r venkataraman information in marathiश्री. वेंकटरामन् यांचा जन्म तामिळनाडूमधील राजमदम या खेड्यात ४ डिसेंबर १९१० रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी घेतली. त्यांचा विवाह श्रीमती जानकी यांच्याशी १९३८ मध्ये झाला. त्यांना तीन कन्या आहेत. मद्रास हायकोर्टात वेंकटरामन् यांनी १९३५ पासून पॅक्टिस सुरु केली. परंतु याच काळात ते भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीकडे ओढले गेले आणि 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली.

r-venkataraman-information-in-marathi
r-venkataraman-information-in-marathi


पुढे १९४७ ते १९५० वेंकटरामन् मद्रास बार फेडरेशनचे सेक्रेटरी होते. आपल्या कायद्याच्या करीयरमध्ये ते कामगारांसाठी विशेष कार्य करीत होते. १९४९ मध्ये त्यांनी एक कायद्याचे मासिक काढले, त्यांत कामगारांसंबंधीचे कायदे, त्यांची माहिती दिली जात असे. कामगार चळवळीत काम करीत असतानाच ते हळूहळू राजकारणाकडे ओढले गेले.


१९५० मध्ये ते विधानसभेमध्ये निवडून गेले. १९५३-५४ ला ते काँग्रेसपार्टीचे सेक्रेटरी होते. १९५७ मध्ये लोकसभेत निवडून आले असूनसुद्धा त्यांनी तेथे राजीनामा दिला व मद्रास सरकारमध्ये ते मंत्री म्हणून काम पाहू लागले. १९६७ पर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात मंत्री म्हणून कार्य केले. याच काळात मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पुढारी होते. सरकारमध्ये निरनिराळी अनेक पदे भूषविल्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. १९५३ ते १९६१ या काळात अनेकवेळा त्यांनी परदेशांना भेटी दिल्या.


अनेक विद्यापीठांकडून त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' च्या पदव्या मिळाल्या आहेत. कांचीपरम येथील शंकराचार्यांनी त्यांना 'सत सेवा रत्न ' असा किताब दिला आहे. ऑगस्ट १९८४ मध्ये श्री वेंकटरामन भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्याचवेळी ते राज्यसभेचे अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू अॅवॉर्ड समितीचे सदस्य, इंदिरा गांधी ॲवॉर्ड समितीचेही सदस्य अशी अनेक पदे ते भूषवीत होते. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडचे ते उपाध्यक्ष होते, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांचे कुलगुरुपदावरही ते कार्य करीत होते.
१९८७ मध्ये त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि २५ जुलै १९८७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ ग्रहण केली. ते भारताचे आठवे राष्ट्रपती होत.

r venkataraman information in marathi

pratibha patil information in marathiदेशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
देशाची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ घटनात्मक प्रमुख नव्हेत, तर भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांचे व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असतात. अशा या प्रमुखपदी प्रतिभाताई पाटील यांची निवड ही केंद्रीय राजकारणाचा अनुभव; निष्कलंक चारित्र्य, निष्ठा व परिपक्वता या निकषांवर झाली आहे. आणि या नव्या जबाबदारीला त्या योग्य न्याय देतील, यात शंका नाही.

pratibha-patil-information-in-marathi
pratibha-patil-information-in-marathi

१९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव जिल्ह्यातील नाङगाव येथे प्रतिभाताईंचा जन्म झाला. त्यांचे एम. ए. पर्यंतचे कॉलेजशिक्षण जळगावातच झाले. कॉलेजमध्ये खेळातही आघाडीवर असणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यानंतर मुंबईत लॉ कॉलेजमध्ये एल्. एल्. एम्. ची पदवी घेऊन जळगावात वकिली चालू केली. पण त्यानंतर मात्र त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९८५ या काळात महाराष्ट्रात त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली. नगरविकास, शिक्षण, पर्यटन, संसदीय कामकाज, सार्वजनिक आरोग्य, सांस्कृतिक अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. 

त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची चिंता केली, त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी दर करण्याचा प्रयत्न केला. १९८५ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर वर्षभरात त्या उपसभापती झाल्या. १९८८ ते १९९० त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष होत्या. १९९१ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर मात्र त्या जणू राजकीय विजनवासात गेल्या.


तब्बल आठ वर्षानंतर २००४ मध्ये त्या राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झाल्या आणि पुन: राजकीय पटलावर दिसू लागल्या. प्रतिभाताईंचे पती देवीसिंह शेखावत अमरावतीचे महापौर होते. प्रतिभाताईंच्या राजकारणाला देवीसिंह यांची नेहमी साथ असते व ताईंच्या यशात देवीसिंह यांचा मोठा वाटा आहे. प्रतिभाताईंना ज्योती राठोड ही मुलगी व राजेंद्रसिंग हा मुलगा आहे.


 आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषविताना त्यांची सामान्य जनतेबद्दलची तळमळ सतत दिसून येते. कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात त्या कुशल आहेत. विरोधी पक्षनेत्या असताना सरकारवर जबरदस्त प्रहार करण्याची कुवत त्यांच्या ठिकाणी होती. अशा या करारी व्यक्तिमत्त्वाने आता राष्ट्रपतीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. दि. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली. सह्याद्री व सातपुड्याचे कडे ओलांडून राजस्थानातील अरवली पर्वत पार करून पाटील आडनांवाची ही धीरगंभीर महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या सिंहासनावर सन्मानाने विराजमान झाली आहे.

 पहिली मॅडम प्रेसिडेंट ' महाराष्ट्राने देशाला दिली आहे. साधी रहाणी व उच्च विचारसरणीचा वस्तुपाठ त्या आपल्याला देतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी वर्किंग वुमेन्स होस्टेलची स्थापना केली आहे. जळगावात इंजिनिअरिंग कॉलेज, साखर कारखाना, अंधांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भटक्या विमुक्तांसाठी शाळेची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे त्यांच्या स्वभावातच आहे, त्यानुसार त्या या पदावरून भरीव कामगिरी करून दाखवतील, अशी खात्री वाटते. परंपरा व “ प्रोफेशनॅलिझम' याचा अनोखा संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. त्यांच्या नव्या कारकीर्दीला अनेकानेक शुभेच्छा !! .

pratibha patil information in marathi

P. V. Narasimha Rao information in marathi


P. V. Narasimha Rao यांचे संपूर्ण नांव पामुलपति वेंकट नरसिंहराव. हे भारताचे नववे पंतप्रधान होत. १९९१ ते १९९६ ते पंतप्रधान होते. देशाचे पंतप्रधान होणारे ते दक्षिण भारतातील पहिले नेते आहेत.
नरसिंहराव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी करीमनगर येथेच झाले. वरंगळ येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेस, आर्यसमाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्याग्रह चळवळीत भाग घ्यायला सुरूवात केली. 

P-V-Narasimha-Rao-information-in-marathi
P-V-Narasimha-Rao-information-in-marathi

 हैद्राबादच्या निजाम सरकारच्या विरुद्ध बंड करून सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना निजाम सरकारच्या उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. तेव्हा त्यांनी आपले पुढील शिक्षण नागपूर विद्यापीठातून आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. ते बी. एस्. सी. एल्. एल्. बी. झाले आहेत.
 शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वत:ला वंदे मातरम् चळवळीत झोकून दिले होते. त्रिपूर येथे भरलेल्या काँग्रेस महासभेत त्यांनी भाग घेतला होता.

 हैद्राबाद काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सतत २० वर्षे ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. इ. स. १९५१ पासून ते अखिल भारत काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाह लागले. आंध्र प्रदेशच्या शासनात त्यांनी अनेकविध पदे व मंत्रिपदे सांभाळली. १९७१ ते ७३ आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. इ. स. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. चंदीगडला भरलेल्या अधिवेशनात त्यांनी राजनीति व विदेशी धोरण यावर अभ्यासपूर्ण भाषण दिले.

 १९७७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीत . जिंकले. १९७४ मध्ये ते पार्लमेंटच्या पब्लिक अकौंटस् कमिटीचे चेअरमन झाले. १९८० मध्ये ते विदेशमंत्री बनले. १९८० ते १९८४ ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात होते. १९८५ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातही ते होते. १९८९ साली ते चौथ्यावेळेला लोकसभेसाठी निवडून आले. त्यांनी विदेश मंत्रालय, गृहरक्षा, मानवविकास अशा विविध खात्यांवर मंत्री म्हणून कार्य केले आहे. २९ मे १९९१ या दिवशी ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. 

२१ जून १९९१ रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सीटीबीटी करार स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. १९९६ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते. परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा सोने गहाण टाकून देशाचा कारभार चालू होता. 

इतकी हलाखीची परिस्थिती होती. या परिस्थितीतून जनतेला कुठेही चटका बसू न देता नरसिंहराव यांनी गहाण टाकलेले सोने परत आणले आणि देशाचा रथही विकासाच्या मार्गावर आणून ठेवला. आर्थिक उदारीकरण हे अपत्य नरसिंहराव यांचेच आहे आणि याच्या पायावरच भारताची विकासाची गती सतत वाढत आहे. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष अल्पमतात आला आणि आघाडी शासन सत्तेवर आले. नरसिंहराव विरोधी पक्षाचे नेतत्त्व करू लागले.


ते जसे धुरंधर राजकारणी आहेत, तसेच ते साहित्य तपस्वीही आहेत. ते उत्तम तेलगू कथालेखक आहेत. तेलगू, मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भारतीय भाषांबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. तेलगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांची 'वेईपडिगळु' ही कादंबरी त्यांनी हिंदीत 'सहस्त्रकणा' या नावाने अनुवादीत केली आहे. मराठीतील पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचा त्यांनी तेलगमध्ये अनुवाद केला आहे. 'बहुभाषामेधावी ' अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी  इनसायडर' हे कादंबरीवजा आत्मवृत्त लिहिले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 

पाश्चात्य साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे अनेक भाषांवरचे प्रभुत्व व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टी अनेक नेत्यांना व जनतेला आकर्षित करणाऱ्या ठरल्या. सुसंस्कृत, विद्वान व ज्ञानयोगी अशा नरसिंहराव यांनी देशाचा गौरव सतत वाढता खला या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराचे २३ डिसेंबर २००४ ला निधन झाले.

P. V. Narasimha Rao information in marathi

neelam sanjiva reddy information in marathi


श्री. रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होत. ते एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात. 

neelam-sanjiva-reddy-information-in-marathi
neelam-sanjiva-reddy-information-in-marathi

सर्व थरातील लोकांशी संवाद साधणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. श्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म १९ मे १९१३ रोजी आंध्रप्रदेशातील रायलसीमा या अविकसित भागातील अनंतपूर येथे झाला. अडयार ( मद्रास ) येथील थिऑसॉफिकल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु त्या काळात स्वातंत्र्यचळवळीचे वारे जोरात वाहत होते. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि अनेकदा कारावास भोगला.

 या काळात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून आले. तरुण वयात त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली. दहा वर्षे ते या पदावर होते. मद्रास विधान सभेची १९४६ मधील निवडणूक त्यांनी सहज जिंकली आणि त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द सुरु झाली. १९४९ ते ५१ ते मद्रास राज्यात दारुबंदी मंत्री होते. १९५२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान स्वतंत्र आंध्रचा लढा यशस्वी होऊन टी प्रकाशम हे नव्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांना साथ देण्यासाठी श्री. रेड्डी हैद्राबादला परतले. मधे काहीकाळ ते पुन: १९५६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आले. 

१९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र अवघ्या चारच महिन्यांनी लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्यावर केंद्रीय पोलाद खात्याची जबाबदारी टाकली. पंतप्रधान शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्री. रेड्डी यांना पर्यटन खाते दिले. १९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत श्री. रेड्डी हिंदूपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आणि लोकसभेचे सभापती बनले. १९६९ ची निवडणुक हा श्री. रेड्डी यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय ठरला. जगजीवनराम आणि श्री. रेड्डी या दोघांमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. रेड्डी यांचीच निवड झाली.

 पण त्यांना व्ही. व्ही. गिरी या अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसही फुटली आणि इंदिराजींचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रपतीपदाचा हा हुकलेला योग श्री. रेड्डी यांच्यासमोर १९७७ मध्ये आला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून ते निवडून आले आणि लोकसभेचे सभापतीपद त्यांच्याकडे आले. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दिन अलि अहमद यांच्या निधनानंतर १९७७ मध्ये श्री. रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. परस्परांशी कमालीचा राजकीय संघर्ष असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी व श्री. रेड्डी यांना १९८० ते ८२ या काळात एकत्र काम करावे लागले. . वेंकटेश्वर युनिव्हर्सिटीने श्री. रेड्डी यांना  डॉक्टर ऑफ लॉज' ही डिग्री दिली.

neelam sanjiva reddy information in marathi

k r narayanan information in marathi


k r narayanan  यांचे संपूर्ण नांव नारायणन् कोचेरी रामन. २७ ऑक्टोबर १९२० ला केरळमधील उजावर या गावी एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होत. विद्यार्थीदशेपासूनच ते तल्लख बुद्धीचे हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी शिकवण्या करून व शिष्यवृत्त्या मिळवून केले. तिरुअनंतपुरमच्या महाविद्यालय व विश्वविद्यालयातून उत्तम गुण मिळवून ते पदवीधर झाले. १९५१ मध्ये त्यांचा विवाह माटिन्ट टिन्ट ( आताच्या उषा ) या ब्रह्मदेशीय महिलेशी झाला. 


सरुवातीच्या काळात त्यांनी व्याख्याते म्हणून कार्य केले. नंतर 'टाइम्स ऑफ इंडिया ' 'हिंदू' ( मद्रास ) अशा दैनिकांमधून पत्रकारीता केली. याचवेळी त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुढील शिक्षणासाठी ते खाना झाले. लंडनला असताना ते ' सोशल वेल्फेअर वीकली ( मुंबई ) ' या साप्ताहिकाचे लंडन येथील वार्ताहर म्हणून काम पहात असत. के. एम्. मुन्शी या साप्ताहिकाचे संपादन करीत असत. लंडनच्या वास्तव्यात नारायणन् यांचा परिचय जागतिक कीर्तीचे विचारवंत प्रा. हेरॉल्ड लास्की यांच्याशी झाला. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नारायणन यांना मिळाले. 

१९४८ साली राज्यशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. प्रा. लास्की यांनी पंडित नेहरूंकडे नारायणन यांची शिफारस केली. १९४९ साली पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय विदेशी सेवेत घेतले. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आपली तल्लख बुद्धिमत्ता व व्यावसायिक राजनीति यांचा त्यांनी कुशलतेने योग्य असा वापर केला. कित्येक विदेशी राजनैतिक समस्या त्यांनी हुशारीने हाताळल्या.

k-r-narayanan-information-in-marathi
k-r-narayanan-information-in-marathi

भारताचे राजदत म्हणून त्यांनी थायलंड व तुर्कस्तान येथे काम पाहिले. भारताचे शिष्टमंडळ घेऊन ते रंगून, टोकियो, लंडन, ऑस्ट्रेलिया, हॅनोई या ठिकाणी गेले. १९६८ मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत-चीन संबंध बिघडले होते. भारताचे राजदूत या नात्याने के आर. नारायणन १९७६ मध्ये चीनला भेट देण्यास गेले. चीन-भारत संबंध पुनः प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. विदेशी सेवेतून मुक्त झाल्यावर विद्यापीठाचे उपकुलगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 त्याआधी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्रीय प्रशासनाचे व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले. वॉशिंग्टन येथे भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या पदावर ते चार वर्षे राहिले. १९७० मध्ये त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. वॉशिंग्टनमधील जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला. लोकसभेत त्यांची नियोजन आणि पाणीखाते, परराष्ट्र व्यवहार, आणि विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून निवड झाली. पुढे भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर त्यांची एकमताने निवड झाली.


२५ जुलै १९९७ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. ' मेमोरियल फंड ', ' इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च' अशा अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. 'एसेज् इन अंडरस्टैंडिंग ', 'नॉन अलायनमेंट इन कंटेंपरी इंटरनॅशनल रिलेशन्स इन इंडिया अँड अमेरिका ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यात भारतीय राजनैतिक धोरणावर भाष्य केले आहे. इ. स. २००२ पर्यंत नारायणन राष्ट्रपती पदावर होते.

k r narayanan information in marathi