थोरव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
थोरव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

dr shankar dayal sharma information in marathi 
डॉ. शंकर दयाळ शर्मा हे आपले राष्ट्रपती अतिशय विद्वान होते. त्यांनी पीएच डी. ही पदवी तर मिळवली होतीच, पण इतरही अनेक विद्यापीठांच्या पदव्या त्यांनी संपादन केल्या होत्या. त्यांचे शिक्षण अलाहाबाद युनि. केंब्रिज युनि. व हॉवर्ड लॉ स्कूल येथे झाले. इंग्लिश साहित्यात त्यांनी एम. ए. पदवी मिळवली. मग लखनौ विद्यापीठातून एल. एल. एम्. ही पदवी घेतली. तेव्हा ते विद्यापीठात प्रथम आले होते. लखनौ विद्यापीठाकडून त्यांना चक्रवर्ती गोल्ड मेडल मिळाले होते. केंब्रिज युनिर्व्हसिटीतून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. ते केंब्रिज व लखनौ या दोन्ही विद्यापीठांमध्ये कायद्याचे प्राध्यापक होते.

dr shankar dayal sharma information in marathi
dr shankar dayal sharma information in marathi 


लखनौमध्ये १९४० मध्ये त्यांनी आपली वकिलीची पॅक्टिस करायला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता व तुरुंगवासही भोगला होता. पुढे त्या वेळच्या भोपाळ राज्याचे ते मुख्यमंत्री झाले. १९७४ ते १९७७ त्यांनी मध्यप्रदेश सरकारमध्ये अनेक खात्यांची मंत्रीपदे सांभाळली. याशिवाय भोपाळ काँग्रेस कमिटी, इंडियन नॅशनल काँग्रेस आदि संस्थांचे ते अध्यक्ष होते. 'ऑल इंडिया काँग्रेस कमिटी ' चे ते ३२ वर्षांपेक्षा अधिककाळ सदस्य होते. ते आंध्र प्रदेश, पंजाब व महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ३ सप्टेंबर १९८७ पासून ते भारताचे उपराष्ट्रपती झाले.

 ते उपराष्ट्रपती असताना दिल्ली युनिव्हर्सिटी, पंजाब युनिव्हर्सिटी व पाँडेचरी युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होते. एकंदर २२ विद्यापीठांचे ते कुलगुरू होते. केंब्रिज युनिव्हर्सिटीने त्यांना मानाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी दिली. अनेक विद्यापीठांमधून त्यांनी पदवीदानप्रसंगी भाषणे केली आहेत. 'डॉक्टर ऑफ लॉ', 'डॉक्टर ऑफ सोशल सायन्सेस', 'डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ', 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' अशा अनेक पदव्या त्यांना भारतातील व भारताबाहेरील विद्यापीठांकडून मिळाल्या आहेत.

' इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स', 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन ' अशा अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते. २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांनी परदेशात अनेक शिष्टमंडळे नेली आहेत. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी त्यांना 'राष्ट्ररत्नम्' असा किताब दिला. श्रवणबेळगोळच्या गुरुनी त्यांना 'धर्मरत्नाकर' अशी पदवी दिली. इंटरनॅशनल बार असोसिएशनने त्यांना ' द लिव्हिंग लीजंड ऑफ लॉ' हा पुरस्कार दिला. त्याची ग्रंथसंपदा :

1) Jawaharlal Nehru - Selected Speaches
2) Horizons of Indian Education
3) For a better Future
4) The Democratic process 
5) Aspects of Indian Thought
6) Our Heritage of Humanism 
7) मंजुषा 
8) एकत्व के मूल 
9) पंडित जवाहरलाल नेहरू
आणि आणखी कित्येक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

dr shankar dayal sharma information in marathi

dr sarvepalli radhakrishnan information in marathi 
भारतीय संस्कृती, वैदिक हिंदू धर्म, भारतीय तत्त्वज्ञान यांचा परिचय जगाला करून देण्याचे फार मोठे कार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे आधुनिक जगातले एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते, तत्त्वज्ञ होते. परकीय इंग्रजी सत्तेने राजकीय स्वातंत्र्य तर हिरावून घेतलेच होते परंतु इतरही क्षेत्रात भारताची पिछेहाट चालू होती. अशावेळी भारतीय तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे, हे डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला पटवून दिले. शुद्ध चारित्र्य, विशाल बुद्धिमत्ता, सर्व धर्माच्या विचारांबद्दल सहिष्णुता आणि जगभर फिरून आपल्या प्रभावी वाणीने जगाला घडविलेले भारताचे खरेखुरे दर्शन यामुळे त्यांना श्रेष्ठ ऋषिमनींप्रमाणे मान दिला जातो. 

dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi
dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi


ते जसे थोर तत्त्वज्ञ होते तसे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होते. अविरत ज्ञानोपासना व कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे डॉ. राधाकृष्णन हे चालताबोलता ज्ञानकोशच होते. म्हणूनच आपण त्यांचा जन्म दिवस · शिक्षकदिन ' म्हणून साजरा करतो. या दिवशी गुरुजनांचा सत्कार करुन आपण या ज्ञानयोग्याला, तेजाचा वारसा सांगणाऱ्या महान पुरुषाला आदरांजली वाहतो.


डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुपतीजवळ असणाऱ्या तिरुतानी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी झाला. त्यांच्या घरचे वळण कट्टर वैष्णवपंथी, श्रद्धाळू, होते. त्यांचे वडील वीरस्वामी आणि आई सीताम्मा, दोघेही धार्मिक श्रद्धाळू, सत्त्वशील होते. घरच्या धार्मिक संस्कारांचा ठसा डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारसरणीवर पडलेला दिसतो. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिरुपती येथे झाले. पंधराव्या वर्षी ते मॅटिक झाले. त्यांना अध्यात्माची गोडी होती व वाचनाची खूप आवड होती. आपला सर्व वेळ ते ग्रंथांच्या सहवासात घालवीत असत. त्यांनी उच्च शिक्षण वेल्लोर व मद्रास येथे घेतले.


 अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा वेदांतातील नीतिशास्त्र' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. राधाकृष्णन एम्. ए. झाले आणि उत्कृष्ट अध्यापक म्हणून प्रसिद्धीस आले. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नेमले. १९२१ मध्ये मैसूर विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख नेमले. मैसूर विद्यापीठात असताना त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्त्व सांगणारे ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले. या ग्रंथांनी त्यांना भारताबाहेरच्या जगात प्रसिद्धी दिली. १९२६ मध्ये ऑक्सफर्ड येथे व्याख्याते म्हणून त्यांना बोलावण्यात आले.


१९२६ साली इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद भरली. तेथे कलकत्ता विद्यापीठाने डॉ. राधाकृष्णन यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले. त्यांनी ही परिषद आपल्या ओजस्वी व वक्तृत्त्वपूर्ण भाषणांनी गाजविली. उंच शरीरयष्टी, स्वच्छ तलम धोतर, बंद पद्धतीचा पांढरा शुभ्र फेटा, सोनेरी फ्रेमचा चष्मा अशी डॉ. राधाकृष्णन यांची तेजस्वी मूर्ती ओघवत्या इंग्रजी भाषेत धर्माबद्दल विवेचन करू लागली की श्रोते दंग होऊन जात. इंग्लंडच्या विद्यापीठातील त्यांची हिंदूंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ' ही व्याख्यानमाला फार गाजली. पुढे ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. परदेशातील लोकांना त्यांनी हिंदूधर्म आणि तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.

 ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, त्यासाठी आपण अंतर्मख बनले पाहिजे, असे ते सांगत. आंध्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही मानाची पदवी दिली व त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे ब्रुसेल्स, झेकोस्लोव्हाकिया या विद्यापीठांनीही त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली.
१९३१ मध्ये डॉ. राधाकृष्णन आंध्र युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी आंध्र युनिव्हर्सिटीची खूपच भरभराट केली आणि तिचा शैक्षणिक दर्जा वाढवला. डॉ. राधाकृष्णन कलकत्ता, आंध्र व बनारस या विद्यापीठांचे उपकुलगुरु होते. भारत सरकारने नेमलेल्या 'युनिव्हर्सिटी कमिशन ' चे ते अध्यक्ष होते. नवीन पिढीला मानवता व प्रेम यांचे संस्कार देणारे शिक्षण व उत्तम शिक्षक पाहिजेत त्याकरिता शिक्षण आयोग स्थापन झाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.


'पूर्व आणि पश्चिम', 'धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृती', हिंदुस्थानचे अंत:करण' ( भारतीय धर्म व संस्कृतीवरची व्याख्याने ) असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रो. मूरहेड यांच्याबरोबर 'आधुनिक भारतीय तत्त्वज्ञान' हा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे. १९३६ मध्ये ऑक्सफर्ड येथे ‘पौर्वात्य धर्म आणि नीति ' या विषयाकरीता त्यांना प्रोफेसर म्हणून नेमण्यात आले. तिथल्या मुक्कामात विशेष परिश्रमपूर्वक अभ्यास करून “ पौर्वात्य धर्म आणि पाश्चिमात्य विचार" हा अभ्यासपूर्ण ग्रंथ तयार केला. १९३६ ते १९३९ या काळात त्यांनी 'म. गांधी गौरवग्रंथ ' तयार केला. भगवद् गीतेवरही त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. १९३९ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले. येथे त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट घेतले. १९४२ मध्ये स्वातंत्र्यचळवळीचा
आंदोलनाचा महत्त्वाचा काळ होता. त्यावेळी राधाकृष्णन यांनी विद्यापीठ बंद ठेवले. पुढे हे विद्यापीठ त्यांनी अतिशय भरभराटीस आणले.

१९४६ मध्ये देशात काळजीवाहू सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांना युनेस्कोच्या पहिल्या परिषदेकरिता 'भारताचे प्रतिनिधी ' म्हणून पाठवले होते. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना झाली ती, त्यांच्याच अध्यक्षतेखाली. १९४९ मध्ये पंडित नेहरू यांनी डॉ. राधाकृष्णन यांची नेमणूक मॉस्कोमध्ये राजदूत म्हणून केली. तेथेही त्यांनी राजदूत म्हणून आपली स्वतंत्र शैली निर्माण
केली, भारत व रशिया यांच्यातील मैत्री व सहकाराचा पाया घातला. १९५२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपती म्हणून नेमणूक झाली. 

अनेक परदेश दौरे करून त्यांनी साऱ्या जगाला हिंदूधर्म व तत्त्वज्ञान यांचे श्रेष्ठत्त्व पटवून दिले. पुरातन वैदिक धर्माची तत्त्वे आधुनिक जगात उपयुक्त ठरतील, त्यांचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांना शिकवले. त्यांच्या शिकवणुकीला जगभर मान्यता मिळाली. साऱ्या जगभर फिरून त्यांनी जगात भारताची शान वाढवली. त्यांचे सारे कार्य लक्षात घेऊन सरकारने १९५८ मध्ये त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब दिला. १९५६ मध्ये त्यांच्या पत्नी शिवकामम्मा मृत्यु पावल्या. हे दुःख त्यांनी धीराने सहन केले. १९५७ मध्ये ते दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती झाले. 

१९६२ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. सरकारच्या हालचाली, विरोधी पक्षांची टीका या साऱ्यांची ते माहिती करून घेत असत. त्यांच्या राहणीत भपका वा दिखाऊपणा नव्हता. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांची राहणी अगदी साधी होती. लोकसभेच्या सभासदाना ते भेटत असत. पंडित नेहरू त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत. अशा त-हेने त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रपतीपदाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रांना भेटी देऊन जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अनेक मित्र मिळवून दिले.


भारत चीन युद्धानंतर पंडित नेहरू व डॉ. राधाकृष्णन यांच्यातील संबंधांना तडा गेला. १९६४ साली पंडित नेहरूंचा मृत्यु झाला. त्यानंतर गुलजारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देवविली. १९६५ मध्ये भारत-पाक युद्ध सुरु झाले. या युद्धातील विजयानंतर मात्र त्यांना खरा आनंद झाला. परंतु लालबहादूर शास्त्रींचे अचानक निधन झाले.

१९६६ - ६७ च्या सुमारास इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये राष्ट्रपतीपदावर दुसरी व्यक्ती असावी, असा मतप्रवाह चालू झाला. तेव्हा १९६७ मध्ये डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले. त्यानंतर ते मद्रासला आपल्या ‘गिरीजा ' या निवासस्थानी राहू लागले. १९६८ मध्ये भारतीय विद्याभवनने त्यांना 'ब्रह्मविद्याभास्कर' अशी पदवी दिली. ते आपल्या घरी सतत पुस्तकातच रमले. पुढे प्रकृती ताप देऊ लागली आणि १७ एप्रिल १९७५ रोजी एका ऋषीतुल्य आयुष्याची समाप्ती झाली.

 डॉ. राधाकृष्णन यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचे निधन झाले. सौजन्य, साधेपणा व शालीनता तसेच विद्वत्ता लाभलेल्या या श्रेष्ठ तत्त्वचिंतकाचा आत्मा अमरत्त्वात विलीन याला डॉ. राधाकृष्णन स्वत: मोठे शिक्षक असल्याने त्यांचा जन्मदिन आपण  शिक्षक दिन ' म्हणून पाळतो, गुरुजनांचा आदर करतो. त्यांचे कार्य त्यांच्या ग्रंथांच्या स्वरुपात चिरस्थायी झाले आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या अमर मूल्ल्यांची सतत महती गायली आहे. एक थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, मुत्सद्दी आपल्यातून निघून गेला असला तरी आधुनिक भारतातील या ज्ञानयोगी ऋषीची प्रतिमा आपल्या अंत:करणावर सतत कोरलेली राहील. त्यांचे चिरंतन स्वरूपाचे ग्रंथ आपल्याला सतत ज्ञानदान करीत राहतील.

dr sarvepalli radhakrishnan information in marathi

dr manmohan singh information in marathiजगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे आपले  पंतप्रधान होते . १९८२ ते ८५ ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. या नात्याने त्यांनी भारतातील चलनावर म्हणजे नोटांवर स्वत:ची स्वाक्षरी नोंदवलेली होती. तेव्हा चलनातील नोटांवर स्वाक्षरी असलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था निकोप केली आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळवली. त्यांनी अर्थमंत्री असताना खुले आर्थिक धोरण अंमलात आणले. 

भारतातील खाजगीकरण आणि खुली अर्थव्यवस्था ही त्यांची भारताला देणगी आहे. डॉ. सिंग हे भारताचे पंतप्रधान होणे, ही अनेक अर्थांनी लक्षणीय घटना आहे. ते लौकिकार्थाने राजकारणी नव्हेत. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते अर्थमंत्री होते. डॉ. सिंग यांनी १९९१ साली जेव्हा अर्थखात्याची सूत्रे हातात घेतली तेव्हा देशाचे अर्थकारण पूर्णपणे विस्कटलेले होते. 

dr-manmohan-singh-information-in-marathi
dr-manmohan-singh-information-in-marathi


२० टन सोने लंडन येथील बँकेत तारण ठेवावे लागले होते. परकीय चलनाचा खडखडाट, गुंतवणुकीसाठी भांडवलाचा अभाव, विदेशी गुंतवणूक नाही, पेट्रोलियमच्या वाढत्या किंमती अशा बिकट परिस्थितीतून नरसिंहराव आणि डॉ. सिंग यांनी देश बाहेर काढला. त्यामुळेच त्यांची अर्थकारकीर्द गाजली.
पश्चिम पंजाबमधील झेलम जिल्ह्यात गाह या छोट्याशा खेडेगावात २६ सप्टेंबर १९३२ ला मनमोहन सिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव अमृत कौर आणि वडिलांचे नांव गुरुमित सिंग. मनमोहन पाच महिन्यांचे असतानाच मातेचे छत्र हरविल्यामुळे
 
आजीनेच त्यांचा सांभाळ केला. मार्च १९४७ ला त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि फाळणीचे दंगे सुरु झाले. त्यात आजोबा मारले गेले. आजी व नातू कसेबसे भारतात आले. पेशावरला असलेले वडीलही भारतात पोचले आणि मनमोहन यांचे एक नवे आयुष्य सुरु झाले. हिंदू कॉलेज' मधून मनमोहन यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली, चंदीगड विद्यापीठातून एम्. ए. केले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले. तेथून परत आल्यावर ते पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

 त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्डला जाऊन डी. फिल. केले. भारतात परतल्यावर  दिल्ली स्कूल ऑफ अिकॉनॉमिक्स' मध्ये त्यांनी नोकरी पत्करली. मध्यंतरी १४ सप्टेंबर १९५८ ला त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नांव गुरुशरण कौर. त्यांना तीन कन्या आहेत व त्याही उच्च विद्याविभूषित आहेत. १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी डॉ. सिंग यांची नियुक्ती विदेशी व्यापार विभागात आर्थिक सल्लागार म्हणून केली. त्यानंतर अर्थखात्यामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना नेमले.

 १९७६ मध्ये त्यांना अर्थसचिव केले. १९८० मध्ये त्यांना योजना आयोगाचे सदस्य सचिव नेमले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनवले. त्यांची ही कारकीर्द फार महत्त्वाची ठरली. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. या पदाच्या कारकीर्दीत ते आर्थिक सुधारणांचे जनक ठरले. आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून त्यांनी कोट्यावधी मध्यमवर्गीयांचे जीवन बदलून टाकले आणि देशाच्या औद्योगिक जगताच्या विचारधारेत बदल घडवून आणले.

 त्यांनी अर्थव्यवस्था खुली केली, गॅट करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारतीय उद्योगांना नवी दिशा मिळाली, परकीय गुंतवणूक देशात येण्याचे मार्ग मोकळे झाले. डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेले मानसन्मान १) १९५५ व १९५७ ला केंब्रिज विद्यापीठातून मानसन्मान २) १९५६ मध्ये अॅडस्मिथ पुरस्कार ३) १९८७ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार ४) १९९३ मध्ये उत्कृष्ट जागतिक अर्थमंत्र्याचा युरोमनी पुरस्कार ५) १९९३ व १९९४ मध्ये उत्कृष्ट आशियाई अर्थमंत्र्याचा एशियामनी पुरस्कार डॉ. सिंग यांचे व्यक्तिगत चारित्र्य अगदी लखलखीत असल्यामुळे कोणालाही त्यांच्यावर वैयक्तिक टीका करता येत नाही. त्यांची राहणी गांधीवादी धाटणीची आहे. 

कोणत्याही प्रकारची छानछोकी, अरेरावी त्यांच्यात नाही. परंतु जी अर्थनीति त्यांनी राबवली, त्यातून आधुनिक सुबत्तेची अर्थकेंद्रे निर्माण झाली. अशा त-हेने डॉ. मनमोहन आपले पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत देशविदेशामध्ये अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. नामवंत संस्थांवर काम केले आहे. नामवंत अर्थतज्ञ म्हणून त्यांची जगात ख्याती आहे. आता त्यांनी पंतप्रधानपदाचा काटेरी मुकुट परिधान केला आहे. त्यांना आपले स्वच्छ चारित्र्य, ज्ञान, अनुभव, आर्जवी स्वभाव, मनमिळाऊपणा आदि सारी स्वभाव वैशिष्ट्ये पणाला लावावी लागणार आहेत. तेव्हा या ऋषितुल्य नेत्याला मनापासून शुभेच्छा !!

dr manmohan singh information in marathi

Chandra Shekhar information in marathi चंद्रशेखर हे भारताचे आठवे पंतप्रधान होत. ते १० नोव्हेंबर १९९० ला पंतप्रधान झाले तेव्हा देशाची आर्थिकस्थिती अगदी डबघाईला आली होती. त्यामुळे आपल्या देशावर सोने परदेशात गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे चंद्रशेखरांवर फार मोठे संकट आले. तरीही त्यांचे सरकार सात महिने तग धरुन राहिले.
चंद्रशेखर यांचा जन्म इब्राहीमपट्टी या उत्तर प्रदेशातील गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात १ जुलै १९२७ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नांव चंद्रशेखर सदानंदसिंग. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यातच झाले. 


Chandra-Shekhar-information-in-marathi
Chandra-Shekhar-information-in-marathi

१९४५ साली त्यांनी जॉर्ज मेमोरियल शाळेमधून मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह दुजादेवी यांच्याशी झाला. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात एम्. ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर 'राजकीय चळवळीवरील आर्थिक सिद्धातांचा परिणाम' हा विषय त्यांनी पीएच्. डी. च्या संशोधनासाठी निवडला होता. परंतु याचवेळी ते आचार्य नरेंद्रदेव यांच्या प्रभावामुळे समाजवादी चळवळीकडे आकृष्ट झाले आणि उत्तर प्रदेश शाखेचे ते पूर्णवेळ सहसचिव झाले. १९५५ मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली आणि राज्यसभेत प्रवेश केला.

 यानंतर चंद्रशेखर यांच्या राजकीय विचारांना अशोक मेहता यांच्यामुळे कलाटणी मिळाली व ते काँग्रेसपक्षात १९६५ मध्ये दाखल झाले. ते त्यावेळी काँग्रेसमध्ये तरुणतुर्क' या नावाने ओळखले जात असत. इंदिरा गांधींसाठी त्यांनी प्रचार केला आणि  सिंडिकेट ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकडीविरुद्ध पक्षांतर्गत बंड पुकारले. काँग्रेसपक्षात फूट पडली, तेव्हाही त्यांनी इंदिरा गांधीना साथ दिली आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण, राजे लोकांचे तनखे रद्द करणे इ. दहाकलमी आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेतला. 'गरीबी हटाव' हा लोकाभिमुख कार्यक्रम ही चंद्रशेखर यांचीच अभिनव कल्पना होती.

परंतु सत्ता हाती आल्यावर इंदिराजीनी प्रजेची उपेक्षा केली. त्यांच्या व्यक्तिकेंद्रित निर्णयाविरूद्ध चंद्रशेखर यांनी 'यंग इंडिया' या साप्ताहिकातून घणाघाती टीका केली. तेव्हा इंदिराजी नाराज झाल्या. त्यांनी चंद्रशेखर यांना नजरकैदेत ठेवले. जयप्रकाश नारायण यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी संपूर्ण क्रांतीची चळवळ १९७४ मध्ये सुरु केली. तेव्हा चंद्रशेखर यांनी त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेसपक्ष सोडला. आणीबाणीत चंद्रशेखर यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या संबंधीचे अनुभव चंद्रशेखर यांनी ' मेरीजेल डायरी' या पुस्तकात सांगितले आहेत.


चंद्रशेखरांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जनता खूष होती. त्यामुळे त्यांना जनतादलाचे अध्यक्षपद देण्यात आले. १० वर्षे त्यांनी या पदाची धुरा सांभाळली व पक्षात फूट पडू दिली नाही. त्यांनी कन्याकुमारीपासून राजघाटापर्यंत सुमारे ४२६० कि. मी. एवढी प्रदीर्घ पदयात्रा केली. १९८८ मध्ये लोकदल व अन्य काही पक्ष एकत्र येऊन जनतादल या नवीन पक्षाची स्थापना झाली. चंद्रशेखर यांनी १० नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि आपल्या सरकारवर विश्वास संमत करुन घेतला. त्यांचे धोरण समन्वयवादी होते. काश्मीरप्रश्न चर्चेने सोडवावा, या मताचे ते होते.

 पुढे काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांचे शासन १९९१ मध्ये संपुष्टात आले.  त्यांच्या बालिया मतदारसंघातून ते सातत्याने लोकसभेवर निवडून येत असतात. मात्र आता त्यांच्या पक्षाचे ते एकांडे शिलेदार आहेत. ते समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. पंतप्रधान असतानासुद्धा त्यांची राहणी अगदी साधी होती. त्यांचा पोशाखही साधाच होता. विश्वास व सद्भाव या गुणांमुळे त्यांनी देश संघटित करण्याचा प्रयत्न केला. देशात व परदेशात अनेक भाषणे केली, त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा दिसून येतो. त्यांना ८ जुलै २००७ रोजी देवाज्ञा झाली.

Chandra Shekhar information in marathi

babu rajendra prasad information in marathiस्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान बाबू राजेंद्रप्रसाद यांना मिळाला. १९५० - १९६२ या कालखंडात ते राष्ट्रपतीपदावर होते. त्याग, सौजन्य, विद्वत्ता, निष्ठा, उदारता या साऱ्या गुणांचा त्यांच्यामध्ये संगम झालेला होता.


राजेंद्रप्रसाद यांचा जन्म बिहार मधल्या जीरादेई या गावी ३ डिसेंबर १८८४ रोजी झाला. त्यांचे वडील महादेवप्रसाद हे जमीनदार होते. त्यांची आई कामेश्वरी ही धार्मिक वृत्तीची गृहिणी होती. बाबूजींचे प्राथमिक शिक्षण मौलवीकडे झाले. त्यांची बुद्धी अतिशय तीव्र होती. १९०२ साली ते मॅट्रिकची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी ते कलकत्त्याला प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जाऊ लागले. येथून ते एम्. ए. व एल्. एल्. एम्. झाले. या कॉलेजमधील प्राध्यापक प्रफुल्लचंद्र रे आणि जगदीशचंद्र बोस यांचा बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वावर फारमोठा प्रभाव पडला आहे.

babu-rajendra-prasad-information-in-marathi
babu-rajendra-prasad-information-in-marathi


 राजेंद्रबाबूंनी काहीकाळ अध्यापनाचे काम केले. पण नंतर त्यांनी १९११ मध्ये कलकत्ता हायकोर्टात वकिली करायला प्रारंभ केला. प्रामाणिकपणा, सचोटी, कायद्याचा सूक्ष्म अभ्यास आणि विस्तृत व्यासंग यामुळे लौकरच ते उत्तम वकील म्हणून नावाजले जाऊ लागले. १९१४ ते १६ त्यांनी लॉ कॉलेजमध्येही अध्यापन केले. वकील म्हणून जम बसल्यावर त्यांना मानमरातब व धनसंपदा मिळाली.
परंतु त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागले. १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्यात मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महात्मा गांधींनी लढा दिला.
 
यावेळी बाबूजी गांधींबरोबर होते. येथून पुढे ते पुरते गांधीवादी बनले, स्वदेशीचा पुरस्कार करू लागले, असहकारितेच्या चळवळीत भाग घेऊ लागले. पक्षसंघटना बांधण्याचे काम करू लागले. त्यांनी पाटणा येथे एका राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली. त्याचे कालांतराने ते कुलगुरू व कुलपतीही झाले. १९३४ मध्ये मुंबईला भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. १९३६ व १९४६ मध्येही ते पुनः अध्यक्ष झाले. १९३४ मध्येच बिहारमध्ये फार मोठा भूकंप झाला. या बिकट प्रसंगी बाबूजीनी तेथील जनतेला धीर दिला. सबंध देशातून मदत मिळवली, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान केले.

 बाबूजीना हरिजन उद्धार, राष्ट्रभाषा प्रचार, कुष्ठरोग निवारण, मूलोद्योग अशा त-हेच्या रचनात्मक कार्याची आवड होती. हिंदी भाषेच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी
खूप कार्य केले. त्यांनी अनेक ग्रंथ हिंदी भाषेत लिहिले. 'सर्चलाईट ' या इंग्रजी नियतकालिकासाठी लेखन केले. 'देश' हे हिंदी साप्ताहिक सुरू केले, त्याचे संपादकपद सांभाळले. हिंदी राष्ट्रभाषा व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. हळूहळू त्यांची लोकमान्यता वाढत होती. त्यांना जगातील अनेक विद्यापीठांनी — डॉक्टर ऑफ लॉ', 'डॉक्टर ऑफ लिटरेचर ' अशा पदव्या दिल्या. काशी विद्यापीठाने विद्यावाचस्पती' ही गौरवपूर्ण पदवी दिली.
'चलेजाव' चळवळीत भाग घेतल्यामुळे राजेंद्रप्रसादांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पुढे १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळच्या कामचलाऊ सरकारात बाबूजी अन्न व शेतकी खात्याचे मंत्री झाले. भारताची राज्यघटना बनवण्यासाठी जी समिती स्थापन झाली तिचेही बाबूजी अध्यक्ष होते आणि प्रजासत्ताक भारताचे राजेंद्रप्रसाद हे १९५० ला पहिले राष्ट्रपती झाले. पाटण्यातील सदाकत आश्रमातून बाबूजी राष्ट्रपती भवनात आले. त्यांनी राष्ट्रपती भवनातील खर्चिक डामडौल कमी करुन टाकला. 

त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वानेच राष्ट्रपती भवनास भव्यता प्राप्त झाली. राष्ट्रपती असताना त्यांनी अनेक देशांचे सदिच्छा दौरे केले. १३ मे १९६२ रोजी त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. त्याच वर्षी त्यांनी आपली कारकीर्द स्वेच्छेने संपवली आणि ते आपल्या सदाकत आश्रमात परत आले. गांधीजींच्या पावलांवर पाऊल टाकून राजेंद्रबाबूंनी स्वातंत्र्यलढ्यात केलेली कामगिरी मोलाची होती. जीवनाच्या अखेरीस ते विजनवासात पाटण्याला राहिले. त्यांना मधूनमधून त्रास देणारा दमा त्यांच्या सोबतीला होताच. 

पाटणा येथील सदाकत आश्रमातच २८ फेब्रुवारी १९६३ रोजी या सरलहृदयी, प्रसन्नचित्त अशा अजातशत्रूचे निधन झाले. एक थोर देशभक्त सौजन्यशील विद्वान, गांधीजींचे विश्वासू साथी म्हणून राजेंद्रबाबूंची ख्याती होती. दुसऱ्याच्या भल्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांचे आयुष्य त्याग व सेवावृत्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. राजेंद्रप्रसादांचे आयुष्य म्हणजे वीरोचित जीवनयज्ञच होता.

babu rajendra prasad information in marathi


atal bihari vajpayee information in marathi

अटलबिहारी वाजपेयी हे एकदा, दोनदा नव्हे तर तीनवेळा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. तरुण वयापासून आज ७५ व्या वर्षापर्यंत लोकप्रियता लाभलेले ते एकमेव नेते आहेत. देशाच्या राजकारणात अटलजी फार प्रदीर्घकाळ आहेत. कसलेले संसदपट निष्कलंक चारित्र्य असलेला राजकीय नेता, लोकांच्या हृदयाला हात घालणारा कवी, प्रतिभावंत वक्तृत्त्वपट्र असे हे लोकप्रिय नेते आहेत. गेली ४० वर्षे ते संसदेत कार्य करीत आहेत. ते तरुण खासदार होते, तेव्हाच पंडित नेहरूंनी त्यांच्यातील नेतेपणाचे गुण हेरले होते व एक दिवस अटलजी पंतप्रधान होतील असेही सांगितले होते ते उद्गार आता खरे ठरलेले दिसत आहेत.

अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२६ या दिवशी ग्वाल्हेर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव कृष्णबिहारी आणि आईचे नांव कृष्णादेवी. अटलजींचे प्रारंभीचे शिक्षण गोरखी विद्यालयात झाले. त्यानंतर ते व्हिक्टोरिया कॉलेजमधून बी. ए. झाले. शिक्षण चाल असतानाच अटलजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागले. १९४२ सालच्या लढ्यात भाग घेऊन त्यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरूवात केली. १९४७ ते १९५२ पर्यंत पांचजन्य', 'स्वदेश', 'वीर अर्जुन ' या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले.

atal-bihari-vajpayee-information-in-marathi
atal-bihari-vajpayee-information-in-marathi

१९५१ मध्ये अटलजी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. १९५७ मध्ये ते बलरामपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले. जनसंघाचे राष्ट्रीय चिटणीस, विरोधी पक्षनेता, जनता पार्टीचे संस्थापक सदस्य, परराष्ट्रमंत्री, भा. ज. पा. चे संस्थापक अशा विविध नात्यांनी ते राजकारणात वावरत आहेत. १९७५ साली हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली. तेव्हा इंदिराजींनी आणीबाणी पुकारली. त्याकाळी इतर नेत्यांबरोबर अटलजींनाही अटक झाली होती. आणीबाणी उठवल्यावर १९७७ साली निवडणुका घेण्यात आल्या त्यात जनता पक्ष जिंकून आला.


त्यांच्या सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री बनले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी चीन व पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. १९९८ मध्ये भा. ज. प. आणि मित्र पक्षांचे सरकार स्थापन झाले त्यावेळी अटलबिहारी यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर होता. ओरीसाच्या किनाऱ्यावरचे तुफान वादळ, गुजरातेत भयानक भूकंप, अनेक राज्यांमध्ये दुष्काळ अशा अनेक आपत्तींना वाजपेयी सरकारला तोंड द्यावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तींप्रमाणेच इतरही आपत्ती त्यांच्यावर कोसळल्या.

पोखरणच्या अणुस्फोटानंतर विरोधी पक्ष आणि अमेरीका यांनी टीकेची झोड उठविली. अशावेळी वाजपेयींनी सारी परिस्थिती खंबीरपणे हाताळली आणि अमेरिकेच्या कठोर धोरणात बदल घडवून आणले. शेजारी पाकिस्तानबरोबरचे वैर विसरून मैत्री संपादन करण्यासाठी पुढाकार घेतला. लाहोरसाठी बस सुरू केली. परंतु नवाझ शरीफ यांनी कपटाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. कारगिलच्या युद्धानंतर पुनः वाजपेयींनी आपल्या धोरणाचा नव्याने विचार केला व दोन्ही देशात व्यापार खुला केला. त्यामुळे पाकिस्तानात भारताला अनुकूल वातावरण तयार होत आहे.


वाजपेयींनी आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली केली आणि तिचे फायदे थोड्याच वेळात आपल्या पदरात पडू लागले. पाहता पाहता भारत जगातील एक औद्योगिक महासत्ता होऊ लागली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने विकसित व्हावी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर तिचा प्रभाव पडावा या गोष्टीला वाजपेयी यांनी आपल्या धोरणांनी फार मोठा हातभार लावला आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला असे वेगळे, उदार व समावेशक वळण देणे, हे वाजपेयींचे भारताला फारमोठे योगदान आहे. त्यामुळे भारताच्या इतिहासात एक द्रष्टा व भारताचा हितकर्ता पंतप्रधान म्हणून त्यांचे नांव कायमचे कोरले जाईल.

अटलबिहारी यांनी पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत अपूर्व काम केले आहे. आर्थिक, परराष्ट्रव्यवहार, मूलभूत सोयी, सुविधा, संरक्षण आदि क्षेत्रात त्यांच्या सरकारने फार मोठी कामगिरी केली आहे.  अटलजी जसे ओजस्वी नेता आहेत, तसेच ते कोमल कवीही आहेत. वडिलांकडून त्यांना काव्याचा वारसा मिळाला आहे. भावुक मनाचा कवी म्हणून त्यांचे स्थान उच्च कोटीचे आहे. जनतेची दुःखे पाहून ते व्यथित होतात आणि  कैदी कविराम की कुंडलियाँ 'अमर आग है ' असे सुंदर काव्यसंग्रह निर्माण होतात. त्यांच्या कविता पद्मजा फेणाणी यांनी गाऊन स्वरबद्ध केल्या आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.


रा. लो. आ. च्या मदतीने वाजपेयीनी देशाच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने पावले उचलली. दूरदृष्टी हा त्यांचा स्थायीभाव आहे. पोखरण येथे त्यांनी घडवून आणलेली अणुबाँबची चाचणी हा सर्व जगाला आश्चर्याचा धक्का होता. पण वैज्ञानिकांचे ज्ञान, त्यांनी जगापुढे ठेवले आणि ' हम भी कुछ कम नही ' हे दाखवून दिले. भारताला बलशाली राष्ट्र बनविण्याच्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. अटलजींचा जीवनप्रवाह चारी अंगांनी फुलणारा आहे. १९९४ साली त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला. तत्पूर्वी १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


एकंदरीत पाहता गेली अनेक वर्षे भारताला एक विचित्र गतिशून्यता आली होती. पण अटलजींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेने जुनी कात टाकून देऊन नवे चैतन्यदायी रूप धारण केले आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था कंगाल झाली होती. आता लक्षावधी डॉलर्सचे परकीय चलन भारताच्या गंगाजळीत जमले आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाने विक्रमी बावीस कोटी टनांचे लक्ष्य गाठले आहे. रस्ते, पूल बांधले जात आहेत. भाववाढ लक्षणीय प्रमाणात घटली आहे. अनेक संकटांशी झुंज देण्यास भारत समर्थ ठरला आहे. परराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रातही अटलजींनी नवे विक्रम करुन दाखविले आहेत. अण्वस्त्रनिर्मिती करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. अटलजींच्या सरकारने सर्वशिक्षा अभियान चालू केले आहे, त्यामुळे खेड्यापाड्यातील गरीबांची मुलेही सुशिक्षित होतील.


अशा त-हेने अटलजींच्या रूपाने देशाला चारित्र्यसंपन्न, त्यागी, राज्यसभेची जाण असलेला, विविध विषयांचा सखोल अभ्यास असणारा, अद्वितीय वक्तृत्त्व असलेला असा नेता लाभला होता.

atal bihari vajpayee information in marathi


Dr apj abdul kalam information in marathi

ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत. ते भारताला लाभलेले सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे, एकमेवाद्वितीय असे वैज्ञानिक आहेत. अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. 'टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन फोरकास्टिंग अँड अॅसेसमेंट कौन्सिल ' या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने भारतातल्या अनेक आधुनिक तांत्रिक प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि भारताला २१ व्या शतकात घेऊन जाण्यासाठी आवश्यक अशा मोहिमा त्यांनी आखल्या.

dr-apj-abdul-kalam-information-in-marathi
dr-apj-abdul-kalam-information-in-marathi

'इस्त्रो' आणि 'डि. आर. डी. ओ. ' या महत्वाच्या वैज्ञानिक संस्थांमध्ये डॉ. कलाम यांनी उच्चपदे भूषविली आहेत. काही व्यक्तिमत्त्वेच लोकोत्तर असतात. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे असेच एक व्यक्तिमत्त्व होय. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी मद्रास राज्यातील रामेश्वरम् या छोट्या बेटासारख्या गावात अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नांव जैनलबदीन. हेमध्यमवर्गीय तमिळ नावाडी होते. ते व आई आशियम्मा यांच्याजवळ उदार, विशाल दृष्टीकोण होता. दोघेही सदैव दुसऱ्यांना मदत करण्यात तत्पर असत.


त्यांचे संस्कार घेऊनच कलाम लहानाचे मोठे झाले. वडिलांचा लाकडी नौका बांधायचा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर पढील शिक्षणासाठी कलाम रामनाथपुरम्ला आले. त्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथेच त्यांना इंग्लिश साहित्याची गोडी लागली. टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट अशा जगप्रसिद्ध लेखकांचे साहित्य त्यांनी वाचून काढले. बी. एस्. सी. नंतर 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' मध्ये इंजिनिअरिंग शाखेसाठी प्रवेश घेतला.


येथील शिक्षण संपल्यावर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड' या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून आले. तेथे विमानांची देखभाल करण्याच्या कामात त्यांनी प्राविण्य मिळवले. एरोनॉटिकल अभियंता बनून त्यांनी आपल्या आकाशात विहार करण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले. शिक्षण संपल्यावर ते संरक्षण खात्याच्या विशेष विभागात काम करू लागले. ( १९५८ ) येथे त्यांनी 'नंदी' नावाचे हॉवरक्राफ्ट बनवले.

 त्यानंतरच्या काळात त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत काम करायला सुरुवात केली. १९६२ मध्ये धुंबा या केरळमधील गावी अवकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे काम करीत असतानाच कलाम यांना 'नासा' या अमेरिकेतील संस्थेत अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आले. हे शिक्षण पूर्ण करून कलाम परतले, आणि नोव्हेंबर १९६३ मध्ये नाइके अपाची ' हे धुंबा येथे जुळणी केलेले पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले व ते यशस्वीरीत्या कार्य करू लागले.


यानंतर 'रोहिणी साऊडिंग रॉकेट ' हे पृथ्वीजवळच्या वातावरणाचा अभ्यास करणारे यान पाठवण्यात आले. या दोन्ही ठिकाणी कलाम यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आले. अशा त-हेने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात झपाट्याने विकास चालू झाला. धुंबा येथे कलाम यांनी विविध स्तरांवर काम केले व यश मिळवले. उदा. रॉकेटस् तयार करणे, त्यांची क्षमता तपासणे, रॉकेटस्च्या उड्डाणासाठी सहाय्यक ठरणारी यंत्रे बनवणे वगैरे.

 

यापुढच्या काळात लहान धावपट्टीवर विमाने उडविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रकल्प ( राटो) कलाम यांच्यावर सोपवण्यात आला. यापुढची पायरी म्हणजे भारताच्या संरक्षणखात्याने स्वतंत्रपणे क्षेपणास्त्रे बनवण्याचे ठरविले. हा प्रकल्पही कलाम यांच्या ग्रुपने १६ महिन्यात पूर्णत्वाला नेला. स्वदेशी बनावटीचा उपग्रह तयार करून अवकाशांत सोडायचा, ही पुढली पायरी होती. त्यासाठी श्रीहरीकोटा हे मद्रासजवळचे बेट ठरविण्यात आले.


१९६८ मध्ये इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन ( इस्त्रो) ही संस्था अवकाश संशोधनाची धुरा वाहू लागली. इस्त्रोचा प्रमुख म्हणून अब्दुल कलाम यांची निवड झाली.  'राटो' सिस्टिम १९७२ मध्ये बरेली येथे हवाई दलाच्या केंद्रावर प्रत्यक्षात वापरली गेली आणि परकीय चलन वाचवल्याबद्दल कलाम यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. विक्रम साराभाई स्पेस सेंटरवर एस्. एल्. व्ही ३ च्या कामाला वेग आला आणि हा ही प्रकल्प सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी कलाम यांच्या हाती सोपविण्यात आला. या प्रकल्पातील अनेक यंत्रणा देशी माल वापरून व स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आल्या.

१८ जुलै १९८० ला श्रीहरीकोटाच्या अवकाश तळावरुन रोहिणी उपग्रह यशस्वीपणे सोडण्यात आला आणि उपग्रह अवतरणाची व्यवस्था असलेल्या काही मोजक्या देशांच्या पंगतीत भारताने स्थान मिळवले. देशाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरवात झाली. यातून पुढे 'अग्नी' ची निर्मिती झाली. 'इस्त्रो'मध्ये १८ वर्षे काम केल्यानंतर कलाम यांनी डी. आर. डी. एल्. ची जबाबदारी घेतली.

१९८१ साली त्यांना 'पद्मभूषण ' या पदवीने सन्मानित करण्यात आले. १९९० मध्ये पद्मविभूषण' ही पदवी देण्यात आली. त्यानंतर १९९७ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च पदवीने त्यांचा सन्मान केला गेला. देशातील ३० विद्यापीठांकडून 'डॉक्टरेट ' मिळवलेले ते एकमेव गृहस्थ आहेत. १९८२ मध्ये अब्दुल कलाम संरक्षण संशोधन आणि विकास ' संस्थेमध्ये काम करू लागले. आपल्याला दुसऱ्या देशांनी जे तंत्रज्ञान देण्याचे नाकारले, ते तंत्रज्ञान शून्यातून विकसित करण्याचे महत्वाचे काम या ठिकाणी करण्यात आले.

नोव्हेंबर १९९९ मध्ये भारत सरकारचा प्रधान तंत्र सल्लागार ' म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सामाजिक गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्रासमोर एका नव्या दृष्टिकोनाची उभारणी करणे असे कार्य कलाम यांनी या काळात केले. 'अग्नि', 'आकाश', 'नाग', 'पृथ्वी ', ' त्रिशूल ' या क्षेपणास्त्रांचे अब्दुल कलाम हे सर्वेसर्वा आहेत.

तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी 'अग्निपंख ' हे आत्मचरित्र प्रज्वलित भने', 'इंडिया २०२० - ए व्हिजन फॉर मिलेनियम ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यायोगे भारत हा एक विकसनशील देश न राहता त्याचे रूपांतर एका विकसित देशात व्हावे हा त्यांचा प्रयत्न आहे. २५ जुलै २००२ ' पासून ते राष्ट्रपती झाले. आपल्या देशातील नागरिकांकडे ताकद आहे आणि त्या ताकदीला कठोर परिश्रमांची जोड देऊन आपल्या सोनेरी युगाची स्वप्ने साकार करता यायला हवीत.


राजकारणाला छेद देऊन नव्या पिढीला प्रगतीचा मार्ग दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशवासियांच्या आत्मविश्वासाला आणि अंतस्थ प्रेरणेला ते साद घालतात. अनेक शाळांना भेटी देऊन त्यांनी हजारो मुलांबरोबर संवाद साधला आहे. मुलांच्या मनात विज्ञानाबद्दल प्रेम, आस्था निर्माण केली आहे. यायोगे भारताला एक विकसित देश म्हणून जगापुढे आणण्याची मोहिम त्यांनी आखलेली आहे. त्यांच्या स्वप्नाची पूर्ती व्हावी म्हणून आपल्या लाख लाख शुभेच्छा !!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा कार्यकाल २४ जुलै २००७ रोजी संपला.

 

Dr apj abdul kalam information in marathi

pandit jawaharlal nehru information in marathi


information 1 600 words
काही व्यक्तिमत्त्वेच लोकोत्तर असतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्यापैकीच एक होत. त्यांनी भारताच्या इतिहासातील काही सोनेरी पाने लिहिली आहेत. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होत. त्यांच्यामुळे पंतप्रधानपदाला ऐश्वर्य प्राप्त झाले असे म्हणता येईल. पंडितजींचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ ला एका काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरुपराणी होते. 

जवाहरचे बालपण राजपुत्राप्रमाणे ऐश्वर्यात, लाडाकोडात गेले. त्यांचे घर आनंदभवन' ही किल्ल्यासारखी प्रचंड वास्तू होती. पुढे हे घर देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना देऊन टाकण्यात आले. त्याचे स्वराज्यभवन ' असे नाव ठेवण्यात आले.

pandit-jawaharlal-nehru-information-in-marathi
pandit-jawaharlal-nehru-information-in-marathi

जवाहरचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. पढील शिक्षणासाठी त्याला १९०५ मध्ये लंडनजवळ असलेल्या हरो येथील पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आले. पुढे केंब्रिज येथे त्यांनी तीन वर्षे शिक्षण घेतले. येथे त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी घेतली. या काळात त्यांनी खूप अभ्यास केला, खूप मित्र जोडले, खूप वाचन केले. १९१२ ला ते बॅरिस्टर झाले व भारतात परतले. पण ते वकिलीत रमले नाहीत.

१९१६ मध्ये त्यांचे कमला कौल यांच्याशी लग्न झाले. याचवर्षी लखनौ येथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना गांधीजींचे दर्शन घडले आणि त्यांची पावले गांधीजींच्या मार्गावरून वाटचाल करू लागली. 'रॉलट अॅक्ट ' विरुद्धच्या सत्याग्रहात नेहरूंनी गांधींबरोबर भाग घेतला, आनंदभवनकडे पाठ फिरवली. मोतीलालनाही गांधींची मते पटू लागली आणि नेहरू पितापुत्रांनी ऐष आरामी राहणी सोडून दिली आणि असहकारितेच्या चळवळीत उडी घेतली.


१९२९ साली जवाहरलाल काँग्रेसचे अध्यक्ष बनले. लखनौ, फैजपूर येथीलही काँग्रेसचे ते अध्यक्ष बनले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. तुरुंगात त्यांनी लिहिलेले 'भारताचा शोध', 'आत्मकथा ', ' जागतिक इतिहासाचे दर्शन' असे ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत. जवळ जवळ ३० वर्षे त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. १९४५ साली सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला पंडित नेहरूनी चालविला.


१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. स्वराज्याची सूत्रे त्यानंतर १७ वर्षे त्यांच्या हाती होती, हे भारताचे भाग्य होय. या काळात भारताच्या समृद्धीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. भारताच्या संरक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी जे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभे केले, त्याचा लाभ १९७१ मधील भारत-पाक युद्धाच्यावेळी दिसून आला. अशा त-हेची दूरदृष्टी त्यांनी नेहमी बाळगली.

नेहरूनी देशाला विज्ञाननिष्ठा दिली. भाक्रानानगल, दामोदर व्हॅली यासारखी प्रचंड धरणे बांधली. त्यांना ते विज्ञान युगातील तीर्थस्थाने ' असे म्हणत. भारताचे पंतप्रधान होताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, आरोग्य, संरक्षण अशा सर्व क्षेत्रात नवनव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांनी कार्यक्षम माणसे नेमली आणि राजकीय क्षेत्रात निष्ठा, चारित्र्य, कळकळ इत्यादि गुणांनी आपली चांगलीच छाप पाडली. काश्मीरबाबतचा तंटा, चीनची भारतावरील चढाई इत्यादि अपयश पचवूनही ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत देशाच्या उन्नतीसाठीच झटत राहिले.

देशाबरोबरच ते विश्वाचीही चिंता करीत होते. 'पंचशील' ही नेहरूंनी जगाला दिलेली देणगी आहे. निरनिराळ्या देशांमधील भांडणे थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी यासाठी ते प्रयत्नशील होते. सोविएत रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नोव्हेंबर १९८६ मध्ये भारत व रशिया यांच्यात अण्वस्त्रे न बाळगण्याबाबत दिल्ली करार झाला. यामागे अणु-युद्धाच्या धोक्यापासून जगाचा बचाव
करण्याचा उदात्त हेतू होता.


जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९६१ मध्ये 'यूनो' च्या आमसभेत भाषण दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. विश्वबंधुत्त्वाचा पुरस्कार करणारा नेता, असा परदेशी लोकांकडूनही त्यांचा गौरव केला जातो. 'जागतिक शांतता निर्माण करु शकणारा एकमेव नेता' अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. या जागतिक कीर्तीच्या शांतताप्रिय नेत्याला १९५५ मध्ये 'भारतरत्न' अशी पदवी देण्यात आली. लोकशाहीवर श्रद्धा, राजकारणात धर्मनिरपेक्षता, जनहितांची कळकळ, त्याग, भावना अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेल्या होत्या. त्याचबरोबर मुलांचे 'चाचा नेहरू ' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस पैलू होता.
 
मुलांच्या मेळाव्यात ते आनंदाने रंगून जात. लहान मुले ही राष्ट्राची अनमोल देणगी असते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे मुलांचे कल्याण साधणारे अनेक उपक्रम ते राबवीत असत. अशा या नवभारताच्या शिल्पकाराचे २६ मे १९६४ रोजी निधन झाले. एक थोर विज्ञानाचा उपासक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नेता स्वर्गवासी झाला. एका भाग्यशाली युगाचा अस्त झाला. त्यांनी आपले अंतिम इच्छा पत्र लिहून ठेवले होते. “माझ्या देहाचे दहन करा आणि त्यातील मूठभर रक्षा गंगेत विसर्जित करावी आणि उरलेली राख विमानातून माझ्या भारतभूवर विखरुन टाकावी.' ही त्यांची अखेरची इच्छा अत्यंत श्रद्धापूर्वक पूर्ण करण्यात आली. भारतमय झालेले पंडित नेहरू हे स्वप्न अखेर विलयाला गेले.

information 2  2400 words

काश्मीरचे कौल नेहरू झाले काश्मीर हा भारताने आपल्या मस्तकी धारण केलेला सुंदर आणि सुबक परिसर जणू काही भारताचा नयनमनोहारी असा असा मुकुटच म्हणावा लागेल. इतकं काश्मीरमधील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे.

सुगंधी केशराच्या शेतावरून वाहणारा गंधवारा आणि इथली चिनार वृक्षांची गर्द बने व त्यांची दाट सुखावणारी सावली. त्याच्यानैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या इथल्या दऱ्या आणि दऱ्याखोऱ्यात फुलणारी रंगीबेरंगी विविध फुले. या फुलांचा दरवळणारा सुवास काश्मिरवासियांची मने अजून ताजीतवानी करतो. इथल्या उंचसखाल भूमीवरचे निळे मोकळे आकाश आणि सोबतीला झेलम नदीचा शांत, संथ पाण्याचा परिसर. या झेलम नदीच्या पाण्याच्या स्वच्छ आरशात ज्यावेळी काश्मीर आपलेच प्रतिबिंब न्याहाळते तेव्हा ते हरखून जाते कारण चांदीचा रंग घेऊन ओढयाचे पाणी डोंगरदऱ्यातून खळाळत धावते. 

या खळखळत्या पाण्यासारखाच उत्साह आणि सुंदरतेचे लेणे लाभलेल्या काश्मीरच्या धरतीची लेकरेही त्याच सौंदर्याचे, उत्साहाचे वरदान घेऊन जन्माला येतात. काश्मीरचे असेच एक राजकौल घराणे. घराचे सौंदर्य केवळ सुकुमारतेचेच वरदान घेऊन जन्माला येथे आले नव्हते तरपांडित्याचा आणि व्यवहार कौशल्याचा वारसा या घराण्याला होता. या घराण्याला सद्गुणांचे जणू जन्मजात देणेच लाभले होते म्हणा ना ! पंडित राजकौल हे संस्कृत आणि फारसी भाषेचे व्युत्पन्न पंडित होते. त्यावेळी दिल्लीच्या फरूखशिअर बादशहाच्या दरबारातील मानाचे पान म्हणून पंडित राजकौल यांचे नाव घेतले जायचे.

राजकौल यांच्या कौल घराण्याला शाही दिल्लीत राहाण्यासाठी दिलेले आलिशान भवन होते. एका सुंदर खळाळत्या कालव्या शेजारी हे घर होते. कालवा म्हणजे नहर बरं का! दिल्लीकडील लोक छोट्या कालव्याला नहर म्हणतात आणि या नहराशेजारी राजकौल राहात होते पण पुढे त्यांचे राजकौल हे नाव बदलून लोक त्यांना 'नेहरु' कधी म्हणून लागले हे कोणाला कळलेच नाही इतके नेहरु नाव अंगवळणी पडले.कौल घराण्याचे नामांतर नेहरू झाले ते असे. फरूखशिअर बादशहाच्या मर्जीतील मानाचे मनसबदार म्हणून राजकौल यांना लौकिक होता. त्यांची जहागीरीही होती. कौल म्हणजेच हे नेहरू घराणे. सर्व लोकांच्या आदराचे स्थान होते. राजमान्यतेबरोबर या घराला लोकमान्यताही होती.


पुढे या देशावर इंग्रजी राजवट आली. आपल्या देशावर पारतंत्र्याचे जाळे टाकणाऱ्या इंग्रजांना हटविण्यासाठी या देशात १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम झाला. या स्वातंत्र्य समरात दिल्लीच्या शेवटच्या बादशहाने म्हणजेच बहादुरशहा जफरने राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन उडी टाकली होती . त्या स्वातंत्र्य समरात अवघी दिल्ली पेटली . अनेक कत्तली झाल्या. रक्ताचे पाट वाहिले. आणि अवघी दिल्ली बेचिराख झाली.

दिल्लीचा शहेनशहा बहादूरशहा जफर याचा इंग्रजांनी पराभव केला आणि तो बेघर झाला. राजकौलाचे नाव सांगणारे नेहरू घराण्याचा आणि दिल्लीचा संबंध जवळ जवळ संपलाच. नेहरू घराणे दिल्लीहून आगऱ्याला रवाना आले. दिल्ली सोडण्यापूर्वी राजकौल म्हणजेच नेहरु यांच्या घराण्यातील गंगाधर नेहरू हे दिल्लीला कोतवाल म्हणून काम पहात होते. कोतवाल गंगाधर नेहरु यांचा संसार सुखाचा झाला. पुढे त्यांना तीन मुले झाली. मोठा बन्सीधर नेहरू, मधला नंदलाल नेहरू. धाकटा मोतीलाल नेहरु.

त्यावेळी दिल्लीची सल्तनत चाकरमानी झाली होती. कोतवाल गंगाधर नेहरू यांचा मोठा मुलगा बन्सीधर नेहरु हाताशी आला. मोठा झाल्यावर तो न्यायालयात काम करु लागला. मधल्या नंदलाल नेहरूला खतडी नावाच्या संस्थानचे दिवाणपद मिळाले. तो मोठ्या खुशीने हे काम करीत होता. त्याचसुमारास कोतवाल गंगाधर नेहरू आपल्या दिल्लीच्या कोतवालीच्या नोकरीतून निवृत्त झाले होते.

बादशहा फरूखशिअर याच्या दरबारातील पंडित राजकौल यांच्या मानसन्मानाच्या कथा गंगाधरपंतांनी ऐकल्या होत्या. दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर झाला.पणइंग्रजांविरुध्द लढताना त्याच्या हालअपेष्टांच्या, वेदनांच्या व्यथाही गंगाधरपंतांनी ऐकल्या होत्या.१८५७ च्या स्वातंत्र्य समरात हरलेल्या दिल्लीच्या असहाय्य वेदनाही त्यांनी ऐकल्या होत्या. इंग्रज सैनिकांनी पेटवलेल्या दिल्लीच्या आकाशाला भिडणाऱ्या ज्वालाही कोतवाल गंगाधर नेहरुंनी पाहिल्या होत्या. नंतर त्यांनी दिल्ली सोडली तरी त्यांना आग्रयातही त्या दरबारच्या ऐकिवातील आठवणी सतावू लागल्या. आग्रा येथे स्थायिक झालेल्या गंगाधर नेहरूंचा या आठवणी काढणे हाच आनंदाचा ठेवा होता. थोडक्यात हेच त्यांचे आनंद निधान होते. 

मोठा हळूहळू बन्सीधर आणि दुसरा नंदलाल यांचे कर्तृत्व आकाराला येत होते पण आकस्मिकपणे एक वाईट घटना घडली ती म्हणजे गंगाधर नेहरू यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती.गंगाधर पंतांच्या निधनानंतर अवघ्या तीनच महिन्यांनी म्हणजे ६ मे १८६१ रोजी गंगाधर नेहरूंच्या विधवा पत्नीच्या पोटी बाळ जन्माला आले त्यांचे नाव मोतीलाल ठेवण्यात आले कारण गंगाधर नेहरूंची तशी इच्छा होती. अशाप्रकारे पित्याचे छत्र जन्मतःच हरपलेले गंगाधर नेहरुंचे तिसरे अपत्य म्हणजे मोतीलाल नेहरु होय. 

भाग्यशाली पितापुत्र मोतीलाल नेहरूंच्या शिक्षणाची जबाबदारी दोन मोठ्या भावांवर पडली. मोतीलाल नेहरू जन्मत:च हुषार, कल्पक, कुशाग्र बुध्दिचे होते. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन मोतीलाल वकिलीच्या परीक्षेत प्रथम आले. उत्तर प्रदेशाची वकिली करण्यासाठी मोतीलाल अलाहाबाद येथे गेले.

बघता बघता अलाहाबाद येथे मोतीलाल नेहरूंच्या वकिलीने जोर धरला. अलाहाबादमध्ये ते लोकप्रिय व नावाजलेले वकील म्हणून ओळखू जाऊ लागले. उत्तम वकील म्हणून मोतीलाल नेहरूंचे नाव दिल्ली, मुंबई, कलकत्याच्या कोर्टातही गाजू लागले. इंग्रज सरकारचाही मान नेहरु ठेवीत. काही वर्षातच त्यांचा विवाह स्वरुपराणी नामकमहिलेशी झाला. स्वरूपराणी खूप आतिथ्यशील होती. नेहरुंचे घर नेहमी कलाकार, साहित्यिकांनी गजबजलेले असे. मोतीलाल नेहरू यांचे घर बड्या बड्यांचे भारतीय संस्थानिक, इंग्रज अधिकाऱ्यांचे आतिथ्य करणारे घर होते. 

मोतीलाल आणि स्वरूपराणी हे आतिथ्यशील असेच जोडपे होते.
१४ नोव्हेंबर १८८९ या दिवशी मोतीलालना एक अपत्य झाले त्याचे नाव जवाहर ठेवण्यात आले. नेहरुंच्या पायगुणाने त्यांच्या जन्मानंतर दोनच दिवसांनी मोतीलाल नेहरू यांनी उच्च न्यायालयातील एक खटला जिंकला.
जवाहरचे बा लपण जवाहर खूप लाडा कौतुकात वाढत होता. त्याचा सांभाळ करायला हुषार दाया होत्या. छोटा जवाहर सगळ्यांचाच लाडका होता.


लहानपणी जवाहर हट्टी व खेळकर होता. जवाहरलला शिकवायला मुन्शी मुबारक अली नावाचे एक विद्वान शिक्षक घरी येत. ते जवाहरला नितीबोधपर कथा सांगत तसेच त्याची आई व मावशीही रामायण महाभारतातील गोष्टी सांगे. जवाहरनेही वकील व्हावं अशी मोतीलालजींची इच्छा होती. यासाठी जवाहरलला शिकवण्यासाठी त्यांनी एफ्.टी. ब्रुक नामक शिक्षकाची नेमणूक केली होती. त्यांनी जवाहरलला वाचनाची आणि विज्ञानाची गोडी लावली. जवाहरचं बरंचसं शिक्षण घरीच झालं.


मोतीलालजींनी नेहरुला लहानपणी पोहायला, घोड्यावरुन रपेट करायला शिकवलं तसंच त्याला व्यायाम व योगासनं करण्याचीही गोडी लावली. छोटा जवाहर दिवसेंदिवस गोंडस दिसू लागला. बुध्दिमत्तेची चमक त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागली.


शालेय व महाविद्यालयीन शिक्षण १९०५ साली १६ व्या वर्षी जवाहर इंग्लंडमधील 'हॅरो स्कूलमध्ये जाऊ लागला. श्रीमंतांची मुले इथे शिक्षण घेत असत. या शाळेत जवाहर एक बुध्दिमान विद्यार्थी म्हणून ओळखू जाऊ लागला. याच शाळेत त्याला त्याच्या बुध्दिमत्तेबद्दल, चांगल्या अभ्यासाबद्दल त्याला गॅरिबाल्डी नेत्याचा चरित्रग्रंथ बक्षीस देण्यात आला.

पुढे ट्रिनिटी कॉलेजमधून पदवी घेऊन १९१० साली ते बाहेर पडले. इनरटेंपल या इंग्लंडच्या विद्यापीठात त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु झाला आणि १९१२ मध्ये बार अॅट लॉ उत्तीर्ण होऊन ते बॅरिस्टर झाले.
शिक्षण चालू असताना ते सतत इतर वाचन करीत होते. केंब्रिजला तर ते समाजवादाकडे आकर्षित झाले त्याचबरोबर भारताकडेही त्यांचे लक्ष होते. ते स्वदेशाच्या विचाराने तात्काळ मायदेशी परतले. नेहरूंवर पश्चिम संस्कृतीचा पगडा अजिबात बसला नाही. पुढे आय.सी. एस. होऊन त्यांनी बुध्दिमत्तेची चुणूक दाखवली.


राजकारणाचा प्रभाव इ.स. १९१२ सालातील गोष्ट. बिहारमधील बांकीपूर गावात कै. गोपाळकृष्ण गोखल्यांचं एके दिवशी व्याख्यान होतं. गोपाळकृष्ण गोखले एक मोठे देशभक्त अशी त्यांची ख्याती नेहरुंनी ऐकली होती म्हणून आवर्जून ते त्यांच्या व्याख्यानाला गेले. त्यांच्या देशप्रेमाने नेहरु भारावून गेले. त्यांच्या व्याख्यानाचा सखोल परिणाम नेहरुंच्या मनावर झाला. त्यांनी त्याचक्षणी राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले. १९१६ साली होमरुलची चळवळ सुरु झाली.

तेव्हा जवाहरलाल नेहरु अवघे २७ वर्षाचे होते. काँग्रेसची अधिवेशनं भरु लागली. हिंदुमुस्लीम ऐक्याचा ठराव संमत झाला. मवाळ आणि जहाल पक्ष एकत्र आले. लोकमान्य टिळक आणि म. गांधींची भाषणे अनेकठिकाणी होत होती. नेहरुंची आणि लो. टिळकांची भेट झाली. त्यांच्याही देशप्रेमाने नेहरु प्रभावित झाले. ते अधिकच राजकारणात समरस होऊ लागले. होमरुल चळवळ संपली नि १९१९ साली जालियनवाला बाग चळवळ सुरु झाली. या चळवळीने आता उग्र रुप धारण केले होते. नेहरुंनी जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा अहवाल तयार केला आणि सरकारची चांगलीच कानउघाडणी केली.

इ.स.१९२० साली नेहरुंनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून दिला आणिस्वतःला देशकार्याला वाहून घेतलं. नेहरु घराण्याची प्रतिष्ठा आणि बुध्दिमत्तेच्या जोरावर जवाहर खरं तर खूप श्रीमंत होऊ शकला असता पण नेहरूंनी तो मोह टाळला. देशप्रेमासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपत्तीचा त्याग केला. ब्रिटीशांनी केलेले कायदे मोडून त्यांच्याशी असहकार पुकारणं हे गांधीजीचं धोरण होतं. १९२० साली गांधीजींनी सत्याग्रह मोहिम सुरु केली. नेहरूंनीही त्यांना साथ दिली. साऱ्या नेहरु कुटुंबाने या मोहिमेला वाहून घेतलं.
आपले स्वप्न जवाहर पूर्ण करणार असे मोतीलालजींना वाटू लागले आणि खरोखरच जवाहरची वाटचाल त्याच दिशेने होती.

इ.स.१९२३ साली तें काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस झाले आणि त्यामुळे त्यांना संघटनात्मक कार्याचा अनुभव मिळू लागला. ह्याच वर्षी त्यांनी पंजाबांतील नाभा संस्थानांत प्रवेश केला. व तेथील शिखांवर घडलेल्या अत्याचाराची माहिती मिळवली. पण त्यांना अटक करण्यांत आली आणि काही काळ कारावासही भोगावा लागला.
१९२७साली ते ऑल इंडिया ट्रेड युनियनचे अध्यक्ष निवडले गेले. याच वर्षी मद्रास येथे अधिवेशनांत त्यांनी देशस्वातंत्र्याचं ध्येय जाहीर केलं.


१९२९ साली जवाहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९१६ ते १९३१ या काळांत जवाहरलाल आणि गांधीजी यांचे राजकीयसंबंध अधिकच जवळचे झाले. याच वर्षी नेहरुंनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांची सनद सम्मत केली.
१९३०साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळं जवाहरलालना कैद झाली. तिथूनसुटून आल्यावर सरकारनं त्यांना शिक्षणमंत्री पद देण्याचा प्रयत्न केला, पण नेहरूनी ते नाकारले. आपल्या देशसेवेच्या कार्यापासून ते ढळले नाहीत. जगाच्या न्यायासनासमोर ब्रिटिश साम्राज्य अपराधीच १९४०साली वैयक्तिक सत्याग्रहांत भाग घेतल्याबद्दल नेहरूंना पुन्हा एकदां अटक करण्यांत आली. 

त्यावेळी कोर्टासमोर केलेल्या भाषणांत नेहरू म्हणाले, “न्यायाधीश महाराज, मी आपणांसमोर तुमच्या दृष्टीनं गुन्हेगार या नात्यानं उभा आहे. पण जगाच्या न्यायासनासमोर मात्र ब्रिटिश साम्राज्यच आज अपराधी म्हणून उभं आहे !'


क्विट इंडिया चळवळ १९४२ साल उजाडलं. हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीचा दैदिप्यमान इतिहास सुरू झाला, 'भारत छोडो' चं आंदोलन सुरू झालं आणि जनतेचा प्रतिकार उग्र रूप धारण करूं लागला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे' हा एकच महामंत्र लोकांना दिला आणि काही काळ तरी जहाल आणि मवाळ हे शब्दच ऐकू येईनासे झाले, दहशतवादी आणि सत्याग्रही, दोघेही एकाच जिद्दीनं सरकारशी झुंज देऊ लागले. ह्या चळवळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला महात्मा गांधी, पं. नेहरू वगैरे पुढायांना अटक करण्यात आली. त्यामुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणं झालं. सारा देश तळापासून ढवळून निघाला.

 काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 'क्वीट इंडिया' ची एकच घोषणा आकाशामध्ये दुमदुमू लागली. 'ब्रिटिशांनो, चले जाव!' चे पडसाद उमटूं लागले. ह्या सुमारास नेहरूंना परत अटक करण्यात आली नि त्यांना अहमदनगरच्या किल्लयांतठेवण्यात आले. आतापर्यंत त्यांनी नऊ वेळां अटक आणि अकरा वर्ष तुरुंगवास भोगला होता. ह्यावेळी ते आपल्या क्रांतिकारक जीवनांतील अखेरचा खडतर कारावास भोगत होते.


शेवटी ब्रिटीश सरकारला शहाणपण सुचलं. लोकांचा प्रक्षोभ पाहून त्यानं १९४५साली सर्व पुढाऱ्यांना सोडून दिलं. प्राण पणाला लावून ब्रिटीश साम्राज्यशाहीशी झुंज देणारे हे सारे नेते जेव्हां बाहेर आले तेव्हां लोकांच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्यांनी गगनभेदी जयजयकार केला आणि गुलाल उधळून व पुष्पमाला बहाल करून आपल्या वीरांचं स्वागत केलं. भारत स्वतंत्र झाला - लवकरच १९४७ साल उजाडलं. पंधरा
ऑगस्ट या दिवशी बारा वाजता हिंदुस्थानव पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करण्यांत आलं.

१५ ऑगस्ट १९४७! सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस!- त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्या एका उदात्त ध्येयासाठी असंख्य क्रांतीकारकांनी अतोनात कष्ट सहन केले, कारावास भोगले आणि प्रसंगी प्राणाचं मोलही दिलं त्याचं चीज झालं होतं. आणि याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल मोतिलाल नेहरू यांची नेमणूक करण्यात आली.


पंतप्रधानपदाची धुरा पंडित नेहरूंनी आपल्यावरील जबाबदारी पूर्णपणे ओळखून देशाचा कारभार बघायला सुरुवात केली. पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या एकूण धकाधकीच्या राजकीय जीवनाला सुरवात झाली. हा थोर पंतप्रधान विचारांनी आणि कृतीने पुरोगामी होता. अंध श्रद्धेपेक्षा बुद्धिवादावर भर देणारा आणि कर्मठपणापेक्षा माणुसकीला जपणारा असा हा पंतप्रधान जिथं जिथं त्यांना अन्याय दिसला, अपमान आढळला आणि फसवणूक जाणवली तिथं तिथं ते वाघाच्या तडफेनं पंतप्रधान असताना तुटून पडले आणि माणुसकीच्या रक्षणासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. ते निर्भिड बाण्याचे पंतप्रधान होते. 

त्यांना दलित आणि पीडीत जनतेबद्दल मनापासून सहानुभूति वाटत असे, दुःखितांचे अश्रू पाहून नेहरुंच्या मनांत कालवाकालव होत असे. नेहरूंनी त्यांच्या दुःखाचं मूळच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 'नियोजना'ची कास धरली. निरनिराळ्या योजना आखल्या आणि देशांतील श्रमशक्तीचा योग्य वापर करून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जगाच्या राजकारणालाही आपल्या स्वतंत्र विचारांची देणगी पंतप्रधान नेहरूंनी दिलेली आहे. प्रत्येक देशाचा सार्वभौम अधिकार मान्य करणारं पंचशीलेचं तत्त्वज्ञान हे देखील नेहरूंनी जगाला दिलेलं एक महान् असं तत्त्वज्ञान होय. 

तुरुंगात असताना लेखन वाचनाचा छंद पंडित जवाहरलाल नेहरू हे जसे थोरराजकारणी होते तसेच श्रेष्ठ लेखकही होते. जॉन गंथर नांवाच्या एका अमेरिकन पत्रपंडितानं, जगांतील श्रेष्ठ अशा दहा इंग्रज ग्रंथकारांमध्ये त्यांची गणना केली आहे. . पंडितजींनी आपलं बरंचसं लेखन तुरुंगामधेच केलेलं आहे. ब्रिटीश सरकारनं त्यांना अटक करून जवळ जवळ आठदहा वर्षाची सक्तीची विश्रांती दिली म्हणून तर हे शक्य झालं.


त्यांना वाचनाचा दांडगा नाद, अहमदनगरच्या तुरुंगांत असते वेळी तीन वर्षांच्या मुदतीत त्यांनी जवळ जवळ एक हजार पुस्तक वाचून काढली. तुरुंगामधील वास्तव्यांत त्यांनी मोठमोठ्या ग्रंथाचं वाचन केलं, त्यावर चिंतन केलं आणि आपले विचार लेखनबद्ध केले. म्हणूनच त्यांना 'ग्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी', 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या सारखे महान् ग्रंथ लिहिता आले. नेहरुंची साहित्यसंपदा पंडित नेहरूचं लिखाण अतिशय सुबोध असं आहे.आपुलकी आणि जिव्हाळा हा त्यांच्या लेखन शैलीचा गुण आहे. ते भाषेचे शिल्पकार आहेत. शब्दांचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना फार चांगलं कळलं होतं.

 कल्पनांची आतषबाजी किंवा शब्दांचा फापटपसारा त्यांच्या लेखनात कुठंही आढळणार नाही. त्यांचे आत्मचरित्र तर जगामधील थोर वाङमयात गणलं जातं!
'ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी' म्हणजे जगाच्या इतिहासाची झलक आणि 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' म्हणजे भारताचा शोध. पहिला ग्रंथ त्यांनी पत्रात्मक पद्धतीनं लिहिला आहे. ह्या ग्रंथामधून निरनिराळ्या पत्राद्वारे त्यांनी जगाचा इतिहास आपल्या प्रिय कन्येला समजावून दिला आहे. इंदिरेला जी गोडी प्राप्त झाली आहे तीच गोडी आणि तेंच वात्सल्य नेहरूंच्या प्रत्येक ग्रंथात दिसून येतं. 

भारताचा शोध' हा त्यांचा ग्रंथ म्हणजे आपल्या दिव्य संस्कृतीचा इतिहासच ! त्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची बैठक आणि मोठेपण यांचं विश्लेषण केलेलं आढळतं आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्वत:चाच इतिहास वर्णन केला आहे.

ह्या तीन ग्रंथांशिवाय सोव्हिएट रशियावरील त्यांचा विवेचक ग्रंथ आणि व्याख्यानांचे व स्फुट लेखांचे संग्रह ही पुस्तकं आहेतच. याशिवाय अनेक गौरव ग्रंथांत त्यांनी लिहिलेले लेख,अनेक लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी लिहीलेल्या प्रस्तावना, राष्ट्रीय संयोजन समितीच्या कामकाजांवर केलेली टिपणं ही व वेळोवेळी के लेली भाषणं अशी आणखी किती तरी वाङमयीन सामुग्री अद्यापि पुस्तक रूपानं एकत्रित होऊन प्रसिद्ध व्हावयाची आहे. अगदी अलिकडे त्यांचं ‘बंच ऑफ लेटर्स' (पत्रसंग्रह) नावाचं नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे.

अलाहाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या नॅशनल हेरॉल्डमध्ये त्यांनी अविरत आणि भरपूर लेखन केलेलं आहे.
कवी मनाचे नेहरु नेहरु वृत्तीनं तर कवीच होते. निसर्गाचं त्यांना अतिशय वेड होतं. निसर्गाच्या सान्निध्यात ते सुखावून जात. हिरवीगार डोलणारी शेतं, दऱ्याखोऱ्यातून, टेकड पहाडातून खळाळणारे झरे, आकाशात उडणारे पक्षी सारे सारे त्यांना विलोभनीय वाटे. त्यांना फुलं खूप आवडत पण लाल गुलाबाची टप्पोरी कळी त्यांना खूप भावत असे. 

पटकन ते आपल्या कोटाच्या खिशात ती खोवत. मुलांचे चाचा लहान मुलं तर त्यांना अतिशय प्रिय. कितीही महत्त्वाचं काम असो अथवा मनात कितीही गहन विचार चाललेला असो, लहान मूल समोर दिसलं की नेहरूंची कळी खुललीच, हातातलं काम बाजूस ठेवून त्या मुलाला जवळ घेत, त्याचे गाल प्रेमाने दाबत, गालांचे पापे घेऊन त्यांना खाऊ देत. गुबगुबीत गालांची छोटी छोटी मुलं पाहून नेहरु एकदम खुष होऊन जात. मुलांना ही हे चाचा खूप आवडत.

लहान मुलांवरील त्यांच्या निष्कपट प्रेमामुळं ते भारतांतीलच नव्हे तर साऱ्या जगांतील मुलांचे "चाचा' बनले होते. गांधीजींनाही नेहरुंबद्दल आत्मविश्वास ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींचा वध झाला. जवळ जवळ तीस वर्षांच्या सहवासांत महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये पितापुत्राचं नातं निर्माण झालं होतं. दोघांमधे प्रेमाचे नाते निर्माण झाले. याला कारण एकच. दोघांनाही देशाची चिंता होती.दोघेही कट्टर देशभक्त होते. देशभक्तीच्या या समान दुव्यामुळंच गांधीजीनी नेहरूना सावरून धरलं आणि नेहरूंनी त्यांना वडिलापेक्षाही अधिक मान दिला. म्हणूनच 'माझ्या मागून जवाहरच या देशाचा कारभार पाहिल, त्याच्या हाती देश सुरक्षित राहिल' असे उद्गार गांधीजींनी आपल्या मरणापूर्वी काढले होते आणि ते खरे
झाले.
. देशाचे शांतिदूत पंडित नेहरूंना तर प्रत्यक्ष शांतिदूत असंच म्हटलं जाई. शांतिदूत म्हणजे शांततेचा पुरस्कार करणारी व्यक्ति. जगामधे शांतता नांदावी, कुठंही लढाई झगडा होऊ नये अस नेहरूंना नेहमी वाटे. कारण लढाईच्या काळात देशामध्ये किती गडबड गोंधळ होतो, देशविकासाची कामं किती खोळंबतात आणि त्याचा परिणाम म्हणजे देशात दारिद्य येतं हे नेहरूंनी ओळखलं होतं. म्हणूनच ते जागतिक शांततेचा सतत पुरस्कार करीत राहिले. म्हणूनच रशिया आणि अमेरिका या दोन देशांनी त्यांना, "शांतिदूत'चा बहुमान दिला.
अशा रीतीने भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्थान अढळ आहे. त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारतीय जनमानसावर प्रभाव टाकला आणि आपलं स्वतःचे वेगळेपण जगापुढे दाखवलं.
नेहरूंना देवाज्ञा २७ मे १९६४ रोजी त्यांचं निधन झालं. 

बुधवारी सकाळी त्यांच्या पाठीत कळ आली आणि दुपारी दोन प्रहरी त्यांचे देहावसन झालं. अगदी शांत आणि सुहास्य वदनानं ते मृत्यूला सामोरे गेले. एक तेजस्वी व्यक्तिमत्व त्या दिवशी लोप पावलं. स्वतंत्र भारताचा एक झुंजार नेता आणि जागतिक शांततेचा महान् पुरस्कर्त्याला देवाज्ञा झाली.
१५ ऑगस्ट १९४७ पासून जीवनाच्या अखेरपर्यंत ते ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत होते. अगदी मृत्यूच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांनी ह्या देशाची सेवा केलेली आहे. नेहरूनी दाखविलेल्या मार्गानं वाटचाल करणं आणि त्याचं अपुरं राहिलेलं ध्येय पूर्ण करणं हेच आपलं कर्तव्य. "चाचा नेहरू अमर
रहे !"

pandit jawaharlal nehru information in marathi

morarji desai information in marathi


२४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई भारताचे सहावे पंतप्रधान झाले. काँग्रेस पक्षाचे नसलेले असे ते पहिलेच पंतप्रधान होत. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हारला आणि जनता पक्षाचे मोरारजी पंतप्रधान झाले. मोरारजी पक्के गांधीवादी, सच्चे देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी, कणखर मनाचे, त्यागी वृत्तीचे असे व्यक्तिमत्त्व होते. भारताचा राजकीय इतिहास घडविण्यात मोरारजींचा मोठा वाटा आहे.

morarji-desai-information-in-marathi
morarji-desai-information-in-marathi


गुजरातमधील बलसाड जवळच्या भादोली या खेड्यात मोरारजींचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी झाला. वडील सौराष्ट्रातील भावनगर संस्थानात शिक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावनगर व कुंडला येथे झाले. त्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बलसाड येथे झाले. मॅट्रिकच्यावर्षी वडिलांचा मृत्यू झाला. पुढील शिक्षण मुंबईला विल्सन कॉलेजात घेतले. ते इंटर पास झाले तेव्हा स्वराज्याची चळवळ चालू झालेली होती.

 महात्मा गांधी, अॅनी बेझंट, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता अशा लोकांच्या भाषणांची मोरारजींवर फार छाप पडली. लो. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाने ते फार प्रभावित झाले. १९१७ च्या सुमारास लष्करी शिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने यू. टी. सी. ची स्थापना केली. मोरारजीभाई त्यात दाखल झाले. मे १९१८ मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून अहमदाबादला त्यांची नेमणूक झाली. १९३० मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि ते काँग्रेसचे सभासद झाले. १९३० साली गुजराथ काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९३१-३७ पर्यंत ते या पदावर होते.
 
१९३६ ते ४६ पर्यंत त्यांनी काँग्रेसवर्कीग कमिटीच्या सचिवपदाची धुरा सांभाळली. १९३७ साली ते मुंबई विधानसभेचे सदस्य झाले. नंतर ते काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात रेव्हेन्यू व वनखात्याचे मंत्री झाले. सुरतजवळील धारासना येथे मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला, कायदेभंगामुळे तुरुंगवासही भोगला. अशात-हेने त्यांना ३-४ वेळा तुरुंगवास घडला. १९४२ च्या भारत छोडो' आंदोलनाच्यावेळीही त्यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची धरपकड झाली.

बाळासाहेब खेरांनी मोरारजींना १९३७ मध्ये आपल्या मंत्रीमंडळात प्रथम घेतले. १९४६ मध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगाल येथे जातीय दंगे उद्भवले तेव्हा मोरारजींनी कडक कारवाई केली. म. गांधींच्या हत्येनंतरही जेव्हा हिंसा, जाळपोळ झाली, तेव्हाही मोरारजींनी कडक उपाय योजना करुन अत्याचार थांबवले. त्यांनी 'गृहरक्षकदला'ची संघटना सुरू केली.

१९३७-३८ ला मोरारजींकडे वनखात्याचा कारभार सोपवण्यात आला. तेव्हा आदिवासींच्या उन्नतीचे प्रयत्न केले. १९४६ ते १९५६ मोरारजी देसाई मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी शासन व्यवस्थेत सुधारणा घडवली. कायदा, सुव्यवस्था व भ्रष्टाचार विरोधी मोहिमा आखल्या. १९५० मध्ये दारूबंदी अंमलात आणली. मुंबईत दळणवळणाच्या सेवेत सुधारणा केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी न ठेवता मातृभाषेतून शिक्षणास सुरूवात केली.

 जनताभिमुखी कारभार करून जनतेच्या अडचणी निवारण केल्या.पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मोरारजीभाई मध्यवर्ती मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री झाले. १९५८ मध्ये ते अर्थमंत्री झाले. तीन पंचवार्षिक योजना त्यांनी राबविल्या. १९६३ मध्ये त्यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा अंमलात आणला. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मोरारजी उपपंतप्रधान व अर्थमंत्री होते. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्याकाळात देशाची आर्थिकस्थिती सुधारू लागली. मोरारजी यांनी सामाजिक व राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात योगदान दिले आहे.

इंदिरा गांधी यांचा १९७७ सालच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला आणि २४ मार्च १९७७ रोजी मोरारजींचा शपथविधी होऊन ते देशाचे पंतप्रधान झाले. प्रारंभी हे सरकार चांगले चालले. परंतु पुढे जुन्या विचारांचे काँग्रेसजन, समाजवादी नेते अशा भिन्नभिन्न विचारसरणीच्या नेत्यांना एकत्रित ठेवण्यात मोरारजींना अपयश आले. राजकीय पातळीवरील अस्थिरतेमुळे त्यांची कारकीर्द दोन वर्षात संपुष्टात आली. परंतु या काळात त्यांनी सच्चा देशभक्त, कर्मठ गांधीवादी व कणखर नेतृत्त्व देणारा नेता म्हणून नावलौकिक मिळविला.

morarji desai information in marathi

gulzarilal nanda information in marathi


गुलजारीलाल नंदा हे भारताचे दुसरे पंतप्रधान होत. दोनवेळा त्यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून तनमनधन अर्पून प्रयत्न करणाऱ्यांपैकी नंदा हे एक होत. भारत उभारणीच्या काळात ते महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्याबरोबर सक्रीय भाग घेत होते. ते कट्टर गांधीवादी होते. नंदा यांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. पूँछ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे वडील शाळा मास्तर होते.

 आई वडिलांचे गडद संस्कार त्यांच्या मनावर झाले. त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून आईने खूप कष्ट घेतले. बी. ए. ची परीक्षा झाल्यावर ते आर्य समाजाचे सदस्य बनले. त्यानंतर लाहोर, अलाहाबाद, आग्रा येथून एम. ए., एल एल. बी. पर्यंतचे शिक्षण घेतले. मुंबईतील नॅशनल कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९२१ मध्ये ते असहकाराच्या आंदोलनात सहभागी झाले. गांधीजींच्या आदेशानुसार ते अहमदाबादेत मजूर संघटनेकडे लक्ष देऊ लागले.

gulzarilal-nanda-information-in-marathi
gulzarilal-nanda-information-in-marathi


१९२२ ते १९४६ या काळात नंदा वस्त्रोद्योग मजूर संघटनेचे सचिव होते. त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९४२ ते ४४ त्यांनी सत्याग्रह चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटकही झाली होती. १९५० मध्ये त्यांनी भारत सेवक समाज, भारत साधू समाज, नवजीवन संघ, मानवधर्म मिशन व पीपल्स फोरमची स्थापना केली. 

१९५० साली पंडित नेहरूंनी त्यांना पंचवार्षिक योजनेत सहभागी होण्यासाठी बोलाविले. पंडित नेहरूंनी देशाला आर्थिक नेतृत्व व दृष्टी दिली, त्यात सहकारी म्हणून नंदा यांचाही मोठा वाटा होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेत पंडित नेहरूंनी त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद दिले.


१९४७ ते १९५० या काळात श्री नंदा केंद्रात मजूर व गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते. कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टचे ते एक विश्वस्त होते. १९५० ते ५३ पर्यंत त्यांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले. १९५३ ते १९५७ या काळात ते केंद्रीय नियोजन पाटबंधारे व वीजमंत्री बनले. १९५७ ते ६२ ते केंद्रात नियोजन मजूर व रोजगार मंत्री होते. १९६० ते ६३ या काळात ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. उत्तम कार्य करणारे असल्यामुळे पंडित नेहरूनी १९६२ पासून त्यांना गृहमंत्रीपद दिले होते. 

गृहमंत्री असताना काश्मीरमधील हजरतबाल आणि तामिळनाडूतील भाषाविषयक समस्या त्यांनी समाधानकारकरित्या सोडविल्या.
पंडित नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. तेव्हा त्यांची जागा कोण घेऊ शकणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला. तेव्हा अत्यंत बुद्धिमान व कुशाग्र बुद्धीच्या श्री. गुलजारीलाल नंदा यांच्या हाती कार्यकारी पंतप्रधानपद सोपविण्यात आले. पुनः एकदा
 
हीच भूमिका त्यांना भूषवावी लागली, ती १९६६ साली. १० जानेवारी १९६६ ला लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले आणि पुनः पंतप्रधानपदी कोण हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हाही श्री. नंदा यांनाच पंतप्रधान करण्यात आले. ते तळमळीचे कार्यकर्ते होते. देशाचे हित जपणारे होते. आपल्या कारकीर्दीत ते वेष पालटून हिंडत असत व भ्रष्टाचार अथवा अनैतिक कृत्ये करणाऱ्यांचा समाचार घेत असत. अतिशय साध्या, निरलस वृत्तीने रहाणे त्यांना पसंत होते. कर्तव्यनिष्ठा व इमानदारी हे त्यांचे स्थायीभाव होते.


श्री. नंदा हे केवळ पदे भूषवणारे पुढारी नसून त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. उच्चस्तरीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी देशात प्रथम सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची स्थापना केली. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी संयुक्त सदाचार समिती स्थापन केली. कुरुक्षेत्र ङ्हलपमेंट बोर्डाचे ते सदस्य होते. १९७०-७१ ला ते केंद्रीय रेल्वेमंत्री होते. अशा त-हेने जवळजवळ ५६ वर्षे श्री. नंदा काँग्रेसमध्ये कार्यरत होते. इंदिराजींनी आणीबाणी लादली. मग त्यांनी काँग्रेसपक्ष सोडला.

 देश ऐक्यासाठी त्यांनी 'मानवधर्म मिशन' चे कामही केले. मानवधर्माचा विकास उच्च मूल्यांद्वारे व्हावा, यासाठी मानवधर्म मिशनची स्थापना झाली होती. खादीचे स्वरूप', बापूंची अनुसूयाबेनना पत्रे', द्वितीय पंचवार्षिक योजना - एक दृष्टीकोन ' अशी त्यांची अनेक पुस्तके त्यांच्या लेखणीची चुणूक दाखवतात.
शेवटपर्यंत ते राजकारण्यांना मार्गदर्शन करीत असत. दूरदर्शीवृत्तीचा खंदा शिलेदार असे त्यांचे वर्णन करता येईल. 

ते कट्टर गांधीवादी होते. देशाच्या ऐक्यासाठी व मानवधर्माच्या विकासासाठी ते निरंतर झटले. श्री नंदा यांचे राजकारण त्यांची जीवनदृष्टी आणि अर्थशास्त्राची त्यांची मीमांसा पाहून, देशासाठी झटणारे ते एक राजकीय फकीर होते, असे म्हणावेसे वाटते. १९७७ मध्ये त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

gulzarilal nanda information in marathi