indra kumar gujral information in marathi१९९७ - ९८ या वर्षी श्री. इंद्रकुमार गुजराल हे भारताचे पंतप्रधान होते. ते अकरावे पंतप्रधान होत. मृदुभाषी व मुरब्बी राजकारणी असे त्यांचे वर्णन केले जाते. ते अतिशय विचारवंत व बुद्धिमान होते. त्यांची संसदीय कारकीर्द १९६४ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून सुरू झाली. फेब्रुवारी १९६९ मध्ये त्यांना इंदिरा गांधी मंत्रीमंडळात माहिती व प्रसारण खाते मिळाले. आणीबाणीच्या अगोदर ते रशियातील राजदूत बनले होते. विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या मंत्रिमंडळात नोव्हेंबर १९८९ पासून परराष्ट्र व्यवहार खाते त्यांनी सांभाळले. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
indra-kumar-gujral-information-in-marathi
indra-kumar-gujral-information-in-marathi


अशा या नेत्याचा जन्म ४ डिसेंबर १९१९ रोजी पाकिस्तानातील झेलम येथे झाला. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्म झाल्यामुळे त्यांना घरातील राष्ट्रभक्तीच्या वातावरणाचा लाभ मिळाला. त्यांचे पिता अवतार नारायण गुजराल व आई स्वातंत्र्यलढ्यातील झुंजीत भाग घेणारे पंजाबातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे शालेय शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर हे कुटुंब दिल्लीमध्ये आले व तेथे त्यांनी आयात निर्यात व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांचा शीलाताईंशी विवाह झाला. त्या उत्तम कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.


१९५० साली इंद्रकुमार यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला. १९६४ पासून त्यांच्या संसदीय राजकीय कारकीर्द सुरु झाली. इंदिराजींचे सहकारी म्हणून त्यांना खास स्थान मिळाले. इंदिराजी त्यांचा खास सल्ला घेत असत. १९६७ साली संसदीय व्यवहार व दळणवळण खात्याच्या राज्यमंत्रीपदी त्यांची नेमणूक झाली. १९७६ साली नियोजन
आयोगावर त्यांची नियुक्ती झाली. इंदिराजींनी त्यांना खास राजदूत म्हणून रशियाला पाठवले. काहीकाळाने इंदिराजी व गुजराल यांची मते जुळेनाशी झाली तेव्हा इंद्रकुमार काँग्रेस सोडून जनतादलात दाखल झाले. 

१९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जालंधर मतदार संघातून ते निवडून आले व विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या कारकीर्दीतही ते परराष्ट्रमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी चीन, बांगला देश व पाकिस्तानशी मैत्री संपादन केली. त्यांच्याच कारकीर्दीमध्ये गंगा पाणी वाटप प्रश्नासंबंधी बांगला देशबरोबर वाटाघाटी करुन ३० वर्षांचा करार करण्यात आला. परंतु पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द फारशी टिकू शकली नाही. मध्यावधी निवडणुकीत भारतीय जनतापार्टी मोठ्या प्रमाणात निवडून आली व जनतापक्षाचे सरकार कोसळले. त्यानंतरही ते राज्यसभेचे सदस्य आहेत.


त्याचप्रमाणे गुजराल नारी निकेतन ट्रस्ट, इंडो पाक फ्रेंडशिप सोसायटी, दिल्ली आर्ट थिएटर, रोटरी क्लब ऑफ दिल्ली अशा अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सिद्धहस्त लेखकही आहेत.

indra kumar gujral information in marathi

H D deve gowda information in marathiहरदनहळ्ळी दौड्डेगौडा देवेगौडा अशा नावाचे हे भारताचे दहावे पंतप्रधान होत. यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाची कहाणी थक्क करुन सोडणारी आहे. संगणकाच्या क्षेत्रात बंगलोर हे शहर सर्वात आघाडीवर असल्याने त्याला 'सिलिकॉन व्हॅली' असे म्हटले जाते, याचे श्रेय देवेगौडा यानाच आहे. हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर तालुक्यातील हरदनहळ्ळी गावात देवेगौडा यांचा १८ मे १९३३ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डगौडा. एच. डी. देवेगौडा हे व्यवसायाने शेतकरी आहेत. 

H-D-deve-gowda-information-in-marathi
H-D-deve-gowda-information-in-marathi

परंतु त्यांनी सिव्हील इंजिनियरींगचा डिप्लोमा घेतला होता. काहीकाळ ठेकेदार म्हणून त्यांनी काम केले. १९६२ मध्ये कंत्राटदारीचा व्यवसाय बंद करून त्यांनी राजकारणातच उतरण्याचे ठरविले. १० वर्षे काँग्रेसचे काम करूनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. १९६९ साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने संघटना काँग्रेस'चा देशभरात धुव्वा उडविला होता. पण देवेगौडा मात्र निवडून आले आणि विरोधी पक्षाचे नेते बनले.

१९७८ सालापासून ते जनतादलाचे पुढारी बनले. १९८३ साली तेच कर्नाटकचे मुख्यमंत्री व्हायचे पण त्यावेळी रामचंद्र हेगडे मुख्यमंत्री झाले. पुढे १९९१ साली देवेगौडा लोकसभेवर निवडून गेले, १९९३ साली जनता दल व जनता पक्ष यांची युती झाली व जनतादलाला हुकमी बहुमत मिळाले. १९९४ साली देवेगौडा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.


राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसलेला, पण राज्याचे राजकारण यशस्वीपणे करू शकणारा हा नेता या नंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरला. १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किमान बहुमत मिळाले नाही. ज्योतिबसू, विश्वनाथ प्रतापसिंग यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला, अशाप्रकारे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना राष्ट्रीय आघाडीने नेतेपदाची जबाबदारी देवेगौडा यांच्यावर टाकली आणि १ जून १९९६ रोजी देवेगौडांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

 केंद्रीय मंत्रिमंडळाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी वर्षभर पंतप्रधान म्हणून मोलाची कामगिरी केली. त्यांच्या कारकीर्दीमध्ये परदेशी कंपन्यांबरोबर २८ करार झाले. देशाची गुंतवणुकीची परिस्थिती थोडी सुधारली. बंगलोर संगणकाच्या क्षेत्रात आघाडीवर आले, याचे श्रेय देवेगौडा यांनाच द्यायला हवे. देवेगौडा यांना हिंदी भाषा येत नव्हती. पंतप्रधानांना राष्ट्रभाषा येत नाही, हे जनतेला मान्य नव्हते. देशातील वाद, अंतर्गत भांडणे यामुळे श्री. देवेगौडा फारकाळ या पदावर राह शकले नाहीत.

H D deve gowda information in marathi

dr zakir hussain information in marathi


जामिया मिलिया इस्लामिया ही दिल्लीतील ओक आदर्श शिक्षण संस्था आहे. मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी स्वतः हातात ब्रश व पॉलिश घेणारे संस्थेचे चालक होते, डॉ. झाकीर हुसेन ! डॉ. झाकीर हुसेन हे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, एक उत्कृष्ट शिक्षक होते, त्यांच्यासारखे क्रियाशील, सृजनशील, सुसंस्कृत व समर्पित जीवन म्हणजे आशा आकांक्षांचे स्फूर्तिस्थान होय.

डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म १८९७ मध्ये प्रसिद्ध अफगाण घराण्यात झाला. त्यांचे वडील फिदा हुसेनखान नामवंत वकील होते. १९०५ मध्ये वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी आईवर येऊन पडली. १९११ मध्ये आईही मृत्यु पावली. आईच्या मृत्युनंतर ते हसन शहा यांच्याकडे आले. त्यांनी झाकीरना चार वर्षे संस्कारक्षम शिक्षण दिले. मॅट्रिक झाल्यावर उच्च शिक्षणासाठी अलिगड येथे अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयात त्यांनी नांव नोंदविले. पदवीधर झाल्यावर ते एम्. ए. झाले आणि वडिलांप्रमाणे वकिलीत नांव मिळवण्यासाठी त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. 

dr-zakir-hussain-information-in-marathi
dr-zakir-hussain-information-in-marathiशिक्षण चालू असताना ते प्रखर राष्ट्रवादी होते व परकीय सत्तेविरुद्ध होते. 'कॉमेड' हे साप्ताहिक 'अल्हिलाल' यातील ओजस्वी लिखाणाच्ना झाकीर यांच्यावर प्रभाव पडला आणि पुढे ते असहकारीतेच्या चळवळीत ओढले गेले. अलिगड येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते जर्मनीत गेले. तेथे त्यांना गेर्डा फिलिप्स वॉर्न या थोर समाजसेविका भेटल्या. पुढच्या काळात झाकीर यांनी
 
स्वत:ला 'जामिया'साठी वाहून घेतले. अर्थशास्त्राची पीएच. डी. पदवी घेऊन ते भारतात परतले.
ते भारतात परतले तेव्हा 'जामिया'ची आर्थिक परिस्थिती पार बिघडली होती. हकीम अजमल खान जामिया'चे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांनी जामिया'च्या मदतीसाठी आपली काही मालमत्ता विकली. झाकीर आपले वेतन अगदी कमी करुन घेऊ लागले. पण त्यांनी ' जामिया मिलिया'ला आकार देण्याची जबाबदारी घेतली आणि तिला आदर्श गुरुकुलाचे स्वरुप प्राप्त करुन दिले. संस्थेला त्यांनी २३ वर्षे मार्गदर्शन केले.

'जामिया'त अध्यापनाचे काम करीत असतानाच झाकीर यांनी असहकारिता चळवळीत भाग घेतला. डॉ. झाकीर यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की त्यांना जी राष्ट्रीय कीर्ति मिळत गेली, त्याला त्यांच्या विद्वत्तेएवढीच त्यांची सचोटी व निष्कामवृत्तीसुद्धा कारणीभूत होती. 'जामिया'चे शैक्षणिक कार्य नेहरूंनाही पसंत होते. “ इस्लामी धर्म आणि संस्कृती याच्या आधारे भारतातील मुस्लीमांना शिक्षण देणे हा 'जामिया'चा उद्देश होता. धर्म या दृष्टीने इस्लामचा अर्थ फक्त एकाच ईश्वराची आराधना होय. अशा आराधनेमुळे जगातील सर्व माणसात बंधुभाव निर्माण होतो " असा त्यांचा विश्वास होता.

झाकीर यांनी लेखक व वक्ता या नात्याने जे कार्य केले होते, त्यामुळे त्यांना व्याख्याने देण्याची निमंत्रणे येऊ लागली. राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रसिद्धी पराङ्मुख कार्याची जरुरी आहे, यावर त्यांचा विश्वास होता. मूलभूत शिक्षणाची योजना तयार करण्यासाठी महात्मा गांधीजींनी झाकीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली परंतु दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ही योजना अंमलात आली नाही.

सामाजिक दृष्टीकोनातून शिक्षण दिले जावे, यावर झाकीर यांचा नेहमीच भर होता. काम करता करता शिक्षण हा त्यांच्या शिक्षण पद्धतीचा गाभा होता. आचार हे शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे असे ते मानीत असत. त्यांचा अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी संबंध होता आणि शिक्षण पद्धती ठरविण्यास झाकीर यांनी चालना दिली. थोडक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले.

१९५२ ते १९६० पर्यंत झाकीर हुसेन बिहारचे राज्यपाल होते. या काळात त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पंडित नेहरूंच्या आग्रहामुळे ते लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले. यावेळी राज्यसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. ६ मे १९६७ ला डॉ. झाकीर हसेन राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी भाषण केले - “ महात्मा गांधींच्या पायाशी बसून मी माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला पात्र होण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.

 हे आपले बोलणे त्यांनी सार्थ करुन दाखविले. ते तरुणांशी नेहमी सुसंवाद साधीत असत. डॉ. झाकीर हुसेन यांच्या ठायी अनेक गुणांचा सुरेख संगम झाला होता. त्यांचे बोलणे चमकदार, युक्तिवाद बिनतोड, स्वभाव सौजन्यशील होता. ते महान पंडित, विचारवंत व नामवंत लेखक होते. ते सृजनशील रसिक होते. राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावरही ते नम्रच राहिले. भपका वा सत्ता याविषयी त्यांना तिटकारा होता. आपल्या निर्मळ जीवनाने त्यांनी सर्वांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. साधी रहाणी, जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा व समर्पित जीवनाचा ते आधार होते. जग त्यांना एक थोर मुत्सद्दी म्हणून ओळखू लागले.

डॉ. झाकीर यांचे व्यक्तिमत्त्व मोठे व उदात्त होते. राष्ट्राच्या स्वातंत्र्य आंदोलनात ज्यांनी स्वार्थ निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीने भाग घेतला, त्यापैकी झाकीर एक होते. राष्ट्रवादाचे ब्रीद ज्या मुसलमान नेत्यांनी सोडले नाही, त्या ध्येयनिष्ठ व निधर्मी पुढाऱ्यांचे डॉ. झाकीर हे अग्रणी होते. इतकी दक्ष व सृजनशील, इतकी सुसंस्कृत व समर्पित, इतकी निर्भय व सत्यान्वेषी आणि राष्ट्रीय मान्यता पावलेली ही कथा म्हणजे चैतन्याचा आणि सौख्याचा झराच होय. अशा या श्रेष्ठ व्यक्तीचा ३ मे १९६९ ला हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाला. समर्पित जीवनाचा एक आदर्श काळाच्या पडद्याआड गेला.

dr zakir hussain information in marathi

dr shankar dayal sharma information in marathi 
डॉ. शंकर दयाळ शर्मा हे आपले राष्ट्रपती अतिशय विद्वान होते. त्यांनी पीएच डी. ही पदवी तर मिळवली होतीच, पण इतरही अनेक विद्यापीठांच्या पदव्या त्यांनी संपादन केल्या होत्या. त्यांचे शिक्षण अलाहाबाद युनि. केंब्रिज युनि. व हॉवर्ड लॉ स्कूल येथे झाले. इंग्लिश साहित्यात त्यांनी एम. ए. पदवी मिळवली. मग लखनौ विद्यापीठातून एल. एल. एम्. ही पदवी घेतली. तेव्हा ते विद्यापीठात प्रथम आले होते. लखनौ विद्यापीठाकडून त्यांना चक्रवर्ती गोल्ड मेडल मिळाले होते. केंब्रिज युनिर्व्हसिटीतून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. ते केंब्रिज व लखनौ या दोन्ही विद्यापीठांमध्ये कायद्याचे प्राध्यापक होते.

dr shankar dayal sharma information in marathi
dr shankar dayal sharma information in marathi 


लखनौमध्ये १९४० मध्ये त्यांनी आपली वकिलीची पॅक्टिस करायला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता व तुरुंगवासही भोगला होता. पुढे त्या वेळच्या भोपाळ राज्याचे ते मुख्यमंत्री झाले. १९७४ ते १९७७ त्यांनी मध्यप्रदेश सरकारमध्ये अनेक खात्यांची मंत्रीपदे सांभाळली. याशिवाय भोपाळ काँग्रेस कमिटी, इंडियन नॅशनल काँग्रेस आदि संस्थांचे ते अध्यक्ष होते. 'ऑल इंडिया काँग्रेस कमिटी ' चे ते ३२ वर्षांपेक्षा अधिककाळ सदस्य होते. ते आंध्र प्रदेश, पंजाब व महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ३ सप्टेंबर १९८७ पासून ते भारताचे उपराष्ट्रपती झाले.

 ते उपराष्ट्रपती असताना दिल्ली युनिव्हर्सिटी, पंजाब युनिव्हर्सिटी व पाँडेचरी युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होते. एकंदर २२ विद्यापीठांचे ते कुलगुरू होते. केंब्रिज युनिव्हर्सिटीने त्यांना मानाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी दिली. अनेक विद्यापीठांमधून त्यांनी पदवीदानप्रसंगी भाषणे केली आहेत. 'डॉक्टर ऑफ लॉ', 'डॉक्टर ऑफ सोशल सायन्सेस', 'डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ', 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' अशा अनेक पदव्या त्यांना भारतातील व भारताबाहेरील विद्यापीठांकडून मिळाल्या आहेत.

' इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स', 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन ' अशा अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते. २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांनी परदेशात अनेक शिष्टमंडळे नेली आहेत. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी त्यांना 'राष्ट्ररत्नम्' असा किताब दिला. श्रवणबेळगोळच्या गुरुनी त्यांना 'धर्मरत्नाकर' अशी पदवी दिली. इंटरनॅशनल बार असोसिएशनने त्यांना ' द लिव्हिंग लीजंड ऑफ लॉ' हा पुरस्कार दिला. त्याची ग्रंथसंपदा :

1) Jawaharlal Nehru - Selected Speaches
2) Horizons of Indian Education
3) For a better Future
4) The Democratic process 
5) Aspects of Indian Thought
6) Our Heritage of Humanism 
7) मंजुषा 
8) एकत्व के मूल 
9) पंडित जवाहरलाल नेहरू
आणि आणखी कित्येक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

dr shankar dayal sharma information in marathi

dr sarvepalli radhakrishnan information in marathi 
भारतीय संस्कृती, वैदिक हिंदू धर्म, भारतीय तत्त्वज्ञान यांचा परिचय जगाला करून देण्याचे फार मोठे कार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे आधुनिक जगातले एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते, तत्त्वज्ञ होते. परकीय इंग्रजी सत्तेने राजकीय स्वातंत्र्य तर हिरावून घेतलेच होते परंतु इतरही क्षेत्रात भारताची पिछेहाट चालू होती. अशावेळी भारतीय तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे, हे डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला पटवून दिले. शुद्ध चारित्र्य, विशाल बुद्धिमत्ता, सर्व धर्माच्या विचारांबद्दल सहिष्णुता आणि जगभर फिरून आपल्या प्रभावी वाणीने जगाला घडविलेले भारताचे खरेखुरे दर्शन यामुळे त्यांना श्रेष्ठ ऋषिमनींप्रमाणे मान दिला जातो. 

dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi
dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi


ते जसे थोर तत्त्वज्ञ होते तसे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होते. अविरत ज्ञानोपासना व कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे डॉ. राधाकृष्णन हे चालताबोलता ज्ञानकोशच होते. म्हणूनच आपण त्यांचा जन्म दिवस · शिक्षकदिन ' म्हणून साजरा करतो. या दिवशी गुरुजनांचा सत्कार करुन आपण या ज्ञानयोग्याला, तेजाचा वारसा सांगणाऱ्या महान पुरुषाला आदरांजली वाहतो.


डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुपतीजवळ असणाऱ्या तिरुतानी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी झाला. त्यांच्या घरचे वळण कट्टर वैष्णवपंथी, श्रद्धाळू, होते. त्यांचे वडील वीरस्वामी आणि आई सीताम्मा, दोघेही धार्मिक श्रद्धाळू, सत्त्वशील होते. घरच्या धार्मिक संस्कारांचा ठसा डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारसरणीवर पडलेला दिसतो. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिरुपती येथे झाले. पंधराव्या वर्षी ते मॅटिक झाले. त्यांना अध्यात्माची गोडी होती व वाचनाची खूप आवड होती. आपला सर्व वेळ ते ग्रंथांच्या सहवासात घालवीत असत. त्यांनी उच्च शिक्षण वेल्लोर व मद्रास येथे घेतले.


 अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा वेदांतातील नीतिशास्त्र' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. राधाकृष्णन एम्. ए. झाले आणि उत्कृष्ट अध्यापक म्हणून प्रसिद्धीस आले. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नेमले. १९२१ मध्ये मैसूर विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख नेमले. मैसूर विद्यापीठात असताना त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्त्व सांगणारे ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले. या ग्रंथांनी त्यांना भारताबाहेरच्या जगात प्रसिद्धी दिली. १९२६ मध्ये ऑक्सफर्ड येथे व्याख्याते म्हणून त्यांना बोलावण्यात आले.


१९२६ साली इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद भरली. तेथे कलकत्ता विद्यापीठाने डॉ. राधाकृष्णन यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले. त्यांनी ही परिषद आपल्या ओजस्वी व वक्तृत्त्वपूर्ण भाषणांनी गाजविली. उंच शरीरयष्टी, स्वच्छ तलम धोतर, बंद पद्धतीचा पांढरा शुभ्र फेटा, सोनेरी फ्रेमचा चष्मा अशी डॉ. राधाकृष्णन यांची तेजस्वी मूर्ती ओघवत्या इंग्रजी भाषेत धर्माबद्दल विवेचन करू लागली की श्रोते दंग होऊन जात. इंग्लंडच्या विद्यापीठातील त्यांची हिंदूंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ' ही व्याख्यानमाला फार गाजली. पुढे ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. परदेशातील लोकांना त्यांनी हिंदूधर्म आणि तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.

 ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, त्यासाठी आपण अंतर्मख बनले पाहिजे, असे ते सांगत. आंध्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही मानाची पदवी दिली व त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे ब्रुसेल्स, झेकोस्लोव्हाकिया या विद्यापीठांनीही त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली.
१९३१ मध्ये डॉ. राधाकृष्णन आंध्र युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी आंध्र युनिव्हर्सिटीची खूपच भरभराट केली आणि तिचा शैक्षणिक दर्जा वाढवला. डॉ. राधाकृष्णन कलकत्ता, आंध्र व बनारस या विद्यापीठांचे उपकुलगुरु होते. भारत सरकारने नेमलेल्या 'युनिव्हर्सिटी कमिशन ' चे ते अध्यक्ष होते. नवीन पिढीला मानवता व प्रेम यांचे संस्कार देणारे शिक्षण व उत्तम शिक्षक पाहिजेत त्याकरिता शिक्षण आयोग स्थापन झाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.


'पूर्व आणि पश्चिम', 'धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृती', हिंदुस्थानचे अंत:करण' ( भारतीय धर्म व संस्कृतीवरची व्याख्याने ) असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रो. मूरहेड यांच्याबरोबर 'आधुनिक भारतीय तत्त्वज्ञान' हा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे. १९३६ मध्ये ऑक्सफर्ड येथे ‘पौर्वात्य धर्म आणि नीति ' या विषयाकरीता त्यांना प्रोफेसर म्हणून नेमण्यात आले. तिथल्या मुक्कामात विशेष परिश्रमपूर्वक अभ्यास करून “ पौर्वात्य धर्म आणि पाश्चिमात्य विचार" हा अभ्यासपूर्ण ग्रंथ तयार केला. १९३६ ते १९३९ या काळात त्यांनी 'म. गांधी गौरवग्रंथ ' तयार केला. भगवद् गीतेवरही त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. १९३९ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले. येथे त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट घेतले. १९४२ मध्ये स्वातंत्र्यचळवळीचा
आंदोलनाचा महत्त्वाचा काळ होता. त्यावेळी राधाकृष्णन यांनी विद्यापीठ बंद ठेवले. पुढे हे विद्यापीठ त्यांनी अतिशय भरभराटीस आणले.

१९४६ मध्ये देशात काळजीवाहू सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांना युनेस्कोच्या पहिल्या परिषदेकरिता 'भारताचे प्रतिनिधी ' म्हणून पाठवले होते. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना झाली ती, त्यांच्याच अध्यक्षतेखाली. १९४९ मध्ये पंडित नेहरू यांनी डॉ. राधाकृष्णन यांची नेमणूक मॉस्कोमध्ये राजदूत म्हणून केली. तेथेही त्यांनी राजदूत म्हणून आपली स्वतंत्र शैली निर्माण
केली, भारत व रशिया यांच्यातील मैत्री व सहकाराचा पाया घातला. १९५२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपती म्हणून नेमणूक झाली. 

अनेक परदेश दौरे करून त्यांनी साऱ्या जगाला हिंदूधर्म व तत्त्वज्ञान यांचे श्रेष्ठत्त्व पटवून दिले. पुरातन वैदिक धर्माची तत्त्वे आधुनिक जगात उपयुक्त ठरतील, त्यांचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांना शिकवले. त्यांच्या शिकवणुकीला जगभर मान्यता मिळाली. साऱ्या जगभर फिरून त्यांनी जगात भारताची शान वाढवली. त्यांचे सारे कार्य लक्षात घेऊन सरकारने १९५८ मध्ये त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब दिला. १९५६ मध्ये त्यांच्या पत्नी शिवकामम्मा मृत्यु पावल्या. हे दुःख त्यांनी धीराने सहन केले. १९५७ मध्ये ते दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती झाले. 

१९६२ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. सरकारच्या हालचाली, विरोधी पक्षांची टीका या साऱ्यांची ते माहिती करून घेत असत. त्यांच्या राहणीत भपका वा दिखाऊपणा नव्हता. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांची राहणी अगदी साधी होती. लोकसभेच्या सभासदाना ते भेटत असत. पंडित नेहरू त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत. अशा त-हेने त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रपतीपदाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रांना भेटी देऊन जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अनेक मित्र मिळवून दिले.


भारत चीन युद्धानंतर पंडित नेहरू व डॉ. राधाकृष्णन यांच्यातील संबंधांना तडा गेला. १९६४ साली पंडित नेहरूंचा मृत्यु झाला. त्यानंतर गुलजारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देवविली. १९६५ मध्ये भारत-पाक युद्ध सुरु झाले. या युद्धातील विजयानंतर मात्र त्यांना खरा आनंद झाला. परंतु लालबहादूर शास्त्रींचे अचानक निधन झाले.

१९६६ - ६७ च्या सुमारास इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये राष्ट्रपतीपदावर दुसरी व्यक्ती असावी, असा मतप्रवाह चालू झाला. तेव्हा १९६७ मध्ये डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले. त्यानंतर ते मद्रासला आपल्या ‘गिरीजा ' या निवासस्थानी राहू लागले. १९६८ मध्ये भारतीय विद्याभवनने त्यांना 'ब्रह्मविद्याभास्कर' अशी पदवी दिली. ते आपल्या घरी सतत पुस्तकातच रमले. पुढे प्रकृती ताप देऊ लागली आणि १७ एप्रिल १९७५ रोजी एका ऋषीतुल्य आयुष्याची समाप्ती झाली.

 डॉ. राधाकृष्णन यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचे निधन झाले. सौजन्य, साधेपणा व शालीनता तसेच विद्वत्ता लाभलेल्या या श्रेष्ठ तत्त्वचिंतकाचा आत्मा अमरत्त्वात विलीन याला डॉ. राधाकृष्णन स्वत: मोठे शिक्षक असल्याने त्यांचा जन्मदिन आपण  शिक्षक दिन ' म्हणून पाळतो, गुरुजनांचा आदर करतो. त्यांचे कार्य त्यांच्या ग्रंथांच्या स्वरुपात चिरस्थायी झाले आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या अमर मूल्ल्यांची सतत महती गायली आहे. एक थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, मुत्सद्दी आपल्यातून निघून गेला असला तरी आधुनिक भारतातील या ज्ञानयोगी ऋषीची प्रतिमा आपल्या अंत:करणावर सतत कोरलेली राहील. त्यांचे चिरंतन स्वरूपाचे ग्रंथ आपल्याला सतत ज्ञानदान करीत राहतील.

dr sarvepalli radhakrishnan information in marathi