव्याचे अर्धायुष्य २,४४,००० वर्षे एवढे दीर्घ आहे. अणुशक्तीचा शोध लागण्यापर्यंत युरेनियम या किरणोत्सारी द्रव्याचा उपयोग कांच व मातकामात केल्या जायचा. कांच सामानाला हिरवा-पिवळा रंग द्यायला युरेनियमचा उपयोग केल्या जाई.
याप्रमाणेच थेरियम हेही किरणोत्सारी द्रव्य. या द्रव्याचा उपयोग गॅसबत्यात वापरल्या जाणाऱ्या (मेंटल) पांढऱ्या आवरणाकरिता केल्या जायचा.


युरेनियमविषयी माहिती अशी की, हे द्रव्य युरेनिनाईट, पिचब्लेंड या नावाच्या काळ्या रंगाच्या खनिजात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असते. याशिवाय डेव्हीडाईट, बॅनराईट व कॉफिनाईट या खनिजातही युरेनियम विशेष प्रमाणात सापडते.
युरेनियमविषयी विशेष असे की, हे द्रव्य फक्त पृथ्वीच्या पोटातच सापडते असे नाही, तर सागराच्या पाण्यातही सापडते. सागराच्या दर घनमैल पाण्यात सुमारे पांच टन इतके युरेनियम असते.
भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात समुद्रकिनाऱ्यावर तसेच सिलोन देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर जी ‘मोनझाइट' वाळू मिळते. त्यात थोरियम हे किरणोत्सारी द्रव्य असते.


युरेनियम व थेरियम ही द्रव्ये अणुशक्ती अनुरूप आहेत. यामुळे अणुशक्ती निर्मितीकरिता या द्रव्यांना वापरले जाते. युरेनियमकरिता विशेष म्हणजे फार थोड्या युरेनियमपासून मोठ्या प्रमाणावर अणुशक्ती निर्माण होते.
उदा. एक पौंड युरेनियम निर्माण होणारी अणुशक्ती १५०० टन कोळसा . किंवा २ लक्ष गॅलन तेल जाळून उत्पन्न होणारी अणुशक्ती एवढी असते.


अणुशक्ती निर्माण होत असताना युरेनियम, प्लूटोनियम या द्रव्यांमधून जे कण व किरणे बाहेर पडतात ते मनुष्यप्राण्यांच्या जिवाला अपाय करणारे असतात. यामुळे व अणुशक्तीचा उपयोग मानवकल्याणाकरता करण्याच्या जागतिक ठरावामुळे अणुशक्तीला नियंत्रित केल्या गेले. अर्थातच भारतात असे यशस्वी प्रयत्न घडविण्याचे संपूर्ण श्रेय होमी भाभांकडे जाते. होईल त्या सर्व प्रयत्नांनी बुद्धिमत्तेने त्यांनी गंगेला भारतभूमीवर आणलेल्या भगीरथाप्रमाणे अणुशक्तीचे आकाशातून भारतभूमीवर अवतरण केले. एक अनमोल ठेवा भारताच्या इतिहासात स्थानापन्न झाला.


भारतात अगदी त्यावेळी हे अनमोल कार्य घडले ज्यावेळी प्रगतीच्या दृष्टीने भारत अगदी बाल्यावस्थेत होता, पण प्रतिभावंत भारतमातेच्या सुपुत्राने अगदी शून्यातून जग निर्माण करणारा प्रयत्न यशस्वी केला. आणि या भगीरथ यशाने डॉ. होमी भाभा खऱ्या अर्थाने आपल्या संशोधनकार्यात यशस्वी झाले.
अप्सरा
इ. स. १९४९ मध्ये भारतात लोकसभेत अणुउर्जाविषयी कायदा पास केल्याने या क्षेत्रातील प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्या. यामुळे मुंबई, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्व ठिकाणी अणुउर्जा केंद्रे स्थापित झाली. डॉ. होमी भाभांनी या सर्व केंद्रांना होईल ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले व अणुशक्ती कार्याला विशेष प्रगतीच्या वाटेवर आणले.
डॉ. होमी भाभांचे कार्य, त्यांच्यातील प्रतिभा यांचा भारत सरकारने संपूर्ण सन्मान केला. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण' व सन्माननीय डी. एससी. पदवी प्रदान केली. याबरोबरच अनेक भारतीय व विदेशी विद्यापीठाकडूनही यावेळी डॉ. होमी भाभांचा सन्मान केल्या गेला व पदव्या प्रदान केल्या गेल्या.
१९५५ मध्ये अणू उर्जेचा शांततामय व मानवी उपयोगाकरता जीनेव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरली. या परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान जागतिक एकमुखाने भारताला मिळाला. डॉ. होमी भाभा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडल्या गेले. प्रगत राष्ट्रात एकमुखाने भारताची गणना होण्याची ही पावती होती. जी डॉ. होमी भाभांमुळे भारताला मिळाली.


या परिषदेच्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. होमी भाभांनी अणुउर्जेचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगितले. विकासाकरिता अणुउर्जा अती महत्त्वपूर्ण आहे या वाक्यावर त्यांनी यावेळी आपल्या भाषणात विशेष भर दिला.
याआधी १९५४ मध्ये पंतप्रधान नेहरूजींच्या हस्ते मुंबईत अणुउर्जा मंडळाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते व याच दिवशी अणुउर्जा निर्मितीकरिता अणुभट्टी बांधण्याचा निर्णयही तेथे घेण्यात आला होता. त्यानुसार डॉ. होमी भाभांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शास्त्रज्ञांच्या सहाय्याने वर्षभरात 'अप्सरा' ही पहिली अणुभट्टी बांधली.


३० जुलै १९५६ रोजी या अणुभट्टीत अणुउर्जा निर्मितीचे कार्य घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण अणुभट्टीतील काही कमतरतेमुळे पहिला व दुसरा प्रयत्न फसला. पण डॉ. भाभांनी अणुउर्जा निर्मिती हे उचललेले एक आव्हान होते. त्यांचे दोन्ही प्रयत्न फसले म्हणून तिसऱ्या प्रयत्नाला पूर्णविराम दिला नाही. प्रयोग यशस्वी होईपर्यंत शास्त्रज्ञ हा फक्त प्रयोगाचाच असतो. पुन्हा भट्टी साफ केल्या गेली व त्यात अणुउर्जा निर्मितीकरिता लागणारे नवीन इंधन भरण्यात आले. आणि यावेळचा प्रयत्न यशस्वी झाला. ४ ऑगस्ट १९५६ या दिवशी 'अप्सरा' अणुभट्टी अणुउर्जा अवतरली.


भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली हा पौराणिक कथेतील इतिहास, पण कलियुगात डॉ. होमी भाभांनी भारतभूमीवर अणुउर्जेचे अवतरण केले हा उघड्या डोळ्यांनी बघितलेला यशस्वी प्रयोग ! मानवकल्याणाचे एक मोठे भांडार यामुळे भारताला लाभले आहे. मुंबईजवळ ट्रॉम्बे येथे ही अणुभट्टी बांधल्या गेली असून हिची उभारणी पाण्याच्या टाकीत केल्या गेली आहे. अणुभट्टीमध्ये अणुशक्तीपासून वीज व कृत्रिम किरणोत्सारी द्रव्ये तयार केल्या जातात. तयार होणारी कृत्रिम किरणोत्सारी द्रव्ये तात्पुरती किरणोत्सारी असतात. नैसर्गिक द्रव्याप्रमाणे यातील किरणोत्सार कायम स्वरूपाचा नसतो. 

कॅल्शियम, लोह, आयोडिन, कार्बन, फॉस्फरस, सोडियम ही द्रव्ये नैसर्गिक किरणोत्सारी नसतात पण या द्रव्यांवर अणुभट्टीत विशेष क्रिया घडवून त्यांना किरणोत्सारी करता येते.
वरील द्रव्यांना अॅल्युमिनिअम नळकांड्यात भरून ती नळकांडी आडव्या दिशेत परंतु युरेनियम लगडीच्या वर-खाली त्यांना काटकोन करतील अशा पद्धतीने ठराविक वेळेपर्यंत अणुभट्टीत घालून ठेवतात. यात भट्टीतील शून्यकणांचा अॅल्युमिनिअम नळकांड्यातील द्रव्यांवर भडिमार होतो व द्रव्य किरणोत्सारी होते. या कृत्रिम किरणोत्सारी द्रव्यांची किरणोत्सार करण्याची विशिष्ट कालमर्यादा असते. 

 अणुबाँब तयार करण्याकरता युरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्याचे अणू शास्त्रज्ञांनी वापरले आहेत. युरेनियमचा अणू सर्वात जड असतो. तर हायड्रोजनचा अणू सर्वात हलका. यावरून युरेनियमचा अणू हायड्रोजनच्या अणुपेक्षा दोनशे अडतीस पट जड असतो. या पटीलाच अणुभार म्हणतात. डॉ. भाभांनी अणूच्या सूक्ष्म रचनेचा अभ्यास करताना अनेक प्रयोग तपासले व नंतरच अणुभट्टीत त्याचा उपयोग केला व अणुउर्जा निर्मिती केली. अणुरचनेविषयी डॉ. होमी भाभांनी अधिक विस्तारपूर्वक नोंदी घेतल्या आहेत. युरेनियमच्या अणुकेंद्रात ब्याण्णव प्रोटॉन व एकशे सेहेचाळीस न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनची संख्या निरनिराळी व प्रोटॉनची सारखीच असते अणुकेंद्र असणाऱ्या अणूंना 'आयसोटोप' म्हणतात. हे अणू एकाच मूलद्रव्याचे पण निरनिराळ्या अणुभाराचे असतात.


दोनशे अडतीसमधील दोनशे पस्तीस अणुभाराच्या अणूचे केंद्र फारच अस्थिर असते. यात अतिवेगाने क्रिया घडते. एवढी की, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच यातील कणांची धाडधाड फाटाफूट होते.  शास्त्रज्ञांनी अणुबाँबकरिता म्हणूनच या युरेनियम अणूला वापरले आहे. अणुबाँबमध्ये युरेनियमचे अणू फोडायला त्याच्याच अणुकेंद्रकातील न्यूट्रॉन वापरतात. यात युरेनियम दोनशे पस्तीसचा एक भाग फुटून न्यूट्रॉन बाहेर पडतात. हे न्यूट्रॉन आणखी इतर अणवर आदळतात व साखळीने प्रचंड वेगात ही क्रिया घडते व प्रचंड अणुशक्ती निर्माण होऊन हाहाकार माजविणारा संहार स्पष्ट होतो.


ही सर्व क्रिया घडायला युरेनियम दोनशे पस्तीसचं ठरावित वस्तुमान म्हणजे ठराविक अणुसंख्या हवी असते. याला 'क्रिटिकल' वस्तुमान म्हणतात. यापेक्षा जराही अधिक वस्तुमान एकत्र आलं की, क्षणार्धात साखळीनं स्फोटाची क्रिया घडते व प्रचंड स्फोट होऊन अणुशक्ती निर्माण होते. अणुबॉम्बमध्ये यांत्रिक साहाय्याने असे तुकडे ठराविक वेळी एकत्र फेकले जातात. अणूच्या आकाराबद्दल लक्षात घ्यायचं झालं तर अणू हा एवढा लहान असतो की, 'टाचणीच्या टोकांवर सुमारे दहा लक्ष अणू सहज येतात.'
युरेनियम दोनशे पस्तीस हा शब्द खालील माहितीत विस्तारपूर्वक स्पष्ट झाला आहे. 'युरेनियम दोनशे पस्तीस म्हणजे २३५ अणूभाराचा युरेनियम.'


युरेनियम अणुभार २३५ हा युरेनियम अणुभार २३८ पेक्षा जास्त क्रियाशील असतो. यातून बाहेर पडणारे न्यूट्रॉन कण साखळीबद्ध प्रक्रिया घडवितात व प्रचंड स्फोट होतो.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी अणुशक्तीचा उपयोग संहारक अस्त्रात केल्या गेला, पण यामुळे जगाचा विनाश निश्चित होता. शास्त्रज्ञांनी अणुशक्तीचा उपयोग मानवकल्याणाकरिता तपासल्यानंतर त्यांना यश मिळाले. 'अणुशक्ती मानवकल्याणाकरिता उपयोगी ठरू शकते व तिच्यामुळे प्रगतीचा उच्चांक गाठता येईल' या डॉ. होमी भाभांच्या नोंदीचे सर्व जगाने सहर्ष स्वागत केले. अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेने पाण्याची वाफ तयार करतात व या वाफेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केल्या जाते. या वीजेमुळे उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात उर्जापूर्ती होते.

 या अणुउर्जेमुळे भविष्यात लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील उर्जेचा प्रश्न सुटला आहे. अणुभट्टी म्हणजे अणुउर्जेचे एक मोठे भांडारच जगाला लाभले आहे. फारच थोड्या इंधनापासून अणुभट्टीत रासायनिक क्रिया घडवून भरपूर अणुउर्जा मिळविता येते. याविषयी विस्तारपूर्वक पाहिले तर, 'तीस लक्ष टन दगडी कोळसा जाळल्याने जेवढी उष्णता निर्माण होते तेवढी उष्णता अणुभट्टीमध्ये फक्त बटाट्याएवढा युरेनियमचा तुकडा वापरल्याने निर्माण होते. एवढ्या उष्णतेच्या उपयोगाने पाण्याची वाफ करून त्या वाफेच्या शक्तीने जी वीज निर्माण होते, ती एका सर्वसाधारण घराला एक हजार वर्ष पुरू शकते. 


अणूबाँबमध्ये अणूशक्ती नियंत्रणाची क्रिया नियंत्रित केल्या जात नाही. कारण नियंत्रित उपयोगाकरिता त्याची निर्मिती नसतेच. मात्र अणूभट्टी नियंत्रित क्रिया असल्यामुळेच तिचा उपयोग मानव उपयोगी निर्मितीकरिता आहे.
या अणूशक्तीमुळे गेल्या पस्तीस वर्षात भारताची प्रशंसनीय प्रगती झाली आहे व यामुळे प्रगत देशाच्या शृंखलेत आज भारत उंच मानेने वावरतो आहे.
अणू उर्जा व अणू इंधन निर्मिती डॉ. होमी भाभांनी अणूउर्जा निर्मिती कार्यात रात्रंदिवस प्रायोगिक परिश्रम घेतले व अतिसूक्ष्मपणे प्रत्येक क्रियेचा पडताळा करून अणुभट्टीपर्यंत यशस्वी मजल गाठली आहे.
पायऱ्यांनी काम करणाऱ्या अणूभट्टीला अस्तित्वात आणले आहे. यामुळे अणूउर्जा निर्मितीबरोबरच इतर अणूभट्ट्यांकरिता लागणारे इंधनही तयार करता येते.


यातील पहिल्या पायरीमध्ये युरेनियम इंधन वापरून उर्जानिर्मिती व प्लुटोनियमसारख्या अणूइंधनाची निर्मिती केल्या जाते.
दुसऱ्या पायरीत प्लूटोनियम अणूइंजन वापरून त्याभोवती थोरियम द्रव्य ठेवून थोरियमच युरेनियम २३३ मध्ये रूपांतर केल्या जाते.
तिसरी पायरी ब्रिडर अणूभट्टीची आहे. या पायरीमध्ये थोरियमचे अधिक उत्पादन होते. यामुळे भारत अणूउर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.


अणूभट्ट्यांमध्ये उष्णता, प्रकाश व वेगवान कण या स्वरूपातील अणूशक्ती नियंत्रितपणे मिळविण्याकरिता 'कॅडमियम' धातूच्या कांबी भट्टीत ठेवतात. यामुळे फुटणाऱ्या युरेनियममधून बाहेर पडणाऱ्या न्यूट्रॉनपैकी काही न्यूट्रॉन कॅडमियम धातूमुळे क्रियेत सहभागी होत नाही. कॅडमियम धातू त्या काही न्यूट्रॉनना गिळंकृत करतो आणि याच परिणामाने अणूभट्टीमधून नियंत्रित अणूशक्ती मिळते अणुभट्ट्यांमधून शेवटी शिल्लक पडणारी राख सुद्धा उपयोगात आणल्या जाते. या राखेतील अणूंची, किरणोत्सर्जनाचे निरनिराळे कण व किरण बाहेर फेकण्याची शक्ती फार तीव्र असते.


 या बाहेर फेकल्या जाणाऱ्या कणांचा आणि किरणांचा अन्न जंतुरहित करण्याकरिता, रोगजंतूंचा नाश करण्याकरिता तसेच वनस्पती व प्राणी यांच्या आंतरिक घडामोडींचा अभ्यासक्रम करण्याकरिता उपयोग केल्या जातो. तळमळीचा महामेरु मौलाच्या अणुगर्भाचे कृत्रिमपद्धतीने भंजन करून त्यातून निर्माण होणारी प्रचंड उष्णता नियंत्रितपणे मिळावी व तिचा उपयोग मानवकल्याणाकरिता व्हावा. डॉ. होमी भाभांनी आपल्या अणूशक्ती प्रयोगात होईल ते सर्व प्रयत्न करून यशस्वी केले. हा डॉ. होमी भाभांच्या संशोधनातील एकमेव प्रयोग ठरतो.


अणूभट्टीतील प्रक्रियेत ‘अणुजल' हाही एक महत्त्वपूर्ण घटक असतो. अणूभट्टीत अणूभंजन मंद गतीने व्हावे म्हणून अणूजल वापरले जाते. सध्या पाण्याचे बऱ्याच काळापर्यंत विद्युत पृथकरण केल्याने उर्वरित पाणी अणूजलात रुपांतरित होते. डी२० या चिन्हाने अणूजलाला ओळखतात. साध्या पाण्याहून या अणूजलाचे गुणधर्म भिन्न असतात.
अणूशक्ती निर्मिती कार्याबरोबरच शास्त्रज्ञनिर्मितीचेही मोलाचे कार्य डॉ. होमी भाभांनी केले. डॉ. होमी भाभांच्या वेळी भारतात विज्ञानाची हवी तेवढी प्रगती नव्हती. उच्च शिक्षणाकरिता येथील प्रतिभाशाली विद्यार्थी परदेशी धाव घेत व तेथील मुबलकतेने तेथलेच होऊन जात. देशाच्या प्रगतीत बाधा आणणारी ही फार मोठी व महत्त्वपूर्ण बाब होती. डॉ. भाभांनी ही बाब प्रत्यक्षात बघितली असल्यामुळे त्यांना याबद्दल तळमळ लागून होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विज्ञानाला महत्त्वपूर्ण कक्षेत घेतल्या गेल्याने भाभांनी वरील बाबींवर यश मिळविले.


तुर्भे येथे भाभांनी प्रतिभावंत विद्यार्थ्यांकरिता विदेशाप्रमाणेच ज्ञानमंदिर उघडले. देशातील नंबर एक दर्जाच्या हुशार विद्यार्थ्यांचा त्यांनी या विद्यालयात प्रवेश सुरू केला. तसेच संशोधनाविषयीच्या संपूर्ण विषयालला त्यांनी येथे सुरू केले.  तुर्भेला डॉ. होमी भाभांनी अणूशक्ती निर्मितीचे जे कार्य सुरू केले. त्यात येणाऱ्या दिवसात अधिकाधिक प्रगती साध्य होण्याकरिता त्यांनी होईल तेवढ्या सर्व सोयी उपलब्ध केल्या.

 भविष्यात भारताचे स्थान अधिक मजबूतीने पकडीत ठेवण्याकरिता नव्या शास्त्रज्ञांची गंगा प्रवाहित केली. अणूशक्ती निर्मितीमध्ये पायरी दरपायरी यशश्री मिळवीत गेल्याने डॉ. होमी भाभांचा उत्साह अधिकाधित वाढत गेला व त्यामुळे अणूउर्जा क्षेत्रात अधिकाधिक प्रगती झाली व अणूउर्जेचे भांडार देशाच्या वाट्याला आले.
१९६० मध्ये कॅनडाच्या सहकार्याने 'सायरस' व १९६१ मध्ये 'झलिना' अणभट्टी डॉ. होमी भाभांनी कार्यान्वित केली व भारत प्रगत राष्ट्राच्या शृंखलेत स्थानापन्न झाला.


- अणुभट्टी उभारणीबरोबर डॉ. होमी भाभांनी अणुभट्ट्यांसाठी लागणारे इंधन, जडपाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी भारतातच उपलब्ध होणाऱ्या योजना राबविल्या.
१९६२ मध्ये नानगल येथे डॉ. होमी भाभांनी जडपाणी निर्मितीचा कारखाना उभारला व मुबलक जडपाण्याची नेहमीकरिता सोय उपलब्ध करून दिली.
१९६५ मध्ये डॉ. होमी भाभांनी 'ब्रीडर रिअक्टर' (निपजी अणूभट्टी) सुरू केली. आणि हा डॉ. भाभांचा शेवटचा प्रयोग ठरला. यानंतर ते इहलोकातून कायमचे संपले. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व कार्याबरोबरच तारापूर अणूबीज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पाची आखणीही डॉ. होमी भाभांनीच केली आहे.


संशोधनाबरोबर डॉ. भाभांनी अनेक निबंध व पुस्तकेही लिहिली. 'क्वांटम थिअरी', 'इलेमेंटरी फिजिकल पार्टीकल्स', 'कॉस्मिक रेडिएशन' ही त्यांची गाजलेली पुस्तके होय.
प्रतिभावंत संपन्नतेमुळे डॉ. होमी भाभांना विज्ञानविषयक कितीतरी देशविदेशाच्या परिसंवादात सम्मानित केल्या गेले. याप्रमाणेच जागतिक अणूविषयक परिषदांमध्येही त्यांना सन्मान मिळाला.
डॉ. भाभांचे संशोधन जगाने एकमुखाने मान्य केले आहे. या त्यांच्या गरुडझेपेमुळे भारताच्या बाबतीत एक चमत्कारच घडला ! कुण्याही प्रगत राष्ट्राला भारताबद्दल असे वाटत नव्हते की, अगदी अल्पवेळात भारत प्रगत राष्ट्रांच्या शृंखलेत उभा राहील. पण डॉ. होमी भाभांमुळे भारताला हा वाटा लाभला.


संशोधनाप्रमाणे चित्रकलेचीही डॉ. होमी भाभांना आवड होती. अनेक चित्रे त्यांनी या आवडीमुळे स्वतः काढली आहे. चित्रांचा संग्रह करण्याचाही त्यांना छंद राहिला. यात इतर चित्रकारांच्या चित्रांचाही ते समावेश करीत असत. या छंदामुळे बरेचदा ते चित्रपटप्रदर्शनास जायचे.
असे प्रतिभावंत व थोर कीर्तीचे डॉ. होमी भाभा अणूविश्वात उंच भराऱ्या घेत असताना अचानकपणे आपल्यातून कायमचे निघून गेले.

२४ जानेवारी १९६६ चा तो दिवस. डॉ. होमी भाभा, ज्यांच्यामुळे अणूविज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य बड्या राष्ट्रांच्या शृंखलेत भारत स्थानापन्न झाला. अणुयुगाची पहाट कर्तृत्वाने ज्यांनी दाखविली ते विमान अपघातात कायमचे संपले, भारताच्या वाट्याला आलेला तो दुर्दैवी दिवस !
डॉ. होमी भाभा इहलोकी संपले, पण असे खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही. महापुरुष त्यांच्या कार्यारूपाने नेहमी जीवंतच असतात. डॉ. होमी भाभांनी लावलेला अणूसंशोधनाचा दीप प्रतिदिवसाला अधिकाधिक तेजाने प्रज्वलित होत आहे.


डॉ. होमी भाभांनी केलेले कार्य भविष्याचे भांडार आहे. यामुळे प्रगतीची दारे भारतात नेहमीकरिता उघडली गेली आहेत.
अणूवीज निर्मिती, अणुबाँबचा उपग्रह उड्डान हा सर्व भाभांच्या यशस्वी संशोधनाचाच परिणाम होय. डॉ. होमी भाभांचे संपूर्ण जीवनातील कार्य भविष्यातील शास्त्रज्ञांकरिता स्फूर्तीचा जीवंत झरा आहे. अशा या थोर पुरुषास असंख्य प्रणाम !!!

dr homi bhabha information in marathi

giani zail singh information in marathi



झैलसिंग हे भारताचे सातवे राष्ट्रपती होत. शीख समाजातून राष्ट्रपती पदावर पोचलेले ते प्रथम शीख होत. त्यांना जर्नेलसिंग असेही म्हटले जात असे.


५ मे १९१६ रोजी या पंजाब पुत्राचा जन्म झाला. अवघ्या १५ व्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध झगडणाऱ्या अकालीदलाच्या राजकारणात प्रवेश केला. १९३८ मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर काम करणारी प्रजामंडल अशी चळवळ फरिदाबादमध्ये चालू केली. या ब्रिटिशांच्याविरुद्ध केलेल्या चळवळीमुळे त्यांना ५ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर झैलसिंग यांनी लोकसभेत काम केले. त्यांनतर १९७२ ते ७७ ते पंजाबचे मुख्यमंत्री होते.

giani-zail-singh-information-in-marathi
giani-zail-singh-information-in-marathi



१९७७ मध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतरही ते इंदिराजींना पाठिंबा देत राहिले. त्यामुळे १९८० मध्ये इंदिराजी पुनः सत्तेवर आल्यावर त्यांनी झैलसिंग यांना गृहमंत्रीपद देऊ केले. १९८२ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर त्यांचे नांव राष्ट्रपतीपदासाठी सुचविले गेले. चार महिन्यानंतर भारतीय सैन्याने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांना शोधण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. यामुळे शीख समाज चिडला आणि इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख रक्षकांनी हत्या केली. ( १९८४ ) त्यावेळी झैलसिंग यांनी राजीव गांधींना पंतप्रधान केले. 

थोड्याच दिवसात राजीव गांधी व झैलसिंग यांच्यात मतभेद होऊ लागले. नोव्हेंबर १९८४ मध्ये एका अपघातात भयंकर जखमी झाल्याने झैलसिंग यांचा मृत्यु झाला. झैलसिंग यांनी शीख धर्मग्रंथांचा विशेष अभ्यास केला होता. या धर्मग्रंथांवरील प्रभुत्त्वामुळे त्यांना ' ग्यानी ' असा किताब मिळाला होता.

giani zail singh information in marathi

vishwanath pratap singh information in marathi



१९८९ - ९० मध्ये विश्वनाथ प्रतापसिंह भारताचे पंतप्रधान बनले. जनतादल या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे ते नेते होते. बोफोर्सच्या मुद्यामुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता नि त्यामुळे व्ही. पी. सिंग पंतप्रधानपदावर आरुढ झाले. विश्वनाथ प्रतापसिंह यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. विश्वनाथ पाच वर्षांचे असताना मांडाचे राजा राम गोपाल सिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण डेहराडून व वाराणशी येथे झाले. त्यानंतर १९६९ मध्ये ते काँग्रेसपार्टीचे सभासद म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर आले.


१९७१ मध्ये ते लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले. १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. व्यापार खात्याचे उपमंत्री म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. १९७७ पासून त्यांना व्यापार खात्यातच राज्यमंत्रीपद मिळाले. १९८० साली इंदिराजी पुनः निवडून आल्या. त्याचसुमारास व्ही. पी. सिंग यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात पुनः भाग घ्यायला सुरूवात केली. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 

vishwanath-pratap-singh-information-in-marathi
vishwanath-pratap-singh-information-in-marathi


त्यावेळी फूलनदेवी वगैरे डाकूचा धुमाकूळ चालू होता. डाकूचा त्रास थांबलाच पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे अखेर त्यांनी १९८२ मध्ये राजीनामा दिला. १९८४ साली इंदिराजींनी त्याना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले.
१९८५ मध्ये राजीव गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांना आपल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून घेतले. या काळात त्यांनी मुंबई, कलकत्ता येथील व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. अबकारी कर चुकविणाऱ्या उद्योजकांना नोटीसा पाठवल्या. काळाबाजार करणाऱ्या व लोकांना लुटणाऱ्या प्रसिद्ध लोकांवर धाडी पडल्यामुळे जनता व्ही. पी. सिंग यांची स्तुती करू लागली. 

१९८७ मध्ये संरक्षण खाते व्ही. पी. सिंग यांच्याकडे आले. शस्त्रखरेदी प्रकरणावरून सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९८८ च्या अलाहाबाद निवडणुकीत सिंग हे निवडून आले आणि सर्व पक्षांचे पुढारी बनले. २ डिसेंबर १९८९ ला त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. परंतु गटागटातील भांडणामुळे भारतीय जनतापक्षाने जनता पार्टीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सिंग यांचे सरकार ७ नोव्हेंबर १९९० ला बरखास्त झाले व त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.


आर्थिक टंचाई, भाववाढ, रिकामा सरकारी खजिना अशा अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तरीही ते लोकप्रिय नेता होते आणि आपल्या उदारवादी विचाराबद्दल प्रसिद्ध होते.

vishwanath pratap singh information in marathi

varahagiri venkata giri information in marathi



वराहगिरी व्यंकटगिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते प्राणपणाने लढले. पुढे त्यांनी महात्मा गांधींचे अहिंसावादी तत्त्वज्ञान अंगिकारले. मजुरांचा संघटक म्हणून कार्याला सुरुवात करून पुढे त्या कार्याचे सनदशीर चळवळीत रुपांतर करणारा महान नेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आपल्या राष्ट्रीय इतिहासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव साऱ्या देशवासियांनी केला आहे. श्री गिरी यांचे सार्वजनिक आयुष्य विविधरंगी आणि विस्तृत आहे.

 राजकारणी, धडाडीने चळवळ चालविणारे, क्रियाशील, मुत्सद्दी, अनुभवी सल्लागार अशा अनेक क्षेत्रात ते यशस्वी ठरले आहेत. श्री. व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी ओरिसामधील बेहरामपूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव व्ही व्ही जोगिया पंतुतू. वयाच्या १२ व्या वर्षापासून छोट्या गिरींनी सार्वजनिक कार्याला सुरवात केली. आपल्या गावात तरुणांची एक संघटना व युवक मंडळ काढले.

varahagiri-venkata-giri-information-in-marathi
varahagiri-venkata-giri-information-in-marathi

 १३ व्या वर्षी गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देणारी संघटना काढली. सिनीअर केंब्रिजची परीक्षा पास झाल्यावर श्री गिरी हे १९१३ साली कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनला गेले. तेथे त्यांनी आयर्लंडमधील डब्लिनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड या संस्थेत नांव दाखल केले, त्या काळात आयरीश लोकांचा स्वातंत्र्यलढा तीव्र स्वरुपात चालू होता. डी. व्हॅलेरा यांचे तेजस्वी नेतृत्त्व जनतेला लाभले होते. गिरी या आंदोलनाकडे आकर्षिले गेले.

त्यांनी आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांना संघटित करुन त्यांची एक संस्था स्थापन केली. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वर्णविद्वेषी धोरणाविरुद्ध लढत होते. याचा परिणाम म्हणून गिरी यांच्या मनात आपल्या देशाच्या पारतंत्र्याबद्दल खंत निर्माण झाली. त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉरर ' या नावाची छोटी पुस्तिका लिहिली आणि अत्याचाराविरुद्ध पत्रके छापून भारतात पाठवली. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन गिरी यांनी रेडक्रॉसमध्ये नांव दाखल केले. 

परंतु गांधीजींच्या ब्रिटीश सरकारला सहकार्य करण्याचे धोरण न पटल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला. १९१६ मध्ये इस्टेर क्रांती झाली. गिरी यांच्यावर झडतीचे वॉरंट बजावण्यात आले आणि १ जुलै १९१६ ला त्यांना ब्रिटनमधून हद्दपार करण्यात आले. परत आल्यावर श्री. गिरी यांनी मद्रास हायकोर्टात अॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९१७ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९१८ मध्ये त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. १९१७ ते १९२२ गिरी हे काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते. परंतु त्यांच्या मनाचा खरा ओढा कामगार संघटनेकडे होता. 

त्यांनी रेल्वे कामगारांची अखिल भारतीय संघटना निर्माण केली. आयुष्यभर त्यांनी कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. १९५४ मध्ये गिरी यांच्या जीवनात मोठा कसोटीचा क्षण आला होता. ते केंद्र सरकारमध्ये मजूरमंत्री होते. मंत्रिमंडळाने बँक नोकरांच्या हिताविरुद्ध निर्णय दिल्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सार्वजनिक जीवनाचा त्यांचा अनुभवही मोठा होता. त्यांनी तीन राज्यांचे राज्यपालपद भूषविले आहे. सिलोनमध्ये ते भारताचे हायकमिशनर होते. ते उपराष्ट्रपतीपदावरही होते.


१९६२ ते १९६७ श्री गिरी हे भारताचे राष्ट्रपती होते. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सतत कामगारांच्या हिताचे रक्षणच केले. भारतातील मालक व मजूर या परस्पर विरोधी गटांना सांधणारा दुवा म्हणून त्यांनी जे काम केले ते अत्यंत महत्त्वपूर्ण होते.

varahagiri venkata giri information in marathi

rajiv gandhi information in marathi 



आधुनिक भारताची पायाभरणी करणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचे नांव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी प्रशासन व काँग्रेसपक्ष या दोहोंच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणला, त्याला नवी दिशा दिली. भारताला २१ व्या शतकाकडे नेण्यासाठी, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले.
२० ऑगस्ट १९४४ ला राजीवजींचा मुंबई येथे जन्म झाला. 

वडील फिरोज गांधी व आई इंदिरा गांधी. त्यांनाही आजोबाप्रमाणे प्राण्यांची खूप आवड होती. फोटोग्राफी व संगीत हे त्यांचे आवडते छंद होते. त्यांचे पारदर्शी, नितळ व्यक्तिमत्त्व, प्रेमळपणा, शांतपणा, हसतमुख चेहरा सारेच समोरच्यावर छाप पाडी. १५ फेब्रुवारी १९६८ रोजी सोनिया यांच्याबरोबर विवाह झाला.

rajiv-gandhi-information-in-marathi
rajiv-gandhi-information-in-marathi

राजीव व्यवसायाने पायलट होते आणि राजकारणात मुळीच रस नव्हता. पण त्यांचा भाऊ संजय याच्या अपघाती मृत्यूनंतर आईला ( इंदिराना ) सावरण्यासाठी ते राजकारणात उतरले. अमेठीतून निवडणूक जिंकून ते १९८१ मध्ये ते लोकसभेत आले. १९८३ मध्ये ते काँग्रेसपक्षाचे जनरल सेक्रेटरी नेमले गेले. ३१ ऑक्टोबरला इंदिराजी यांची हत्त्या झाली आणि राजीवना पंतप्रधानपद सांभाळावे लागले. आईसाठी शोक करायलाही त्यांच्याजवळ वेळ नव्हता. कारण देशाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली होती. १९८४ च्या निवडणुकीत राजीवना अमाप यश मिळाले. ४१५ खासदार त्यांच्याबरोबर होते. हा विक्रम आजतागायत कोणाला मोडता आलेला नाही. 


त्यानंतर त्यांनी पक्षांतरबंदीचा कायदा केला. जनतेमध्ये मि. क्लीन ' अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. अहिंसा व सहिष्णता ही दोन भारतीय तत्त्वेच जगाला शांततेची वाट दाखवू शकतील असे त्यांचे ठाम मत होते.
 विरोधकांना राजीव गांधींची लोकप्रियता सहन झाली नाही. १०४ ला विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान झाले. त्यांनी राजीव गांधी विरुद्ध बोफोर्स खटला दाखल केला. स्वीडनच्या बोफोर्स तोफा खरेदी करताना राजीवनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला. वास्तविक या तोफा कारगिलच्या युद्धात खूप फायदेशीर ठरल्या होत्या. 

पण या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या निमित्ताने राजीव गांधींचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न झाले. हे भूत १७-१८ वर्षे गांधी कुटुंबाच्या मागे होते. परंतु आता त्यांच्या मृत्यूनंतर १३ वर्षांनी त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे. १९८५-८६ या काळात भारतातील राजकीय वातावरण अतिशय ताणतणावाच झाले होते. अशा बिकट परिस्थितीतही राजीवनी त्या प्रक्षुब्ध वातावरणातील तणाव मोठ्या कौशल्याने काढला. पंजाब, आसाम, मिझोराम या राज्यांच्या संदर्भात समाधानकारक तोङगे काढले आणि सामंजस्याचे वातावरण प्रस्थापित केले.

 अतिरेक्यांनी पंजाबात हिंदू व शीख समाजात दुही माजवली होती. पंजाब करारावर अत्यंत कुशलपणे कार्यवाही करुन राजीवनी तेथे लोकशाही सरकार बनवले. आसाममध्ये परदेशी नागरीकांचा प्रश्न सोडवणे आवश्यक होते. पाकिस्तान व बांगला देशमधून आसामात बेकायदेशीरपणे घुसणारे नागरीक ही मोठी समस्या होती. कमालीची दक्षता बाळगून अखिल आसाम विद्यार्थी संघटनेबरोबर वाटाघाटी करून याही प्रश्नावर राजीवजींनी तोडगा काढला. सत्ताग्रहण केल्यानंतर आठच महिन्यात या तरुण पंतप्रधानांनी आसाम, पंजाब येथील जटिल प्रश्नांवर तोडगा काढला. 

कोणत्याही समस्येकडे पाहण्याची स्वप्नवतदृष्टी आणि मुत्सद्याला शोभणारी कार्यपद्धती यांचा सुरेख मेळ राजीवजींच्या ठायी होता. याचवेळी लाला हे मिझोना स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. पण मिझो सैनिकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडून, लालड़ेंगा यांच्याशी करार करून हा प्रश्नही त्यांनी अत्यंत चतुरपणे हाताळला व निकालात काढला. अशा तहेने तेथे शांतता प्रस्थापित करुन लोकशाही कार्यपद्धतीला चालना देणे हा आपला ध्यास पुरा केला.


यानंतर १९९१ च्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यासाठी प्रचारकार्य जोरात चालू होते. राजीवजी संरक्षण यंत्रणा सोडून लोकात मिसळत असत. याचीच देशाला भारी किंमत मोजावी लागली. असो. दिवसाचे १८-१८ तास त्यांची भ्रमंती चालू असायची. प्रचाराचा जोर वाढत होता. दक्षिण भारताच्या प्रचारदौऱ्याचा कार्यक्रम ठरला होता. परंतु ऐनवेळी त्यात बदल झाला आणि श्री पेरुम्बदर येथे जाण्याचे ठरविले गेले आणि तेथेच बॉम्बस्फोट होऊन राजीव गांधी यांची हत्त्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे सारा देश शोकसागरात बुडून गेला.


राजीवजींनी आपल्या कारकीर्दीत आर्थिक सुधारणांना हात घातला. त्यासाठी संगणकाची व दूरसंचार माध्यमाची आवश्यकता त्यांनी प्रथम हेरली. संपूर्ण देशात टेलिफोनचे जाळे विणले. भारत महासत्ता होत आहे. याचा पाया माहिती व तंत्रज्ञानात आहे. भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी आघाडी आज मिळवली आहे, त्याचा पाया घालण्याचे श्रेय भारताच्या या तरुण पंतप्रधान राजीव यांनाच द्यावे लागेल. दळणवळण व तंत्रविज्ञान या क्षेत्रात दूरगामी परिणाम घडविणारे धोरणात्मक निर्णय राजीव गांधींनी घेतले. 

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यांनी पंचायतराज कायद्यात सधारणा केल्या त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ३३% जागा राखून ठेवल्या गेल्या. काँग्रेसला नवे रूप देण्यासाठी पक्षाची संघटनात्मक सूत्रे तरुण नेतृत्त्वाकडे सोपविण्याचे महत्त्वाचे काम राजीव गांधी यांनी केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न' हा मानाचा किताब देण्यात आला.

rajiv gandhi information in marathi

r venkataraman information in marathi



श्री. वेंकटरामन् यांचा जन्म तामिळनाडूमधील राजमदम या खेड्यात ४ डिसेंबर १९१० रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी घेतली. त्यांचा विवाह श्रीमती जानकी यांच्याशी १९३८ मध्ये झाला. त्यांना तीन कन्या आहेत. मद्रास हायकोर्टात वेंकटरामन् यांनी १९३५ पासून पॅक्टिस सुरु केली. परंतु याच काळात ते भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीकडे ओढले गेले आणि 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली.

r-venkataraman-information-in-marathi
r-venkataraman-information-in-marathi


पुढे १९४७ ते १९५० वेंकटरामन् मद्रास बार फेडरेशनचे सेक्रेटरी होते. आपल्या कायद्याच्या करीयरमध्ये ते कामगारांसाठी विशेष कार्य करीत होते. १९४९ मध्ये त्यांनी एक कायद्याचे मासिक काढले, त्यांत कामगारांसंबंधीचे कायदे, त्यांची माहिती दिली जात असे. कामगार चळवळीत काम करीत असतानाच ते हळूहळू राजकारणाकडे ओढले गेले.


१९५० मध्ये ते विधानसभेमध्ये निवडून गेले. १९५३-५४ ला ते काँग्रेसपार्टीचे सेक्रेटरी होते. १९५७ मध्ये लोकसभेत निवडून आले असूनसुद्धा त्यांनी तेथे राजीनामा दिला व मद्रास सरकारमध्ये ते मंत्री म्हणून काम पाहू लागले. १९६७ पर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात मंत्री म्हणून कार्य केले. याच काळात मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पुढारी होते. सरकारमध्ये निरनिराळी अनेक पदे भूषविल्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. १९५३ ते १९६१ या काळात अनेकवेळा त्यांनी परदेशांना भेटी दिल्या.


अनेक विद्यापीठांकडून त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' च्या पदव्या मिळाल्या आहेत. कांचीपरम येथील शंकराचार्यांनी त्यांना 'सत सेवा रत्न ' असा किताब दिला आहे. ऑगस्ट १९८४ मध्ये श्री वेंकटरामन भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्याचवेळी ते राज्यसभेचे अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू अॅवॉर्ड समितीचे सदस्य, इंदिरा गांधी ॲवॉर्ड समितीचेही सदस्य अशी अनेक पदे ते भूषवीत होते. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडचे ते उपाध्यक्ष होते, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांचे कुलगुरुपदावरही ते कार्य करीत होते.
१९८७ मध्ये त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि २५ जुलै १९८७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ ग्रहण केली. ते भारताचे आठवे राष्ट्रपती होत.

r venkataraman information in marathi

pratibha patil information in marathi



देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
देशाची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ घटनात्मक प्रमुख नव्हेत, तर भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांचे व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असतात. अशा या प्रमुखपदी प्रतिभाताई पाटील यांची निवड ही केंद्रीय राजकारणाचा अनुभव; निष्कलंक चारित्र्य, निष्ठा व परिपक्वता या निकषांवर झाली आहे. आणि या नव्या जबाबदारीला त्या योग्य न्याय देतील, यात शंका नाही.

pratibha-patil-information-in-marathi
pratibha-patil-information-in-marathi

१९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव जिल्ह्यातील नाङगाव येथे प्रतिभाताईंचा जन्म झाला. त्यांचे एम. ए. पर्यंतचे कॉलेजशिक्षण जळगावातच झाले. कॉलेजमध्ये खेळातही आघाडीवर असणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यानंतर मुंबईत लॉ कॉलेजमध्ये एल्. एल्. एम्. ची पदवी घेऊन जळगावात वकिली चालू केली. पण त्यानंतर मात्र त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९८५ या काळात महाराष्ट्रात त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली. नगरविकास, शिक्षण, पर्यटन, संसदीय कामकाज, सार्वजनिक आरोग्य, सांस्कृतिक अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. 

त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची चिंता केली, त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी दर करण्याचा प्रयत्न केला. १९८५ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर वर्षभरात त्या उपसभापती झाल्या. १९८८ ते १९९० त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष होत्या. १९९१ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर मात्र त्या जणू राजकीय विजनवासात गेल्या.


तब्बल आठ वर्षानंतर २००४ मध्ये त्या राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झाल्या आणि पुन: राजकीय पटलावर दिसू लागल्या. प्रतिभाताईंचे पती देवीसिंह शेखावत अमरावतीचे महापौर होते. प्रतिभाताईंच्या राजकारणाला देवीसिंह यांची नेहमी साथ असते व ताईंच्या यशात देवीसिंह यांचा मोठा वाटा आहे. प्रतिभाताईंना ज्योती राठोड ही मुलगी व राजेंद्रसिंग हा मुलगा आहे.


 आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषविताना त्यांची सामान्य जनतेबद्दलची तळमळ सतत दिसून येते. कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात त्या कुशल आहेत. विरोधी पक्षनेत्या असताना सरकारवर जबरदस्त प्रहार करण्याची कुवत त्यांच्या ठिकाणी होती. अशा या करारी व्यक्तिमत्त्वाने आता राष्ट्रपतीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. दि. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली. सह्याद्री व सातपुड्याचे कडे ओलांडून राजस्थानातील अरवली पर्वत पार करून पाटील आडनांवाची ही धीरगंभीर महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या सिंहासनावर सन्मानाने विराजमान झाली आहे.

 पहिली मॅडम प्रेसिडेंट ' महाराष्ट्राने देशाला दिली आहे. साधी रहाणी व उच्च विचारसरणीचा वस्तुपाठ त्या आपल्याला देतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी वर्किंग वुमेन्स होस्टेलची स्थापना केली आहे. जळगावात इंजिनिअरिंग कॉलेज, साखर कारखाना, अंधांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भटक्या विमुक्तांसाठी शाळेची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे त्यांच्या स्वभावातच आहे, त्यानुसार त्या या पदावरून भरीव कामगिरी करून दाखवतील, अशी खात्री वाटते. परंपरा व “ प्रोफेशनॅलिझम' याचा अनोखा संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. त्यांच्या नव्या कारकीर्दीला अनेकानेक शुभेच्छा !! .

pratibha patil information in marathi

P. V. Narasimha Rao information in marathi


P. V. Narasimha Rao यांचे संपूर्ण नांव पामुलपति वेंकट नरसिंहराव. हे भारताचे नववे पंतप्रधान होत. १९९१ ते १९९६ ते पंतप्रधान होते. देशाचे पंतप्रधान होणारे ते दक्षिण भारतातील पहिले नेते आहेत.
नरसिंहराव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी करीमनगर येथेच झाले. वरंगळ येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेस, आर्यसमाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्याग्रह चळवळीत भाग घ्यायला सुरूवात केली. 

P-V-Narasimha-Rao-information-in-marathi
P-V-Narasimha-Rao-information-in-marathi

 हैद्राबादच्या निजाम सरकारच्या विरुद्ध बंड करून सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना निजाम सरकारच्या उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. तेव्हा त्यांनी आपले पुढील शिक्षण नागपूर विद्यापीठातून आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. ते बी. एस्. सी. एल्. एल्. बी. झाले आहेत.
 शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वत:ला वंदे मातरम् चळवळीत झोकून दिले होते. त्रिपूर येथे भरलेल्या काँग्रेस महासभेत त्यांनी भाग घेतला होता.

 हैद्राबाद काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सतत २० वर्षे ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. इ. स. १९५१ पासून ते अखिल भारत काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाह लागले. आंध्र प्रदेशच्या शासनात त्यांनी अनेकविध पदे व मंत्रिपदे सांभाळली. १९७१ ते ७३ आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. इ. स. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. चंदीगडला भरलेल्या अधिवेशनात त्यांनी राजनीति व विदेशी धोरण यावर अभ्यासपूर्ण भाषण दिले.

 १९७७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीत . जिंकले. १९७४ मध्ये ते पार्लमेंटच्या पब्लिक अकौंटस् कमिटीचे चेअरमन झाले. १९८० मध्ये ते विदेशमंत्री बनले. १९८० ते १९८४ ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात होते. १९८५ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातही ते होते. १९८९ साली ते चौथ्यावेळेला लोकसभेसाठी निवडून आले. त्यांनी विदेश मंत्रालय, गृहरक्षा, मानवविकास अशा विविध खात्यांवर मंत्री म्हणून कार्य केले आहे. २९ मे १९९१ या दिवशी ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. 

२१ जून १९९१ रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सीटीबीटी करार स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. १९९६ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते. परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा सोने गहाण टाकून देशाचा कारभार चालू होता. 

इतकी हलाखीची परिस्थिती होती. या परिस्थितीतून जनतेला कुठेही चटका बसू न देता नरसिंहराव यांनी गहाण टाकलेले सोने परत आणले आणि देशाचा रथही विकासाच्या मार्गावर आणून ठेवला. आर्थिक उदारीकरण हे अपत्य नरसिंहराव यांचेच आहे आणि याच्या पायावरच भारताची विकासाची गती सतत वाढत आहे. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष अल्पमतात आला आणि आघाडी शासन सत्तेवर आले. नरसिंहराव विरोधी पक्षाचे नेतत्त्व करू लागले.


ते जसे धुरंधर राजकारणी आहेत, तसेच ते साहित्य तपस्वीही आहेत. ते उत्तम तेलगू कथालेखक आहेत. तेलगू, मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भारतीय भाषांबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. तेलगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांची 'वेईपडिगळु' ही कादंबरी त्यांनी हिंदीत 'सहस्त्रकणा' या नावाने अनुवादीत केली आहे. मराठीतील पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचा त्यांनी तेलगमध्ये अनुवाद केला आहे. 'बहुभाषामेधावी ' अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी  इनसायडर' हे कादंबरीवजा आत्मवृत्त लिहिले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 

पाश्चात्य साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे अनेक भाषांवरचे प्रभुत्व व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टी अनेक नेत्यांना व जनतेला आकर्षित करणाऱ्या ठरल्या. सुसंस्कृत, विद्वान व ज्ञानयोगी अशा नरसिंहराव यांनी देशाचा गौरव सतत वाढता खला या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराचे २३ डिसेंबर २००४ ला निधन झाले.

P. V. Narasimha Rao information in marathi

neelam sanjiva reddy information in marathi


श्री. रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होत. ते एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात. 

neelam-sanjiva-reddy-information-in-marathi
neelam-sanjiva-reddy-information-in-marathi

सर्व थरातील लोकांशी संवाद साधणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. श्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म १९ मे १९१३ रोजी आंध्रप्रदेशातील रायलसीमा या अविकसित भागातील अनंतपूर येथे झाला. अडयार ( मद्रास ) येथील थिऑसॉफिकल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु त्या काळात स्वातंत्र्यचळवळीचे वारे जोरात वाहत होते. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि अनेकदा कारावास भोगला.

 या काळात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून आले. तरुण वयात त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली. दहा वर्षे ते या पदावर होते. मद्रास विधान सभेची १९४६ मधील निवडणूक त्यांनी सहज जिंकली आणि त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द सुरु झाली. १९४९ ते ५१ ते मद्रास राज्यात दारुबंदी मंत्री होते. १९५२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान स्वतंत्र आंध्रचा लढा यशस्वी होऊन टी प्रकाशम हे नव्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांना साथ देण्यासाठी श्री. रेड्डी हैद्राबादला परतले. मधे काहीकाळ ते पुन: १९५६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आले. 

१९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र अवघ्या चारच महिन्यांनी लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्यावर केंद्रीय पोलाद खात्याची जबाबदारी टाकली. पंतप्रधान शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्री. रेड्डी यांना पर्यटन खाते दिले. १९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत श्री. रेड्डी हिंदूपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आणि लोकसभेचे सभापती बनले. १९६९ ची निवडणुक हा श्री. रेड्डी यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय ठरला. जगजीवनराम आणि श्री. रेड्डी या दोघांमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. रेड्डी यांचीच निवड झाली.

 पण त्यांना व्ही. व्ही. गिरी या अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसही फुटली आणि इंदिराजींचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रपतीपदाचा हा हुकलेला योग श्री. रेड्डी यांच्यासमोर १९७७ मध्ये आला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून ते निवडून आले आणि लोकसभेचे सभापतीपद त्यांच्याकडे आले. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दिन अलि अहमद यांच्या निधनानंतर १९७७ मध्ये श्री. रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. परस्परांशी कमालीचा राजकीय संघर्ष असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी व श्री. रेड्डी यांना १९८० ते ८२ या काळात एकत्र काम करावे लागले. . वेंकटेश्वर युनिव्हर्सिटीने श्री. रेड्डी यांना  डॉक्टर ऑफ लॉज' ही डिग्री दिली.

neelam sanjiva reddy information in marathi

k r narayanan information in marathi


k r narayanan  यांचे संपूर्ण नांव नारायणन् कोचेरी रामन. २७ ऑक्टोबर १९२० ला केरळमधील उजावर या गावी एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होत. विद्यार्थीदशेपासूनच ते तल्लख बुद्धीचे हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी शिकवण्या करून व शिष्यवृत्त्या मिळवून केले. तिरुअनंतपुरमच्या महाविद्यालय व विश्वविद्यालयातून उत्तम गुण मिळवून ते पदवीधर झाले. १९५१ मध्ये त्यांचा विवाह माटिन्ट टिन्ट ( आताच्या उषा ) या ब्रह्मदेशीय महिलेशी झाला. 


सरुवातीच्या काळात त्यांनी व्याख्याते म्हणून कार्य केले. नंतर 'टाइम्स ऑफ इंडिया ' 'हिंदू' ( मद्रास ) अशा दैनिकांमधून पत्रकारीता केली. याचवेळी त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुढील शिक्षणासाठी ते खाना झाले. लंडनला असताना ते ' सोशल वेल्फेअर वीकली ( मुंबई ) ' या साप्ताहिकाचे लंडन येथील वार्ताहर म्हणून काम पहात असत. के. एम्. मुन्शी या साप्ताहिकाचे संपादन करीत असत. लंडनच्या वास्तव्यात नारायणन् यांचा परिचय जागतिक कीर्तीचे विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की यांच्याशी झाला. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नारायणन यांना मिळाले. 

१९४८ साली राज्यशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. प्रा. लास्की यांनी पंडित नेहरूंकडे नारायणन यांची शिफारस केली. १९४९ साली पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय विदेशी सेवेत घेतले. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आपली तल्लख बुद्धिमत्ता व व्यावसायिक राजनीति यांचा त्यांनी कुशलतेने योग्य असा वापर केला. कित्येक विदेशी राजनैतिक समस्या त्यांनी हुशारीने हाताळल्या.

k-r-narayanan-information-in-marathi
k-r-narayanan-information-in-marathi

भारताचे राजदत म्हणून त्यांनी थायलंड व तुर्कस्तान येथे काम पाहिले. भारताचे शिष्टमंडळ घेऊन ते रंगून, टोकियो, लंडन, ऑस्ट्रेलिया, हॅनोई या ठिकाणी गेले. १९६८ मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत-चीन संबंध बिघडले होते. भारताचे राजदूत या नात्याने के आर. नारायणन १९७६ मध्ये चीनला भेट देण्यास गेले. चीन-भारत संबंध पुनः प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. विदेशी सेवेतून मुक्त झाल्यावर विद्यापीठाचे उपकुलगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 त्याआधी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्रीय प्रशासनाचे व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले. वॉशिंग्टन येथे भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या पदावर ते चार वर्षे राहिले. १९७० मध्ये त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. वॉशिंग्टनमधील जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला. लोकसभेत त्यांची नियोजन आणि पाणीखाते, परराष्ट्र व्यवहार, आणि विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून निवड झाली. पुढे भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर त्यांची एकमताने निवड झाली.


२५ जुलै १९९७ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. ' मेमोरियल फंड ', ' इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च' अशा अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. 'एसेज् इन अंडरस्टैंडिंग ', 'नॉन अलायनमेंट इन कंटेंपरी इंटरनॅशनल रिलेशन्स इन इंडिया अँड अमेरिका ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यात भारतीय राजनैतिक धोरणावर भाष्य केले आहे. इ. स. २००२ पर्यंत नारायणन राष्ट्रपती पदावर होते.

k r narayanan information in marathi