vishwanath pratap singh information in marathi१९८९ - ९० मध्ये विश्वनाथ प्रतापसिंह भारताचे पंतप्रधान बनले. जनतादल या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे ते नेते होते. बोफोर्सच्या मुद्यामुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता नि त्यामुळे व्ही. पी. सिंग पंतप्रधानपदावर आरुढ झाले. विश्वनाथ प्रतापसिंह यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. विश्वनाथ पाच वर्षांचे असताना मांडाचे राजा राम गोपाल सिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण डेहराडून व वाराणशी येथे झाले. त्यानंतर १९६९ मध्ये ते काँग्रेसपार्टीचे सभासद म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर आले.


१९७१ मध्ये ते लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले. १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. व्यापार खात्याचे उपमंत्री म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. १९७७ पासून त्यांना व्यापार खात्यातच राज्यमंत्रीपद मिळाले. १९८० साली इंदिराजी पुनः निवडून आल्या. त्याचसुमारास व्ही. पी. सिंग यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात पुनः भाग घ्यायला सुरूवात केली. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 

vishwanath-pratap-singh-information-in-marathi
vishwanath-pratap-singh-information-in-marathi


त्यावेळी फूलनदेवी वगैरे डाकूचा धुमाकूळ चालू होता. डाकूचा त्रास थांबलाच पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे अखेर त्यांनी १९८२ मध्ये राजीनामा दिला. १९८४ साली इंदिराजींनी त्याना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले.
१९८५ मध्ये राजीव गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांना आपल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून घेतले. या काळात त्यांनी मुंबई, कलकत्ता येथील व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. अबकारी कर चुकविणाऱ्या उद्योजकांना नोटीसा पाठवल्या. काळाबाजार करणाऱ्या व लोकांना लुटणाऱ्या प्रसिद्ध लोकांवर धाडी पडल्यामुळे जनता व्ही. पी. सिंग यांची स्तुती करू लागली. 

१९८७ मध्ये संरक्षण खाते व्ही. पी. सिंग यांच्याकडे आले. शस्त्रखरेदी प्रकरणावरून सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९८८ च्या अलाहाबाद निवडणुकीत सिंग हे निवडून आले आणि सर्व पक्षांचे पुढारी बनले. २ डिसेंबर १९८९ ला त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. परंतु गटागटातील भांडणामुळे भारतीय जनतापक्षाने जनता पार्टीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सिंग यांचे सरकार ७ नोव्हेंबर १९९० ला बरखास्त झाले व त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.


आर्थिक टंचाई, भाववाढ, रिकामा सरकारी खजिना अशा अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तरीही ते लोकप्रिय नेता होते आणि आपल्या उदारवादी विचाराबद्दल प्रसिद्ध होते.

vishwanath pratap singh information in marathi

varahagiri venkata giri information in marathiवराहगिरी व्यंकटगिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते प्राणपणाने लढले. पुढे त्यांनी महात्मा गांधींचे अहिंसावादी तत्त्वज्ञान अंगिकारले. मजुरांचा संघटक म्हणून कार्याला सुरुवात करून पुढे त्या कार्याचे सनदशीर चळवळीत रुपांतर करणारा महान नेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आपल्या राष्ट्रीय इतिहासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव साऱ्या देशवासियांनी केला आहे. श्री गिरी यांचे सार्वजनिक आयुष्य विविधरंगी आणि विस्तृत आहे.

 राजकारणी, धडाडीने चळवळ चालविणारे, क्रियाशील, मुत्सद्दी, अनुभवी सल्लागार अशा अनेक क्षेत्रात ते यशस्वी ठरले आहेत. श्री. व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी ओरिसामधील बेहरामपूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव व्ही व्ही जोगिया पंतुतू. वयाच्या १२ व्या वर्षापासून छोट्या गिरींनी सार्वजनिक कार्याला सुरवात केली. आपल्या गावात तरुणांची एक संघटना व युवक मंडळ काढले.

varahagiri-venkata-giri-information-in-marathi
varahagiri-venkata-giri-information-in-marathi

 १३ व्या वर्षी गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देणारी संघटना काढली. सिनीअर केंब्रिजची परीक्षा पास झाल्यावर श्री गिरी हे १९१३ साली कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनला गेले. तेथे त्यांनी आयर्लंडमधील डब्लिनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड या संस्थेत नांव दाखल केले, त्या काळात आयरीश लोकांचा स्वातंत्र्यलढा तीव्र स्वरुपात चालू होता. डी. व्हॅलेरा यांचे तेजस्वी नेतृत्त्व जनतेला लाभले होते. गिरी या आंदोलनाकडे आकर्षिले गेले.

त्यांनी आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांना संघटित करुन त्यांची एक संस्था स्थापन केली. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वर्णविद्वेषी धोरणाविरुद्ध लढत होते. याचा परिणाम म्हणून गिरी यांच्या मनात आपल्या देशाच्या पारतंत्र्याबद्दल खंत निर्माण झाली. त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉरर ' या नावाची छोटी पुस्तिका लिहिली आणि अत्याचाराविरुद्ध पत्रके छापून भारतात पाठवली. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन गिरी यांनी रेडक्रॉसमध्ये नांव दाखल केले. 

परंतु गांधीजींच्या ब्रिटीश सरकारला सहकार्य करण्याचे धोरण न पटल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला. १९१६ मध्ये इस्टेर क्रांती झाली. गिरी यांच्यावर झडतीचे वॉरंट बजावण्यात आले आणि १ जुलै १९१६ ला त्यांना ब्रिटनमधून हद्दपार करण्यात आले. परत आल्यावर श्री. गिरी यांनी मद्रास हायकोर्टात अॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९१७ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९१८ मध्ये त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. १९१७ ते १९२२ गिरी हे काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते. परंतु त्यांच्या मनाचा खरा ओढा कामगार संघटनेकडे होता. 

त्यांनी रेल्वे कामगारांची अखिल भारतीय संघटना निर्माण केली. आयुष्यभर त्यांनी कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. १९५४ मध्ये गिरी यांच्या जीवनात मोठा कसोटीचा क्षण आला होता. ते केंद्र सरकारमध्ये मजूरमंत्री होते. मंत्रिमंडळाने बँक नोकरांच्या हिताविरुद्ध निर्णय दिल्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सार्वजनिक जीवनाचा त्यांचा अनुभवही मोठा होता. त्यांनी तीन राज्यांचे राज्यपालपद भूषविले आहे. सिलोनमध्ये ते भारताचे हायकमिशनर होते. ते उपराष्ट्रपतीपदावरही होते.


१९६२ ते १९६७ श्री गिरी हे भारताचे राष्ट्रपती होते. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सतत कामगारांच्या हिताचे रक्षणच केले. भारतातील मालक व मजूर या परस्पर विरोधी गटांना सांधणारा दुवा म्हणून त्यांनी जे काम केले ते अत्यंत महत्त्वपूर्ण होते.

varahagiri venkata giri information in marathi

rajiv gandhi information in marathi आधुनिक भारताची पायाभरणी करणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचे नांव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी प्रशासन व काँग्रेसपक्ष या दोहोंच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणला, त्याला नवी दिशा दिली. भारताला २१ व्या शतकाकडे नेण्यासाठी, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले.
२० ऑगस्ट १९४४ ला राजीवजींचा मुंबई येथे जन्म झाला. 

वडील फिरोज गांधी व आई इंदिरा गांधी. त्यांनाही आजोबाप्रमाणे प्राण्यांची खूप आवड होती. फोटोग्राफी व संगीत हे त्यांचे आवडते छंद होते. त्यांचे पारदर्शी, नितळ व्यक्तिमत्त्व, प्रेमळपणा, शांतपणा, हसतमुख चेहरा सारेच समोरच्यावर छाप पाडी. १५ फेब्रुवारी १९६८ रोजी सोनिया यांच्याबरोबर विवाह झाला.

rajiv-gandhi-information-in-marathi
rajiv-gandhi-information-in-marathi

राजीव व्यवसायाने पायलट होते आणि राजकारणात मुळीच रस नव्हता. पण त्यांचा भाऊ संजय याच्या अपघाती मृत्यूनंतर आईला ( इंदिराना ) सावरण्यासाठी ते राजकारणात उतरले. अमेठीतून निवडणूक जिंकून ते १९८१ मध्ये ते लोकसभेत आले. १९८३ मध्ये ते काँग्रेसपक्षाचे जनरल सेक्रेटरी नेमले गेले. ३१ ऑक्टोबरला इंदिराजी यांची हत्त्या झाली आणि राजीवना पंतप्रधानपद सांभाळावे लागले. आईसाठी शोक करायलाही त्यांच्याजवळ वेळ नव्हता. कारण देशाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली होती. १९८४ च्या निवडणुकीत राजीवना अमाप यश मिळाले. ४१५ खासदार त्यांच्याबरोबर होते. हा विक्रम आजतागायत कोणाला मोडता आलेला नाही. 


त्यानंतर त्यांनी पक्षांतरबंदीचा कायदा केला. जनतेमध्ये मि. क्लीन ' अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. अहिंसा व सहिष्णता ही दोन भारतीय तत्त्वेच जगाला शांततेची वाट दाखवू शकतील असे त्यांचे ठाम मत होते.
 विरोधकांना राजीव गांधींची लोकप्रियता सहन झाली नाही. १०४ ला विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान झाले. त्यांनी राजीव गांधी विरुद्ध बोफोर्स खटला दाखल केला. स्वीडनच्या बोफोर्स तोफा खरेदी करताना राजीवनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला. वास्तविक या तोफा कारगिलच्या युद्धात खूप फायदेशीर ठरल्या होत्या. 

पण या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या निमित्ताने राजीव गांधींचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न झाले. हे भूत १७-१८ वर्षे गांधी कुटुंबाच्या मागे होते. परंतु आता त्यांच्या मृत्यूनंतर १३ वर्षांनी त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे. १९८५-८६ या काळात भारतातील राजकीय वातावरण अतिशय ताणतणावाच झाले होते. अशा बिकट परिस्थितीतही राजीवनी त्या प्रक्षुब्ध वातावरणातील तणाव मोठ्या कौशल्याने काढला. पंजाब, आसाम, मिझोराम या राज्यांच्या संदर्भात समाधानकारक तोङगे काढले आणि सामंजस्याचे वातावरण प्रस्थापित केले.

 अतिरेक्यांनी पंजाबात हिंदू व शीख समाजात दुही माजवली होती. पंजाब करारावर अत्यंत कुशलपणे कार्यवाही करुन राजीवनी तेथे लोकशाही सरकार बनवले. आसाममध्ये परदेशी नागरीकांचा प्रश्न सोडवणे आवश्यक होते. पाकिस्तान व बांगला देशमधून आसामात बेकायदेशीरपणे घुसणारे नागरीक ही मोठी समस्या होती. कमालीची दक्षता बाळगून अखिल आसाम विद्यार्थी संघटनेबरोबर वाटाघाटी करून याही प्रश्नावर राजीवजींनी तोडगा काढला. सत्ताग्रहण केल्यानंतर आठच महिन्यात या तरुण पंतप्रधानांनी आसाम, पंजाब येथील जटिल प्रश्नांवर तोडगा काढला. 

कोणत्याही समस्येकडे पाहण्याची स्वप्नवतदृष्टी आणि मुत्सद्याला शोभणारी कार्यपद्धती यांचा सुरेख मेळ राजीवजींच्या ठायी होता. याचवेळी लाला हे मिझोना स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. पण मिझो सैनिकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडून, लालड़ेंगा यांच्याशी करार करून हा प्रश्नही त्यांनी अत्यंत चतुरपणे हाताळला व निकालात काढला. अशा तहेने तेथे शांतता प्रस्थापित करुन लोकशाही कार्यपद्धतीला चालना देणे हा आपला ध्यास पुरा केला.


यानंतर १९९१ च्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यासाठी प्रचारकार्य जोरात चालू होते. राजीवजी संरक्षण यंत्रणा सोडून लोकात मिसळत असत. याचीच देशाला भारी किंमत मोजावी लागली. असो. दिवसाचे १८-१८ तास त्यांची भ्रमंती चालू असायची. प्रचाराचा जोर वाढत होता. दक्षिण भारताच्या प्रचारदौऱ्याचा कार्यक्रम ठरला होता. परंतु ऐनवेळी त्यात बदल झाला आणि श्री पेरुम्बदर येथे जाण्याचे ठरविले गेले आणि तेथेच बॉम्बस्फोट होऊन राजीव गांधी यांची हत्त्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे सारा देश शोकसागरात बुडून गेला.


राजीवजींनी आपल्या कारकीर्दीत आर्थिक सुधारणांना हात घातला. त्यासाठी संगणकाची व दूरसंचार माध्यमाची आवश्यकता त्यांनी प्रथम हेरली. संपूर्ण देशात टेलिफोनचे जाळे विणले. भारत महासत्ता होत आहे. याचा पाया माहिती व तंत्रज्ञानात आहे. भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी आघाडी आज मिळवली आहे, त्याचा पाया घालण्याचे श्रेय भारताच्या या तरुण पंतप्रधान राजीव यांनाच द्यावे लागेल. दळणवळण व तंत्रविज्ञान या क्षेत्रात दूरगामी परिणाम घडविणारे धोरणात्मक निर्णय राजीव गांधींनी घेतले. 

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यांनी पंचायतराज कायद्यात सधारणा केल्या त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ३३% जागा राखून ठेवल्या गेल्या. काँग्रेसला नवे रूप देण्यासाठी पक्षाची संघटनात्मक सूत्रे तरुण नेतृत्त्वाकडे सोपविण्याचे महत्त्वाचे काम राजीव गांधी यांनी केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न' हा मानाचा किताब देण्यात आला.

rajiv gandhi information in marathi

r venkataraman information in marathiश्री. वेंकटरामन् यांचा जन्म तामिळनाडूमधील राजमदम या खेड्यात ४ डिसेंबर १९१० रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी घेतली. त्यांचा विवाह श्रीमती जानकी यांच्याशी १९३८ मध्ये झाला. त्यांना तीन कन्या आहेत. मद्रास हायकोर्टात वेंकटरामन् यांनी १९३५ पासून पॅक्टिस सुरु केली. परंतु याच काळात ते भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीकडे ओढले गेले आणि 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली.

r-venkataraman-information-in-marathi
r-venkataraman-information-in-marathi


पुढे १९४७ ते १९५० वेंकटरामन् मद्रास बार फेडरेशनचे सेक्रेटरी होते. आपल्या कायद्याच्या करीयरमध्ये ते कामगारांसाठी विशेष कार्य करीत होते. १९४९ मध्ये त्यांनी एक कायद्याचे मासिक काढले, त्यांत कामगारांसंबंधीचे कायदे, त्यांची माहिती दिली जात असे. कामगार चळवळीत काम करीत असतानाच ते हळूहळू राजकारणाकडे ओढले गेले.


१९५० मध्ये ते विधानसभेमध्ये निवडून गेले. १९५३-५४ ला ते काँग्रेसपार्टीचे सेक्रेटरी होते. १९५७ मध्ये लोकसभेत निवडून आले असूनसुद्धा त्यांनी तेथे राजीनामा दिला व मद्रास सरकारमध्ये ते मंत्री म्हणून काम पाहू लागले. १९६७ पर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात मंत्री म्हणून कार्य केले. याच काळात मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पुढारी होते. सरकारमध्ये निरनिराळी अनेक पदे भूषविल्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. १९५३ ते १९६१ या काळात अनेकवेळा त्यांनी परदेशांना भेटी दिल्या.


अनेक विद्यापीठांकडून त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' च्या पदव्या मिळाल्या आहेत. कांचीपरम येथील शंकराचार्यांनी त्यांना 'सत सेवा रत्न ' असा किताब दिला आहे. ऑगस्ट १९८४ मध्ये श्री वेंकटरामन भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्याचवेळी ते राज्यसभेचे अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू अॅवॉर्ड समितीचे सदस्य, इंदिरा गांधी ॲवॉर्ड समितीचेही सदस्य अशी अनेक पदे ते भूषवीत होते. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडचे ते उपाध्यक्ष होते, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांचे कुलगुरुपदावरही ते कार्य करीत होते.
१९८७ मध्ये त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि २५ जुलै १९८७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ ग्रहण केली. ते भारताचे आठवे राष्ट्रपती होत.

r venkataraman information in marathi

pratibha patil information in marathiदेशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
देशाची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ घटनात्मक प्रमुख नव्हेत, तर भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांचे व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असतात. अशा या प्रमुखपदी प्रतिभाताई पाटील यांची निवड ही केंद्रीय राजकारणाचा अनुभव; निष्कलंक चारित्र्य, निष्ठा व परिपक्वता या निकषांवर झाली आहे. आणि या नव्या जबाबदारीला त्या योग्य न्याय देतील, यात शंका नाही.

pratibha-patil-information-in-marathi
pratibha-patil-information-in-marathi

१९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव जिल्ह्यातील नाङगाव येथे प्रतिभाताईंचा जन्म झाला. त्यांचे एम. ए. पर्यंतचे कॉलेजशिक्षण जळगावातच झाले. कॉलेजमध्ये खेळातही आघाडीवर असणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यानंतर मुंबईत लॉ कॉलेजमध्ये एल्. एल्. एम्. ची पदवी घेऊन जळगावात वकिली चालू केली. पण त्यानंतर मात्र त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९८५ या काळात महाराष्ट्रात त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली. नगरविकास, शिक्षण, पर्यटन, संसदीय कामकाज, सार्वजनिक आरोग्य, सांस्कृतिक अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. 

त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची चिंता केली, त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी दर करण्याचा प्रयत्न केला. १९८५ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर वर्षभरात त्या उपसभापती झाल्या. १९८८ ते १९९० त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष होत्या. १९९१ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर मात्र त्या जणू राजकीय विजनवासात गेल्या.


तब्बल आठ वर्षानंतर २००४ मध्ये त्या राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झाल्या आणि पुन: राजकीय पटलावर दिसू लागल्या. प्रतिभाताईंचे पती देवीसिंह शेखावत अमरावतीचे महापौर होते. प्रतिभाताईंच्या राजकारणाला देवीसिंह यांची नेहमी साथ असते व ताईंच्या यशात देवीसिंह यांचा मोठा वाटा आहे. प्रतिभाताईंना ज्योती राठोड ही मुलगी व राजेंद्रसिंग हा मुलगा आहे.


 आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषविताना त्यांची सामान्य जनतेबद्दलची तळमळ सतत दिसून येते. कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात त्या कुशल आहेत. विरोधी पक्षनेत्या असताना सरकारवर जबरदस्त प्रहार करण्याची कुवत त्यांच्या ठिकाणी होती. अशा या करारी व्यक्तिमत्त्वाने आता राष्ट्रपतीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. दि. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली. सह्याद्री व सातपुड्याचे कडे ओलांडून राजस्थानातील अरवली पर्वत पार करून पाटील आडनांवाची ही धीरगंभीर महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या सिंहासनावर सन्मानाने विराजमान झाली आहे.

 पहिली मॅडम प्रेसिडेंट ' महाराष्ट्राने देशाला दिली आहे. साधी रहाणी व उच्च विचारसरणीचा वस्तुपाठ त्या आपल्याला देतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी वर्किंग वुमेन्स होस्टेलची स्थापना केली आहे. जळगावात इंजिनिअरिंग कॉलेज, साखर कारखाना, अंधांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भटक्या विमुक्तांसाठी शाळेची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे त्यांच्या स्वभावातच आहे, त्यानुसार त्या या पदावरून भरीव कामगिरी करून दाखवतील, अशी खात्री वाटते. परंपरा व “ प्रोफेशनॅलिझम' याचा अनोखा संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. त्यांच्या नव्या कारकीर्दीला अनेकानेक शुभेच्छा !! .

pratibha patil information in marathi