P. V. Narasimha Rao information in marathi


P. V. Narasimha Rao यांचे संपूर्ण नांव पामुलपति वेंकट नरसिंहराव. हे भारताचे नववे पंतप्रधान होत. १९९१ ते १९९६ ते पंतप्रधान होते. देशाचे पंतप्रधान होणारे ते दक्षिण भारतातील पहिले नेते आहेत.
नरसिंहराव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी करीमनगर येथेच झाले. वरंगळ येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेस, आर्यसमाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्याग्रह चळवळीत भाग घ्यायला सुरूवात केली. 

P-V-Narasimha-Rao-information-in-marathi
P-V-Narasimha-Rao-information-in-marathi

 हैद्राबादच्या निजाम सरकारच्या विरुद्ध बंड करून सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना निजाम सरकारच्या उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. तेव्हा त्यांनी आपले पुढील शिक्षण नागपूर विद्यापीठातून आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. ते बी. एस्. सी. एल्. एल्. बी. झाले आहेत.
 शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वत:ला वंदे मातरम् चळवळीत झोकून दिले होते. त्रिपूर येथे भरलेल्या काँग्रेस महासभेत त्यांनी भाग घेतला होता.

 हैद्राबाद काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सतत २० वर्षे ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. इ. स. १९५१ पासून ते अखिल भारत काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाह लागले. आंध्र प्रदेशच्या शासनात त्यांनी अनेकविध पदे व मंत्रिपदे सांभाळली. १९७१ ते ७३ आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. इ. स. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. चंदीगडला भरलेल्या अधिवेशनात त्यांनी राजनीति व विदेशी धोरण यावर अभ्यासपूर्ण भाषण दिले.

 १९७७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीत . जिंकले. १९७४ मध्ये ते पार्लमेंटच्या पब्लिक अकौंटस् कमिटीचे चेअरमन झाले. १९८० मध्ये ते विदेशमंत्री बनले. १९८० ते १९८४ ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात होते. १९८५ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातही ते होते. १९८९ साली ते चौथ्यावेळेला लोकसभेसाठी निवडून आले. त्यांनी विदेश मंत्रालय, गृहरक्षा, मानवविकास अशा विविध खात्यांवर मंत्री म्हणून कार्य केले आहे. २९ मे १९९१ या दिवशी ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. 

२१ जून १९९१ रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सीटीबीटी करार स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. १९९६ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते. परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा सोने गहाण टाकून देशाचा कारभार चालू होता. 

इतकी हलाखीची परिस्थिती होती. या परिस्थितीतून जनतेला कुठेही चटका बसू न देता नरसिंहराव यांनी गहाण टाकलेले सोने परत आणले आणि देशाचा रथही विकासाच्या मार्गावर आणून ठेवला. आर्थिक उदारीकरण हे अपत्य नरसिंहराव यांचेच आहे आणि याच्या पायावरच भारताची विकासाची गती सतत वाढत आहे. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष अल्पमतात आला आणि आघाडी शासन सत्तेवर आले. नरसिंहराव विरोधी पक्षाचे नेतत्त्व करू लागले.


ते जसे धुरंधर राजकारणी आहेत, तसेच ते साहित्य तपस्वीही आहेत. ते उत्तम तेलगू कथालेखक आहेत. तेलगू, मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भारतीय भाषांबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. तेलगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांची 'वेईपडिगळु' ही कादंबरी त्यांनी हिंदीत 'सहस्त्रकणा' या नावाने अनुवादीत केली आहे. मराठीतील पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचा त्यांनी तेलगमध्ये अनुवाद केला आहे. 'बहुभाषामेधावी ' अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी  इनसायडर' हे कादंबरीवजा आत्मवृत्त लिहिले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 

पाश्चात्य साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे अनेक भाषांवरचे प्रभुत्व व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टी अनेक नेत्यांना व जनतेला आकर्षित करणाऱ्या ठरल्या. सुसंस्कृत, विद्वान व ज्ञानयोगी अशा नरसिंहराव यांनी देशाचा गौरव सतत वाढता खला या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराचे २३ डिसेंबर २००४ ला निधन झाले.

P. V. Narasimha Rao information in marathi

neelam sanjiva reddy information in marathi


श्री. रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होत. ते एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात. 

neelam-sanjiva-reddy-information-in-marathi
neelam-sanjiva-reddy-information-in-marathi

सर्व थरातील लोकांशी संवाद साधणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. श्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म १९ मे १९१३ रोजी आंध्रप्रदेशातील रायलसीमा या अविकसित भागातील अनंतपूर येथे झाला. अडयार ( मद्रास ) येथील थिऑसॉफिकल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु त्या काळात स्वातंत्र्यचळवळीचे वारे जोरात वाहत होते. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि अनेकदा कारावास भोगला.

 या काळात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून आले. तरुण वयात त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली. दहा वर्षे ते या पदावर होते. मद्रास विधान सभेची १९४६ मधील निवडणूक त्यांनी सहज जिंकली आणि त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द सुरु झाली. १९४९ ते ५१ ते मद्रास राज्यात दारुबंदी मंत्री होते. १९५२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान स्वतंत्र आंध्रचा लढा यशस्वी होऊन टी प्रकाशम हे नव्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांना साथ देण्यासाठी श्री. रेड्डी हैद्राबादला परतले. मधे काहीकाळ ते पुन: १९५६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आले. 

१९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र अवघ्या चारच महिन्यांनी लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्यावर केंद्रीय पोलाद खात्याची जबाबदारी टाकली. पंतप्रधान शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्री. रेड्डी यांना पर्यटन खाते दिले. १९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत श्री. रेड्डी हिंदूपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आणि लोकसभेचे सभापती बनले. १९६९ ची निवडणुक हा श्री. रेड्डी यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय ठरला. जगजीवनराम आणि श्री. रेड्डी या दोघांमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. रेड्डी यांचीच निवड झाली.

 पण त्यांना व्ही. व्ही. गिरी या अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसही फुटली आणि इंदिराजींचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रपतीपदाचा हा हुकलेला योग श्री. रेड्डी यांच्यासमोर १९७७ मध्ये आला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून ते निवडून आले आणि लोकसभेचे सभापतीपद त्यांच्याकडे आले. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दिन अलि अहमद यांच्या निधनानंतर १९७७ मध्ये श्री. रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. परस्परांशी कमालीचा राजकीय संघर्ष असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी व श्री. रेड्डी यांना १९८० ते ८२ या काळात एकत्र काम करावे लागले. . वेंकटेश्वर युनिव्हर्सिटीने श्री. रेड्डी यांना  डॉक्टर ऑफ लॉज' ही डिग्री दिली.

neelam sanjiva reddy information in marathi

k r narayanan information in marathi


k r narayanan  यांचे संपूर्ण नांव नारायणन् कोचेरी रामन. २७ ऑक्टोबर १९२० ला केरळमधील उजावर या गावी एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होत. विद्यार्थीदशेपासूनच ते तल्लख बुद्धीचे हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी शिकवण्या करून व शिष्यवृत्त्या मिळवून केले. तिरुअनंतपुरमच्या महाविद्यालय व विश्वविद्यालयातून उत्तम गुण मिळवून ते पदवीधर झाले. १९५१ मध्ये त्यांचा विवाह माटिन्ट टिन्ट ( आताच्या उषा ) या ब्रह्मदेशीय महिलेशी झाला. 


सरुवातीच्या काळात त्यांनी व्याख्याते म्हणून कार्य केले. नंतर 'टाइम्स ऑफ इंडिया ' 'हिंदू' ( मद्रास ) अशा दैनिकांमधून पत्रकारीता केली. याचवेळी त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुढील शिक्षणासाठी ते खाना झाले. लंडनला असताना ते ' सोशल वेल्फेअर वीकली ( मुंबई ) ' या साप्ताहिकाचे लंडन येथील वार्ताहर म्हणून काम पहात असत. के. एम्. मुन्शी या साप्ताहिकाचे संपादन करीत असत. लंडनच्या वास्तव्यात नारायणन् यांचा परिचय जागतिक कीर्तीचे विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की यांच्याशी झाला. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नारायणन यांना मिळाले. 

१९४८ साली राज्यशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. प्रा. लास्की यांनी पंडित नेहरूंकडे नारायणन यांची शिफारस केली. १९४९ साली पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय विदेशी सेवेत घेतले. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आपली तल्लख बुद्धिमत्ता व व्यावसायिक राजनीति यांचा त्यांनी कुशलतेने योग्य असा वापर केला. कित्येक विदेशी राजनैतिक समस्या त्यांनी हुशारीने हाताळल्या.

k-r-narayanan-information-in-marathi
k-r-narayanan-information-in-marathi

भारताचे राजदत म्हणून त्यांनी थायलंड व तुर्कस्तान येथे काम पाहिले. भारताचे शिष्टमंडळ घेऊन ते रंगून, टोकियो, लंडन, ऑस्ट्रेलिया, हॅनोई या ठिकाणी गेले. १९६८ मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत-चीन संबंध बिघडले होते. भारताचे राजदूत या नात्याने के आर. नारायणन १९७६ मध्ये चीनला भेट देण्यास गेले. चीन-भारत संबंध पुनः प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. विदेशी सेवेतून मुक्त झाल्यावर विद्यापीठाचे उपकुलगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 त्याआधी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्रीय प्रशासनाचे व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले. वॉशिंग्टन येथे भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या पदावर ते चार वर्षे राहिले. १९७० मध्ये त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. वॉशिंग्टनमधील जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला. लोकसभेत त्यांची नियोजन आणि पाणीखाते, परराष्ट्र व्यवहार, आणि विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून निवड झाली. पुढे भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर त्यांची एकमताने निवड झाली.


२५ जुलै १९९७ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. ' मेमोरियल फंड ', ' इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च' अशा अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. 'एसेज् इन अंडरस्टैंडिंग ', 'नॉन अलायनमेंट इन कंटेंपरी इंटरनॅशनल रिलेशन्स इन इंडिया अँड अमेरिका ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यात भारतीय राजनैतिक धोरणावर भाष्य केले आहे. इ. स. २००२ पर्यंत नारायणन राष्ट्रपती पदावर होते.

k r narayanan information in marathi

indra kumar gujral information in marathi१९९७ - ९८ या वर्षी श्री. इंद्रकुमार गुजराल हे भारताचे पंतप्रधान होते. ते अकरावे पंतप्रधान होत. मृदुभाषी व मुरब्बी राजकारणी असे त्यांचे वर्णन केले जाते. ते अतिशय विचारवंत व बुद्धिमान होते. त्यांची संसदीय कारकीर्द १९६४ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून सुरू झाली. फेब्रुवारी १९६९ मध्ये त्यांना इंदिरा गांधी मंत्रीमंडळात माहिती व प्रसारण खाते मिळाले. आणीबाणीच्या अगोदर ते रशियातील राजदूत बनले होते. विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या मंत्रिमंडळात नोव्हेंबर १९८९ पासून परराष्ट्र व्यवहार खाते त्यांनी सांभाळले. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
indra-kumar-gujral-information-in-marathi
indra-kumar-gujral-information-in-marathi


अशा या नेत्याचा जन्म ४ डिसेंबर १९१९ रोजी पाकिस्तानातील झेलम येथे झाला. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्म झाल्यामुळे त्यांना घरातील राष्ट्रभक्तीच्या वातावरणाचा लाभ मिळाला. त्यांचे पिता अवतार नारायण गुजराल व आई स्वातंत्र्यलढ्यातील झुंजीत भाग घेणारे पंजाबातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे शालेय शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर हे कुटुंब दिल्लीमध्ये आले व तेथे त्यांनी आयात निर्यात व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांचा शीलाताईंशी विवाह झाला. त्या उत्तम कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.


१९५० साली इंद्रकुमार यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला. १९६४ पासून त्यांच्या संसदीय राजकीय कारकीर्द सुरु झाली. इंदिराजींचे सहकारी म्हणून त्यांना खास स्थान मिळाले. इंदिराजी त्यांचा खास सल्ला घेत असत. १९६७ साली संसदीय व्यवहार व दळणवळण खात्याच्या राज्यमंत्रीपदी त्यांची नेमणूक झाली. १९७६ साली नियोजन
आयोगावर त्यांची नियुक्ती झाली. इंदिराजींनी त्यांना खास राजदूत म्हणून रशियाला पाठवले. काहीकाळाने इंदिराजी व गुजराल यांची मते जुळेनाशी झाली तेव्हा इंद्रकुमार काँग्रेस सोडून जनतादलात दाखल झाले. 

१९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जालंधर मतदार संघातून ते निवडून आले व विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या कारकीर्दीतही ते परराष्ट्रमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी चीन, बांगला देश व पाकिस्तानशी मैत्री संपादन केली. त्यांच्याच कारकीर्दीमध्ये गंगा पाणी वाटप प्रश्नासंबंधी बांगला देशबरोबर वाटाघाटी करुन ३० वर्षांचा करार करण्यात आला. परंतु पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द फारशी टिकू शकली नाही. मध्यावधी निवडणुकीत भारतीय जनतापार्टी मोठ्या प्रमाणात निवडून आली व जनतापक्षाचे सरकार कोसळले. त्यानंतरही ते राज्यसभेचे सदस्य आहेत.


त्याचप्रमाणे गुजराल नारी निकेतन ट्रस्ट, इंडो पाक फ्रेंडशिप सोसायटी, दिल्ली आर्ट थिएटर, रोटरी क्लब ऑफ दिल्ली अशा अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सिद्धहस्त लेखकही आहेत.

indra kumar gujral information in marathi

H D deve gowda information in marathiहरदनहळ्ळी दौड्डेगौडा देवेगौडा अशा नावाचे हे भारताचे दहावे पंतप्रधान होत. यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाची कहाणी थक्क करुन सोडणारी आहे. संगणकाच्या क्षेत्रात बंगलोर हे शहर सर्वात आघाडीवर असल्याने त्याला 'सिलिकॉन व्हॅली' असे म्हटले जाते, याचे श्रेय देवेगौडा यानाच आहे. हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर तालुक्यातील हरदनहळ्ळी गावात देवेगौडा यांचा १८ मे १९३३ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डगौडा. एच. डी. देवेगौडा हे व्यवसायाने शेतकरी आहेत. 

H-D-deve-gowda-information-in-marathi
H-D-deve-gowda-information-in-marathi

परंतु त्यांनी सिव्हील इंजिनियरींगचा डिप्लोमा घेतला होता. काहीकाळ ठेकेदार म्हणून त्यांनी काम केले. १९६२ मध्ये कंत्राटदारीचा व्यवसाय बंद करून त्यांनी राजकारणातच उतरण्याचे ठरविले. १० वर्षे काँग्रेसचे काम करूनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. १९६९ साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने संघटना काँग्रेस'चा देशभरात धुव्वा उडविला होता. पण देवेगौडा मात्र निवडून आले आणि विरोधी पक्षाचे नेते बनले.

१९७८ सालापासून ते जनतादलाचे पुढारी बनले. १९८३ साली तेच कर्नाटकचे मुख्यमंत्री व्हायचे पण त्यावेळी रामचंद्र हेगडे मुख्यमंत्री झाले. पुढे १९९१ साली देवेगौडा लोकसभेवर निवडून गेले, १९९३ साली जनता दल व जनता पक्ष यांची युती झाली व जनतादलाला हुकमी बहुमत मिळाले. १९९४ साली देवेगौडा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.


राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसलेला, पण राज्याचे राजकारण यशस्वीपणे करू शकणारा हा नेता या नंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरला. १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किमान बहुमत मिळाले नाही. ज्योतिबसू, विश्वनाथ प्रतापसिंग यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला, अशाप्रकारे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना राष्ट्रीय आघाडीने नेतेपदाची जबाबदारी देवेगौडा यांच्यावर टाकली आणि १ जून १९९६ रोजी देवेगौडांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

 केंद्रीय मंत्रिमंडळाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी वर्षभर पंतप्रधान म्हणून मोलाची कामगिरी केली. त्यांच्या कारकीर्दीमध्ये परदेशी कंपन्यांबरोबर २८ करार झाले. देशाची गुंतवणुकीची परिस्थिती थोडी सुधारली. बंगलोर संगणकाच्या क्षेत्रात आघाडीवर आले, याचे श्रेय देवेगौडा यांनाच द्यायला हवे. देवेगौडा यांना हिंदी भाषा येत नव्हती. पंतप्रधानांना राष्ट्रभाषा येत नाही, हे जनतेला मान्य नव्हते. देशातील वाद, अंतर्गत भांडणे यामुळे श्री. देवेगौडा फारकाळ या पदावर राह शकले नाहीत.

H D deve gowda information in marathi